यावर आपले मत नोंदवा

व्याजावरील ‘टीडीएस’ मर्यादा दहा हजार


व्याजावरील ‘टीडीएस’ मर्यादा दहा हजार
Monday, July 9, 2007
अर्थव्यवहार

[ Tuesday, July 10, 2007 01:37:04 am]

प्रफुल्ल छाजेड

शेड्युल्ड बँकांमध्ये ‘टीडीएस’ची मर्यादा २००७-०८च्या केंदीय बजेटमध्ये रु. १०,००० करण्यात आली होती. पण, परिपत्रक मिळाले नाही म्हणून बँका कानावर हात ठेवतात. एका बँकेत विचारणेअंती सांगण्यात आले की, १०,००० रु. ‘टीडीएस’ची मर्यादा ही फक्त ज्येष्ठ नागरिकांना आहे. इतरांना ती रु. ५,०००च आहे. खरी तरतूद काय आहे? मुदत ठेवींवरील उत्पन्नात बचत खात्यांतील (सेव्हिंग्ज अकाउंट) व्याज मिळविले जाते का?

– राऊत, गोरेगाव, मुंबई.

‘ टीडीएस’ची मर्यादा बँक व्याजासाठी रु. दहा हजारांपर्यंत वाढविण्यात आल्याबद्दलची तरतूद इन्कम टॅक्स कायद्याच्या कलम १९४ (अ) (३ सी आय) अंतर्गत देण्यात आलेली आहे. त्यासाठी परिपत्रकाची आवश्यकता नाही. ‘टीडीएस’ मर्यादा सर्वांसाठी एकच आहे. बचत खात्यावरील व्याज हे मुदत ठेवीच्या व्याजात मिळविण्यात येत नाही.

स्त्र आठ वर्षांपूवीर् मी अहमदाबाद येथे राहणाऱ्या माझ्या एका मुलीला घरखरेदीसाठी २,२५००० रु. दिले होते. ही रक्कम मुलीने नंतर २००७ मध्ये मला दोन हप्त्यांत परत केली. मी एक ज्येष्ठ नागरिक आहे. आता मी माझ्या सर्व तीन मुलींना ७५,००० रु. बक्षीस म्हणून दिले आहेत. माझे वाषिर्क उत्पन्न ३०,००० रु. आहे. मला इन्कम टॅक्स रिटर्न भरावा लागेल का? कर किती बसेल? मुलींना इन्कम टॅक्स भरावा लागेल का?

– उत्तम केशव पुसाळकर,बदलापूर.

सर्वप्रथम आपले वाषिर्क उत्पन्न रु. ३०,००० एवढेच असल्यामुळे आपणास इन्कम टॅक्स भरावा लागणार नाही. तसेच विवरणपत्रदेखील भरण्याची आवश्यकता नाही. आपल्या मुली सज्ञान आहेत असे गृहित धरल्यास आपण बक्षीस म्हणून दिलेल्या रकमेवर भविष्यात मिळणारे व्याज मुलींच्याच उत्पन्नात समाविष्ट होईल. आपणास कर भरण्याची आवश्यकता नाही.

( लेखक मुंबईतील व्यावसायिक चार्टर्ड अकाउंटंट आहेत.)

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: