यावर आपले मत नोंदवा

चवदार कांगडी व्हॅली


[ Friday, July 20, 2007 11:39:45 pm]
 
 – शेफ निलेश लिमये
 हिमाचलमधल्या कांगडी व्हॅलीमध्ये राहणाऱ्या कांगडी लोकांचा आवडता प्रकार पावासारखा असतो. कणकेत इस्ट घालून केलेला या प्रकाराला ‘सिद’ म्हटलं जातं. हे सिद आधी तव्यावर परतलं जातं आणि मग उकडून घेतलं जातं. साजुक तूप आणि वरणाबरोबर वाढण्याची तिथे पद्धत आहे. कांगडी लोकांमधले बोटी ब्राह्माण हे पुरातन काळापासूनचे आचारी! यांच्या हाताची चव खरोखरीच अनोखी आहे.
 
 ……………………………….
 
 निसर्गाने सौंदर्याची भरभरून लयलूट केलेला सिमल्याला वर्षभरात केव्हाही भेट देता येऊ शकते. पण सिमल्याची खरी ओळख म्हणजे तिथली सफरचंद! परदेशातल्या लालबुंद सफरचंदासारखी जरी ही नसली तरी या सफरचंदांची लज्जत काही औरच लागते. या दिवसात संपूर्ण कांगडी व्हॅली हिरव्या आणि लाल रंगात बदलून जाते. सिमल्याला भेट देण्याचा बेस्ट सिझन म्हणजे जून ते ऑक्टोबर हे पाच माहिने! जुलै महिन्यात झाडांना हिरवी सफरचंदं लागतात आणि मग त्यावर हळूहळू लाल-गुलाबी छटा चढत जाते. ऑगस्टच्या सुरुवातीला गुलाबी रंगांचा गालिचा सर्वत्र पसरायला लागतो. धुक्याची पातळ शाल ओढलेली सृष्टी, पावसाची रिपरिप आणि अचानक मधूनच डोकावणारा सूर्य… धुक्याची चादर बाजूला सरली की मग समोर दिसते ती हिरवीगार वनसृष्टी आणि त्यातून वाहणारे पाण्याचे झरे. याच झऱ्यांपाशी असणारे काही शाकाहारी जेवणाचे ढाबे आणि खास विदेशी पर्यटकांच्या जिभेचे चोचले पुरवणारे ढाबे अशी दुहेरी खासियत इथे पाहायला मिळते.
 
 शाकाहारी ढाब्यांवर मिळणारे साजुक तुपातले आलू के पराठे, गोड दही आणि मिश्र भाज्यांचं पंजाबी लोणचं! तिन्ही खाण्याच्या वेळी असा बेत तुम्ही हमखास आखू शकता. पराठ्यांमध्ये व्हरायटी आणण्यासाठी बटाट्याऐवजी फ्लॉव्हर, पनीर किंवा मुळ्याचा वापर करता येण्यासारखा आहे. भरगच्च सारण भरून केलेल्या पराठ्यात कणीक जेमतेम असल्यामुळे हे पराठे खाल्ल्यानंतर जड वाटत नाहीत.
 
 विदेशी पर्यटकांसाठी या ढाब्यांवर तिथली खासियत असलेले मासे मिळतात. त्याला रेनबो ट्राऊट म्हटलं जातं. तेलकट प्रकारात गणना होत असलेले हे मासे लागतात अतिशय लज्जतदार! तिथे सध्या ट्राऊट फामिर्ंग जोरात सुरू आहे. हिमाचल सरकार आणि नॉवेर्मधील एका फिशिंग संस्थेने मिळून चालवलेला तो उपक्रम आहे. हे मासे सॅल्मन माशाच्या गटात मोडणारे असून ते गोड पाण्यात राहतात आणि फक्त थंडगार पाण्यातच जगतात. त्यामुळे मुंबईत ज्या काही हॉटेल्समध्ये ते मिळतात ते खास हिमालयातून मागवले जातात. या माशांवर असलेल्या तेलकट थरामुळे तिथल्या कोवळ्या उन्हात ते सप्तरंगी दिसतात. मासे पकडल्याबरोबर लगेच ते व्हिनेगरच्या पाण्यामध्ये टाकले जातात. याने त्या माश्यांवर निळा थर येतो. ही डिश अव्वाच्या सव्वा भावात विकली जाते. पण याची लज्जत चाखावी तर तिथेच. एरवी रेनबो ट्राऊटची चव लिंबाचा रस, मीठ, मिरपूड आणि ताजं लोणी एवढ्यावरही क्लासिक लागते. पण म्हणतात ना, ‘घर की मुगीर् दाल बराबर’! स्थानिक लोकांना हे मासे खाण्याचं वेड नाही.
 
 सफरचंदाबरोबर तिथे पीच, प्लम, अॅप्रिकॉटसारखी एक्झॉटिक फळांचीही लागवड होते. या मोसमात गेलात तर बाजारातून ही फळ आणून तिथेच जॅम बनवून पाहा. अगदी कॅनिंगसह – कसं ते पुढे दिलं आहेच.
 
 हिमाचलमध्ये राहणाऱ्यांना कांगडी म्हटलं जातं. त्यांचा लोकप्रिय प्रकार पावासारखा असतो. कणकेत इस्ट घालून केलेला या प्रकाराला ‘सिद’ म्हटलं जातं. हे सिद आधी तव्यावर परतलं जातं आणि मग उकडून घेतलं जातं. साजुक तूप आणि वरणाबरोबर हे वाढण्याची तिथे पद्धत आहे. तसंच तिथे दलियाही खूप खाल्ला जातो.
 
 कांगडी लोकांमध्ये बोटी ब्राह्माण पुरातन काळापासून आचाऱ्याचे काम करत आले आहेत. (त्यांना असं उच्चारलेलं आवडत नाही.) यातील बरेच लोक हॉटेल व्यवसायात आहेत. यांच्या हाताची चव खरोखरीच अनोखी आहे. तसं पाहिलं तर हिमाचल प्रदेशमध्ये चंबळ, नाकोर्न्डा या भागातली स्वैपाकाची पद्धत आणि लाहौल-स्पीती-लडाख इथली पद्धत खूप वेगळी आहे. इथली खाद्यसंस्कृती त्यांच्या मिळकतीवर अजूनही अवलंबून आहे. त्यात हा प्रदेश डोंगरमाथ्यावरचा. सफरचंदाची लागवड इथे अनपेक्षितपणे झाली आणि त्याचा फायदा आपल्याला आज होतोय.
 
 डोंगर दरीत लोक कसे राहू शकतात, ही आपल्यासाठी नवलाईची गोष्ट आहे. रस्त्याच्या एका बाजूला डोंगर, ३-४ फूट रस्ता, मग दुसऱ्या बाजूला डोंगर आणि त्यावर दिसणारी १०-१५ घरांची कॉलनी. त्या कॉलनीत राहणारी एक छोटी मुलगी बसमधून उतरते. हातातलं गाठोडं तिथे असलेल्या एका लाकडी बॉक्समध्ये ठेवते. हा लाकडी बॉक्स डोंगरावरच्या घरांवर पोहोचण्यासाठी ट्रॉलीच्या साह्याने वर खेचला जातो. तो प्रकार पाहून त्या गाठोड्यात किती दिवसांची सामग्री असेल आणि ही छोटी मुलगी आपल्या घरी कशी आणि केव्हा पोहोचेल, असे प्रश्न विचारायची हिंमत झाली नाही. अजूनही हे प्रश्न मला भेडसावत आहेत. तिथल्या लोकांची टूरिझमवर चलती असल्याने येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत आपुलकीने केलं जातं. मात्र एकच काळजी घ्यायची. मालकाची ओळख होईपर्यंत झाडावरच्या सफरचंदांना हात लावायचा नाही.
 ……………………………………………………..
 
 अॅपल जॅम
 
 काचेची बॉटल स्वच्छ धुऊन-पुसून वाळवून घ्यायची. २ किलो सफरचंदाचे बारीक काप करायचे. एका पॅनमध्ये दीड काडी दालचिनी, थोडंसं शाही जिरं, २-३ तमालपत्र, ४ ते ५ बिया काढलेल्या सुक्या लाल मिरच्या, चार चमचे विनेगर. एक वाटी साखर हे सर्व साहित्य एकत्र करायचे. साखर विरघळली की त्यात विनेगर घालून साधारण अर्धा ते पाऊण तास शिजवून घ्यायचं. हा जॅम बॉटलमध्ये भरून झाकण घट्ट लावायचं. नंतर प्रेशर कुकरमध्ये पाऊण तास शिट्टी न लावता वाफवून घ्यायचं.
 
 असं करण्याने बॉटलचं झाकण सिल होतं. हा जॅम बॉटल न उघडता महिनाभर चांगला राहतो. पण जर उघडला तर चार ते पाच दिवसापेक्षा अधिक काळ टिकत नाही

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: