यावर आपले मत नोंदवा

चैतन्याचा संचय


[ Tuesday, July 10, 2007 03:48:21 am]

बिरबलाच्या एका गोष्टीमध्ये ‘भाकरी का करपली’, ‘घोडा का अडला’ आदी प्रश्ानंचं उत्तर ‘न फिरवल्याने’ असं असतं. शरीरातही मांसपेशींच्या वेदना, हाडांची झीज, सांध्यांमध्ये कमकुवतपणा का येतो, या प्रश्नांचं उत्तर ‘न फिरवल्याने’ असंच आहे! यांत्रिक सुखसुविधांमुळे शरीराच्या काही भागांमध्ये हालचालीच होत नाहीत. असं बरेच दिवस चालल्याने हळूहळू त्या भागाची कार्यक्षमता कमी होते.

कण्याच्या बऱ्याच हालचालींमध्ये वळवण्याची हालचालच होताना दिसत नाही. त्यामुळे काही त्रास निर्माण होतात. त्यात स्पॉण्डिलायसिस असणाऱ्यांची संख्या अधिक आहे. या विकारामध्ये मान आणि कंबरेजवळच्या मणक्यामध्ये झीज होते. कामाचा अतिरिक्त ताण किंवा आजाराच्या परिणामस्वरूप किंवा वयानुसार ही झीज होते. त्यामुळे पाठ आणि मानेत तीव्र वेदना होतात.

या वेदना टाळण्यासाठी आणि आजाराच्या सुरुवातीच्या वेदनांवर उपचार म्हणून, पोटाच्या-छातीच्या आणि पाठकण्याच्या मांसपेशींना बळकटी येण्यासाठी, कार्यक्षमता सुधारण्यासाठी, फुफ्फुसांची कार्यक्षमता सुधारण्यासाठी, संपूर्ण शरीरात चैतन्यशक्ती येण्यासाठी ‘उत्तान वक्रासन’ उपयोगी ठरतं.

या आसनाच्या नियमित अभ्यासाने तसंच योगिक जीवनशैलीचा अंगिकार केल्याने कंबरेजवळच्या तसंच पोटावर साठलेल्या मेदाच्या वळ्या हळूहळू कमी होतात. शरीराला सडसडीतपणा प्राप्त होतो आणि शरीराची लवचिकता वाढते.

आसन करण्याची पद्धत :

१) जमिनीला पाठ टेकवून झोपावं. २) दोन्ही पाय एकमेकांना जुळवून घ्यावेत. हात शरीराच्या बाजूला असावेत. ३) हळूहळू पाय गुडघ्यात दुमडावेत. असं करताना दोन्ही गुडघे, टाचा आणि पायांची बोटं एकमेकांना चिकटून असावीत. तळपाय जमिनीवर असावेत. दोन्ही हात शरीराला समांतर पसरून मग कोपरात दुमडून हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून मानेच्या खाली घ्यावीत.४) भरपूर श्वास भरून घेऊन हळूहळू श्वास सोडताना दोन्ही पायांचे गुडघे एकमेकांना चिकटलेल्या अवस्थेतच डाव्या बाजूला जमिनीच्या दिशेन खाली आणावेत. ५) एका पायावर दुसरा पाय येईल अशी शरीराची स्थिती असावी. ६) याच वेळी पाय डावीकडे जमिनीच्या दिशेने जात असताना मान एकदमच हळूहळू उजवीकडे वळवावी. कंबरेला बसणाऱ्या सुखद पीळाचा अनुभव घ्यावा. ७) श्वासोच्छवास सहज असावा. डोळे मिटून मन एकाग्र करावं. ८) क्षमतेप्रमाणे या स्थितीत राहिल्यावर परत त्याच क्रमाने पूर्वस्थितीत यावं आणि उलट दिशेने हीच क्रिया करावी. ९) याची चार-पाच आवर्तनं करावीत. १०) या आसनांचा अभ्यास झाल्यावर बसून करण्याचं ‘वक्रासन’ करता येतं.

सावधानी :

१) आसनाच्या अंतिम अवस्थेत स्वत:च्या क्षमतेप्रमाणे जावं. ताठरपणा, ओढाताण टाळावी. २) रुह्वद्वड्ढड्डह्म-स्त्रद्बह्यष् श्चह्मश्ाद्यड्डश्चह्यद्ग चा त्रास असल्यास किंवा पाठीत अत्यंत तीव्र वेदना असताना हे आसन टाळावं.

– डॉ. मधुरा कुलकणीर्

लेखिका एम.डी. (आयुवेर्द-स्त्रीरोग)

आणि योगतज्ज्ञ आहेत

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: