यावर आपले मत नोंदवा

उंदीर, घुशी लावताहेत मोटारींना आगी


[ Wednesday, July 11, 2007 09:32:53 pm]

चिंतामणी भिंडे

ऑटोमोबाइल इंजिनीअर्सनी वर्षानुवर्षं खपून डिझाइन केलेल्या चकाचक मोटारींना क्षुद उंदीर आणि घुशी आगी लावताहेत, हे पटण्यास अवघड आहे ना? पण पावसाळा सुरू झाल्यापासून आगीत होरपळलेल्या मोटारींच्या विनाशामागे याच उंदीर-घुशी आहेत.

मुंबईत मंगळवारी जे. जे. फ्लायओव्हरवर टाटा इंडिगो गाडीच्या इंजिनाने पेट घेतल्यावर गाडी भस्मसात झाली. ठाण्यात तर गेल्या १५ दिवसांत अशा तऱ्हेने गाडी पेटण्याचे तीन-चार प्रकार झाले. मंगळवारी लालबहादूर शास्त्री मार्गावर टिपटॉप प्लाझाच्या समोरच एका क्वालिसने पेट घेतला. त्याआधी दोन दिवस खोपट इथे एक प्रिमियर पद्मिनी जळून खाक झाली. तीन-चार दिवसांपूवीर् मुंबई-नाशिक महामार्गावरही एका गाडीने पेट घेतला होता.

पावसाळ्याच्या दिवसांमुळे उंदीर-घुशींच्या बिळांमध्ये पाणी भरलंय आणि ते सुरक्षित घरांच्या शोधात आहेत. हे उंदीर आणि घुशी गाड्यांच्या खालच्या बाजूने टायरवरून गाड्यांमध्ये शिरून आत बिनदिक्कत मुक्काम ठोकतात. रात्रीच्या वेळी त्यांना या गाड्यांचा मोठाच आधार मिळतो. इंजिन कंपार्टमेंट खुलं असल्यामुळे तिथेही त्यांना सहज प्रवेश मिळतो आणि तिथल्या असंख्य वायरींचा खुराक त्यांच्या दातांना चांगला व्यायाम देतो. उंदीर-घुशींनी वायरी कुरतडल्यामुळे शॉर्टसकिर्ट होऊन गाड्या पेट घेतात.

या वायरींच्या जवळून पेट्रोल-पाइप जात असेल, तर गाड्या पेट घेण्याची शक्यता जास्त असते, असं ठाण्यातील सुनील मोटर्सचे मालक दिगंबर यादव यांनी सांगितलं. प्रत्येक वेळी गाडी पेट घेतेच, असं नाही. कधी कधी नुसताच फ्यूज उडतो आणि गाडी बंद पडते. गाडीत असलेल्या चार इंजेक्टर्सना असलेल्या वायरींपैकी एखादी वायर कुरतडली तरी पेट्रोलच्या पुरवठ्यात अडथळे येऊन गाडी बंद पडते, असं यादव यांनी सांगितलं.

यावर उपाय? अगदीच सोपा आहे. गाडीत रॅटकिलर किंवा रॅट-रिपेलंट ठेवणं. एखादं ब्रँडेड रॅट रिपेलंट घेण्याचीही आवश्यकता नाही. अगदी दोन रुपयांची तंबाखूची पुडीही त्यासाठी पुरते. बॉनेटच्या फ्रेममध्ये तंबाखूची पुडी उघडून लटकत ठेवली की, उंदीर-घुशी गाडीच्या आसपास फिरकत नाही, असंही यादव यांनी सांगितलं. ऐन पावसाळ्यात आपली गाडी आगीच्या भक्ष्यस्थानी पडू नये, असं वाटत असेल तर उंदीर-घुशींना गाडीच्या आसपासही फिरकू देऊ नका.

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: