यावर आपले मत नोंदवा

हर रंग कुछ कहता है!


[ Wednesday, June 27, 2007 02:19:36 am]

तुमच्या गाडीचा चमकदार रंग तुमच्या गाडीची स्टेटस वाढवत असतो. मग शानदार रंग असलेली साधी फियाटही आकर्षक वाटते, पण जुनाट रंगाची गाडी, मग ती मसिर्डिज असली तरी तिच्याकडे पाहावेसे वाटत नाही. हा सारा रंगाचा महिमा आहे कारण हर रंग कुछ कहता है.

मानवी जीवनात रंगाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. रंग हे मानवी मनोवृत्तीचे प्रतिबिंब म्हणून ओळखले जातात. या रंगावर आधारीत उपचारपद्धती, ‘कलरथेरपी’ हा विषय आता जगभर लोकप्रिय होत आहे. असे हे रंग गाड्यांच्या जगातही ‘डिसायडिंग फॅक्टर’ ठरतात. म्हणूनच गाडी घेताना किंवा मेन्टेन करताना रंग हा घटक विसरून चालणार नाही.

बऱ्याचदा भारतीय बाजारपेठेत येणाऱ्या गाड्यांचे रंग हे इथल्या लोकांची निवड पाहून ठरविलेले असतात. साधारणत: एखादी नवी गाडी बाजारात आली की ती तीन ते चार रंगामध्ये बाजारात आणली जाते. त्यातही हे रंग चमकदार ‘ग्लॉसी’ आणि उठावदार ‘मॅट’ अशा प्रकारात ते उपलब्ध असतात. अगदी आताआतापर्यंत त्यातही पारंपरिक रंगाची निवड करणे ग्राहक पसंत करत होते. पण इम्पोटेर्ड गाड्यांची क्रेझ जशी वाढू लागली तशी या रंगामध्येही नावीन्य येऊ लागले आहे. बरेच नवे रंग, नवे प्रयोग रस्त्याच्या रॅम्पवर दिसू लागले आहेत.

… मग ‘टॅडिशनल व्हाइट ‘ किंवा ‘क्रिम ‘ ऐवजी ‘व्हायब्रन्ट ब्लू’, ‘स्पार्कलिंग व्हायोलेट’ असे भन्नाट रंग गाड्यांवर दिसू लागले आहेत. या रंगाचे हे वैविध्य रंगांच्या वेगवेगळ््या छटांपूरते मर्यादीत न राहता ‘मिक्सिंग ‘, ‘फ्यूजन’ असले बहुरंगी प्रकारही दिसू लागले. त्यात एकापेक्षा अनेक रंग विविध पद्धतीने एकत्र करून गाडीवर लावले जातात. ज्यामुळे नेहमीच्या सपाट रंगाऐवजी निरनिराळी कॉम्बिनेशन्स पाहता येतात.

याच्याही पुढे जाऊन सांगायचे तर, काही जण खास आपली गाडी वेगळी दिसावी यासाठी ‘युनिक स्टाइल’ करून घेतात. मग त्यात संपूर्ण गाडीवर वाघाचे कातडे पांघरल्यासारखे चित्र रंगवतात, काही जिराफाचे पट्टे ओढतात, तर काही चक्क अमेरिकेचा झेंडा चितारतात. या साऱ्यामागे, आपली गाडी रस्त्यावरून धावताना वेगळी दिसावी हा एकच प्रयत्न असतो. त्यासाठी आता काही ठिकाणी खास कार ‘ब्युटी पार्लर्स’ही उभी राहिली आहेत.

जसे गाडीला चमकदार रंग असणे आजची इनथिंग असली तरी ते तसेच सांभाळावे लागतात. एकदा रंग लावला की तो जन्मभर तसाच राहत नाही. तो जपावा लागतो, चमकवावा लागतो, तेव्हा कुठे आपली गाडी ‘वाव ‘ ठरते. या रंगाचे मुख्य शत्रू तीन असतात… एक धूळ, दोन पाऊस आणि तीन घर्षण.

पावसात किंवा सतत पाणी पडत असल्यास गाडीच्या रंगावर परिणाम होतो. चिखल, धूळीचे कण गाडीच्या रंगाची वाट लावतात. तसेच ओरखडे, भिंतीवर गाडी घासल्या पडणारे ओरखडे यामुळेही हा चटकदार रंग विदूप होतो. काही वेळेला रंग उडालेल्या भागावर पाणी पडल्यामुळे पत्रा गंजतो आणि त्या भागाचे पोपडे उडतात. अशा वेळी गाडीचा ‘कलर मेन्टेन’ करण्याची वेळ आली आहे असे समजावे.

गाडीसंबधीच्या सूचना पाळल्या आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या गाडीवर प्रेम केले तर कुणाची हिम्मत आहे गाडीकडे वाकडी नजर करून पाहण्याची? अखेर रंग है तो उसपे गुमान तो करेंगे ही….

– नीलेश बने

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: