2 प्रतिक्रिया

आरोग्य विमा महागणार


[ Thursday, July 12, 2007 12:56:01 am]

म. टा. व्यापार प्रतिनिधी

हप्ता भरायचा, नंतर थेट दाव्यासाठी अर्ज करायचा हे आतापर्यंतचे असलेले आरोग्य विम्याचे चित्र आता बदलणार आहे. याची सुरुवात सर्वसाधारण विमा क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी न्यू इंडिया अॅश्युरन्सपासून होणार आहे. आता तुम्ही जसे वृद्ध होत जाल तसा विम्याचा हप्ता वाढणार आहे, शिवाय मुंबईसारख्या शहरात राहत असाल तर अन्य ठिकाणांपेक्षा तुमच्या हप्त्याची रक्कम जास्त असणार आहे.

मुंबईकरांना १५ जुलैपासून दिल्ली किंवा बंगलोरपेक्षा व दिल्ली व बंगलोरकरांना अन्य ठिकाणांपेक्षा जास्त हप्ता आरोग्य विम्यापोटी भरावा लागणार आहे. हॉस्पिटलायजेशनचा मुंबईतील खर्च सर्वात जास्त असल्याने मुंबई ‘झोन १’मध्ये मोडते, तर दिल्ली, बंगलोर ‘झोन दोन’मध्ये व उर्वरीत देश ‘झोन तीन’मध्ये येतो. त्यामुळे दोन लाखांच्या मेडिक्लेम पॉलिसीकरता ५ ते ३५ वर्षांच्या वयोगटातील मुंबईकराला २,५९५ रुपयांचा हप्ता भरावा लागेल, झोन दोनमधल्या ग्राहकांना २,५३० रुपयांचा तर झोन तीनमधल्या ग्राहकांना २,४७० रुपयांचा हप्ता भरावा लागणार आहे. मुंबइ विभागात पॉलिसी घेतली असल्यास देशभरात कुठेही उपचार करून घेतल्यास १०० टक्के संरक्षण घेता येणार आहे, परंतु दिल्ली व बंगलोरमधील पॉलिसीधारक मुंबईतील हॉस्पिटलमध्ये दाखल झाले, तर दाव्यापैकी १० टक्के भार त्यांना उचलावा लागणार आहे, तसेच झोन तीनमधल्या ग्राहकांना त्यासाठी २० टक्के भार उचलावा लागणार आहे.

बालकांसाठीही आता जास्त हप्ता भरावा लागणार आहे. तीन महिने ते पाच वर्ष या वयादरम्यानच्या मुलांसाठीचा हप्ता ५ ते ३५ या वयोगटातील ग्राहकांपेक्षा जास्त असणार आहे. या वयोगटामध्ये दाव्यांचे प्रमाण जास्त असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आतापर्यंत वयोगटांच्या रचनेसाठी १० वर्षांचा काल असायचा, आता हा काल पाच वषेर् करण्यात आला आहे. पासष्ठी पार केलेल्यांसाठी हप्त्याची रक्कम सर्वाधिक असेल, आणि तुम्ही एकदा सत्तरी ओलांडलीत की, वर्षाला २.५ टक्के एवढी हप्त्यात वाढ होणार आहे.

मधुमेह व उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी हप्ता २० टक्क्यांनी वाढतो, परंतु तुम्ही मान्यताप्राप्त व्यायामशाळेत नियमितपणे व्यायाम करत असाल तर २.५ टक्क्यांची सवलत हप्त्यात मिळते. ग्राहकांना देण्यात येणारा बोनसही ५० टक्क्यांवरुन कमी करून ३० टक्के एवढा करण्यात आला आहे. जर तुम्ही सलग दोन वषेर् भरपाईचा दावा केलात आणि ती रक्कम पॉलिसीच्या रकमेच्या ९० टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर पॉलिसीचे नूतनीकरण करताना हप्त्यात २०० टक्के जादा भार लागणार असून भरपाईची वेळ आल्यास ग्राहकाला उपचारांपैकी २५ टक्के खर्चाचा वाटा उचलावा लगणार आहे. दाव्यांवर नियंत्रण राखण्यासाठी सर्व उपाय योजण्यात येत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

2 comments on “आरोग्य विमा महागणार

  1. आपली सुचना चांगली आहे. ती लगेचच अमलातही आणली. उजवीकडे शोधाच्या खाली इंग्रजीमध्ये ‘सर्च’ हा शब्द दिसत आहे. त्यावर टिचकी दिल्यास या अनुदिनीच्या वर क्विलपॅडचा सर्च चा पर्याय उघडतो.
    आपल्या माहितीबद्दल धन्यवाद.

  2. hiii,tumcha blog khoopach chaan aahe..asa wat ta ki u r a professional blogger…n haan tumhi hi site paha hechana tumala marathit lhivna aajun soppa jayil http://www.quillpad.in

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: