2 प्रतिक्रिया

डाएट पावसाळ्यातला


[ Friday, August 03, 2007 09:50:12 pm]

खमंग आणि तिखट, झणझणीत खाण्याची इच्छा पावसाळ्यात अधिक वेळा होते. मग, सुरुवात होते, ती वडे, समोसा, भजी खाण्याची आणि त्याबरोबर मस्त चहा! वा, तोंडाला पाणी सुटलं, ना? पण सतत असे पदार्थ खाणं आरोग्यासाठी योग्य नाही. जीभेला ‘टेम्प्ट’ करणाऱ्या या खाण्यावर नियंत्रण मिळवायला हवं. रस्त्यावरील असे पदार्थ खाऊ नका.ू पनीर, लस्सी यासारखे दुधाचे पदार्थ टाळणं अधिक योग्य. या काळात अशा पदार्थांमध्ये जंतू निर्माण होण्याची शक्यता अधिक असते.

पावसाच्या या मौसममध्ये बालीर्, ब्राऊन राइस (हातसडीचा तांदूळ) आणि ओट घेणं उत्तम.

अन्न शिजवताना त्यात वेलची, दालचिनी आणि बडीशेप घातल्यास फायदेशीर ठरेल. पोटात गॅस होण्यावर हा उपाय आहे. राजमा, कोबी, चणे हे पदार्थ खाऊ नका.

पावसाळ्यात सगळीकडे ओलसर आणि दमटपणा पसरतो. यामुळे विषाणू तयार होत असतात. तसंच माशांचा उपदव वाढतो. म्हणूनच अन्न शिजवताना स्वच्छतेची काळजी घ्या. रस्त्यावरचे पदार्थ खाऊ नका.

पाणी पिताना उकळून आणि गाळून घ्या.

सलाड खाणाऱ्यांनी हॉटेल, अशा बाहेरच्या ठिकाणचं सलाड खाताना काळजी घ्यावी. याचं कारण म्हणजे पावसाळ्यात विषाणूंचा फैलाव अधिक प्रमाणावर होतो. बाहेरच्या ठिकाणी सलाड किती स्वच्छ करून घेतलं आहे, याचा आपल्याला काहीच अंदाज नसतो.

कलिंगडासारखी पाणीदार फळं किंवा पाणी असणारे बाहेरचे पदार्थ खाऊ नका.

अन्न नीट शिजवूनच खा.

सफरचंद, पीच, प्लम, लिची आणि पीअर ही फळं या मौसममध्ये खाणं चांगलं.

अॅक्नेचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी चॉकलेट, चीज यासारखे पदार्थ टाळावेत.

एकाच वेळेस भरपूर खाऊ नका. थोड्या थोड्या वेळाने थोडं थोडं अन्न घ्या.

मटण आणि करी टाळा.

– मॉस टीम

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

2 comments on “डाएट पावसाळ्यातला

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: