यावर आपले मत नोंदवा

गाजर-बिटाचे पौष्टिक कटलेट


[ Thursday, May 10, 2007 09:18:52 pm]

मुलं भाज्या खायला टाळाटाळ करतात. अशावेळी या भाज्या एकत्र करून त्यांचे कटलेट्स बनवता येतील. हे कटलेट्स कमी तेलात बनवता येत असल्याने ते पौष्टिकही असतात. टिफिनसाठी हा उत्तम पर्याय आहे.

साहित्य : प्रत्येकी एक वाटी गाजर आणि बिटाचा कीस, प्रत्येकी १०० ग्रॅम बारीक चिरलेली फरसबी आणि ताजे मटार, दोन मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे, पावाच्या चार स्लाइस, एक लहान कांदा, चार हिरव्या मिरच्या, एक इंच आलं, चिमूटभर साखर, थोडं जिरं, चवीपुरतं मीठ आणि पाव वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर.

कृती : थोड्या तेलावर जिरं आणि हिंग घालून त्यावर सर्व भाज्या वाफवून घ्याव्यात. त्या थंड झाल्यावर मिरच्या, आलं आणि जिरं वाटून घालावं. त्याचबरोबर कांदा, कोथिंबीर, पावाचे तुकडे आणि बटाटं किसून घालावं. या मिश्रणाचे लहान गोळे बनवावेत. या गोळ्यांना आवडेल तसा आकार द्यावा. हे कटलेट्स रव्यामध्ये घोळून तव्यावर शॅलो फ्राय करावेत. पुदिना चटणी किंवा सॉसबरोबर हे गरमागरम कटलेट्स खायला द्यावेत.

– संगीता अक्षेकर, माहीम

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: