यावर आपले मत नोंदवा

डाएट की उपास?


[ Friday, August 03, 2007 09:52:40 pm]

जंक फूड किंवा अवेळी खाण्याने वजन वाढलं की डाएट करण्याची वेळ येते. आजच्या धकाधकीच्या जीवनात वेळेेवर न खाण्याला आपणच जबाबदार आहोत. पण जे काही खायचंय ते पौष्टिक असावं. बिर्याणी, पास्ता किंवा मेयॉनेजविरहित सॅलेड्स वगैरे खायला हरकत नाही. सॅण्डविचसाठी ब्राऊन ब्रेड वापरावा नाहीतर क्लिअर सूप हाही एक चांगला पर्याय आहे. क्रॅश डाएट करण्याऐवजी डाएट हेल्दी ठेवून आरोग्य सांभाळता येऊ शकतं.

…………………

रतातील विविध शहरांमधल्या पक्वान्नांच्या सफरीचा आस्वाद घेताना या वेळी छोटीशी विश्रांती घ्यायचं ठरवलं. श्रावणही जवळ आलाय, तेव्हा आहारावर किंवा आवडी-निवडींवर ब्रेक लावला पाहिजे. उपवासाच्या माध्यमातून ब्रेक लावण्यामागे कुणाची श्रद्धा असू शकते किंवा चेंज म्हणूनही त्याच्याकडे पाहता येईल. उपवासाचे पदार्थ रोजच्या जेवणामधला एक चेंज असला तरी तो भरगच्च खाण्याचाही ठरू शकतो. पूवीर्च्या काळी मात्र असं नसायचं. तेव्हा उपवास मोजकेच पदार्थ खाऊन केले जायचे. म्हणूनच मला वाटतं की आजचं डाएट म्हणजेच पूवीर्चे उपवास!

या व्यवसायामुळे माझ्या विविध क्षेत्रांतील लोकांशी ओळखी झाल्या आहेत. सध्याची खाद्यसंस्कृती पाहता खाण्या-पिण्याला कुठेच आळा घातलेला दिसत नाही. दोन्ही वेळचं जेवण सर्रास रेस्तराँमध्ये केलं जातं. मग ते जंक फूड असो वा तेलकट-मसालेदार! हॉटेलच्या किचनमध्ये काम करणारा मी तुम्हाला ठामपणे सांगतो, की रोज बाहेर जेवणं चांगलं नाही; पण अनेकदा आपल्यापुढे पर्याय नसतो. अशा खाण्याला बॅलन्स करण्यासाठी ओघाने आठवते ती डाएट थेरपी! मग सुरू होतात वेगवेगळ्या प्रकारची डाएट्स! लो-कॅलरीज, हाय प्रोटिन्स, लो-फॅट, रिच फायबर… असे नाना प्रकारची डाएट्स आहेत. हृदयविकार, डाएबिटिस किंवा आजारपणामुळे काहींना पथ्यं सांभाळावी लागतात. पण तरीही त्यातल्या बऱ्याच खवय्ये मंडळींना खाण्याची अत्यंत आवड असते. त्यांच्या पुढे जे येईल त्यावर ते ताव मारतात. काहीजणांचं तर रोज अरबट-चरबट खाणं होतं. रात्री उशिरा किंवा अवेळी जेवण होतं. नंतर वजन वाढलं की अशा लोकांना डाएट करणं भाग पडतं. ते करताना त्यांना कठीणही जातं.

शेफ आणि डाएटिशियन यांचा नेहमीच छत्तीसचा आकडा राहिला आहे. आम्ही जिभेचे चोचले पुरवणार तर डाएटिशियन खाऊ नका असं सांगणार. सध्या परिस्थिती बदलतेय. फिटनेसबाबत जागरूकता वाढतेय. पोटावर दडपण आणून जेवणं लोकांना मान्य नाहीय. रेस्तराँमध्ये गेल्यावर कमी तेलाचा किंवा अजिनो-मोटोच्या वापराबद्दल चौकशी करणाऱ्या हेल्थ कॉन्शस लोकांना मग डाएटिंग करण्याची गरज पडत नाही.

डाएट म्हणजे कमी जेवण असं नाही, तर योग्य आणि वेळेवर आहार घेणं हे आहे. योग्य म्हणजे चांगल्या आणि माफक तेलात केलेला स्वैपाक! घरचं लोणी किंवा साजूक तूप वापरलं तर उत्तम! वनस्पती तूप आरोग्याला हानीकारक असल्याचं आपण सगळे जाणतोच. अशा पदार्थांवर परदेशात बंदी आहे. ऑलिव्ह ऑइल किंवा राइस ब्रॅन ऑइल वा सोयाबिन तेल हे आरोग्यासाठी उत्तम आहे. तेल आणि त्याचे प्रकार यावर पुढच्या लेखात सविस्तर माहिती देईन.

आजच्या धकाधकीच्या जीवनात वेळेेवर न खाण्याला आपणच जबाबदार आहोत. तरीही जेव्हाही खाण्याची वेळ येईल तेव्हा पौष्टिक आहार असणं महत्त्वाचं आहे. अवेळी खायचं असेल तर नुसती बिर्याणी किंवा पास्ता खाऊ शकता किंवा एखादं मेयॉनेजविरहित सॅलेड खावं. सॅण्डविच खायचं असेल तर ब्राऊन ब्रेड वापरावा नाहीतर क्लिअर सूप हाही एक चांगला पर्याय आहेच.

* घरच्या घरी आइस्क्रीम कसं बनवावं? – राजू पाटील

घरगुती आइस्क्रीम बनवण्यासाठी अंड चालत असेल तर ते किंवा अंड्याऐवजी कण्डेन्स्ड मिल्क आणि दुधाची पावडर वापरावी; आइस्क्रीम मेकर हे यंत्र किंवा हॅण्ड-ब्लेण्डर वापरावं. कारण आइस्क्रीमचं मिश्रण दोनदा एकजीव करावं लागतं.

सोबत आइस्क्रीमची रेसिपी दिलेली आहेच. करून पाहा. कोण म्हणतं आइस्क्रीम फक्त उन्हाळ्यात खायचं?

……………………………

‘ जलेटो ऑन स्टोन’

आइस्क्रीम प्रेमींसाठी पावसाळ्यात जलेटोने ‘जलेटो ऑन स्टोन’ ही फ्रोजन आणि कोल्ड मेजवानी आणली आहे. इटालिअन फ्लेवर्सच्या आइस्क्रीममध्ये नट्स, चॉकलेट्स, ताजी फळं, विविध सॉसेस, केक्स आणि कॅण्डीजची चविष्ट साथ हे जेलेटोचं खास वैशिष्ट्यं. जेलेटोच्या या नवीन फ्लेवरमध्ये कोल्ड स्टोन इटलीमधून मागवण्यात आले आसून ते ठराविक तापमानाला ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे फ्रोजन आणि कोल्ड ग्रानाइट स्टोनमध्ये घोळवलेल्या नट्स, फ्रुट्स, सॉसेस मिश्रित आइस्क्रीमची लज्जत एकदा तरी चाखायला हवी.

मुंबईमध्ये अंधेरी, मालाड आणि कांदिवलीच्या फेम अॅडलॅब्समध्ये जेलेटो विटारियो आइस्क्रीम पार्लरची नवीन आऊटलेट्स सुरू आहेत. जेलेटोचं आइस्क्रीम शाकाहारी असून त्यात ताजं दूध, मलई, रसरशीत फळं, नट्स, साखर आणि नैसिगिर्क घटकांनी युक्त आहे. जेलेटोमध्ये सॉरबेट, स्लशेस, यॉगर्टस्, मिल्कशेक्स अशा चविष्ट फ्लेवर्सची वेरायटी असून शुगर फ्री डेझर्टस् आणि हेल्थ ड्रींक्सची मजाही लुटता येईल.

………………………………….

बास्कीन रॉबिन्सचे यम्मी ‘फ्रीडम’ फ्लेवर्स

पावसाळयात बास्कीन रॉबिन्सच्या केशर, वेलची, पपई, लिंबू, संत्र, चॉकलेट या यम्मी फ्रीडम फ्लेवर्सची चव चाखायला मिळणार आहे. यामध्ये जॉय ऑफ फ्रीडम, कलर्स ऑफ फ्रीडम, टेस्ट ऑफ फ्रीडम असे तीन नवीन फ्लेवर्स उपलब्ध आहेत.

जॉय ऑफ फ्रीडममध्ये केशर, वेलची आणि बदाम यांचा चविष्ट मिलाफ असून त्यावर स्ट्रॉबेरीचं टॉपिंग्ज आहे. कलर्स ऑफ फ्रीडममध्ये संत्र, अननस आणि लिंबू सारख्या सॉरबेट फ्लेवर्सवर बटर स्कॉचचं टॉपिंग्ज मिळेल. तर टेस्ट ऑफ फ्रीडममध्ये चॉकलेट आईस्क्रिमवर कॉफी आणि चॉकलेट्सचे क्रिस्पी बाईट्स असून त्याची लज्जत वाढवायला हॉट फजचं टॉपिंग्ज आहे. हे टेस्टी फ्लेवर्स मुंबईतील सर्व बास्किन रॉबिन्स आईस्क्रिम पार्लर्समध्ये ट्राय करता येतील. त्यांची किंमत ४४ रूपये अधिक टॅक्स एवढी आहे. त्यामुळे रेग्युलर, नॅचरल, सिझनल या फ्लेवर्सबरोबर फ्रीडम फ्लेवर्सची मेजवानीही चाखता येईल.

……………………………..

न्यूझिलॅण्ड आइसक्रीम आता मुंबईत

आइसक्रीमच्या उत्पादनात जगभरात लोकप्रियता मिळवलेल्या न्यूझीलंड नॅचरल्स कंपनीने आपलं आइसक्रीम आता मुंबईच्या बाजारपेठेत दाखल केलं आहे. तब्बल ७० प्रकारच्या वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये सॉरबंेट, फ्रोजन यॉगर्ट, स्किम मिल्क स्मूदीज अशी वेरयायटी उपलब्ध आहे. यातले चिलोचे फ्लेवर्स जगभरात विशेष लोकप्रिय आहेत. यात चोकोचिलो, कॅपचिलो यांचा खास समावेश आहे. याबरोबरच हेल्थ कॉन्शस लोकांसाठीही न्यूझीलंड नॅचरल्सनी काही फ्लेवर्स आणले आहेत. ही आइसक्रीम्स मुंबईच्या अॅन्ट्रम मॉलमध्ये उपलब्ध असतील.

…………………………

व्हॅनिला आइस्क्रीम

साहित्य : २ कप दूध, २ कप क्रीम, दीड कप साखर, व्हॅनिला इसेन्स, ५ अंडी (पिवळा बलक).

कृती : दूध आणि क्रीम एकत्र करून उकळी येईपर्यंत गरम करून घ्यावं. त्यात साखर विरघळून दूध गार करायला ठेवावं. अंड्यातला पिवळा बलक फेटून घ्यावा. त्यात दूध घालून भांडं मंद आचेवर ठेवावं. मिश्रण सारखं ढवळत ठेवावं. मिश्रण थोडंसं घट्ट झाल्यावर गाळून घेऊन गार करायला ठेवावं. त्यात व्हॅनिला इसेन्स घालावं. मग आइस्क्रीम मेकर किंवा हॅण्ड-ब्लेण्डरने फिरवून घ्यावं. दोन तासांनी फ्रीजमधून काढून पुन्हा एकदा हॅण्ड-ब्लेण्डरने एकजीव करून घ्यावं आणि ३-४ तास सेट करायला ठेवावं.

– निलेश लिमये

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: