१ प्रतिक्रिया

एक नविन अनुदिनी


मंडळी, सध्या वर्डप्रेसवर एक नविन अनुदिनी आली आहे, ‘मनातल‘ नावाची. नाव जरी मनातला असलं तरी त्यावरचे लेख मात्र इतरांच्या मनातले असतात. म्हणजे असे की, या अनुदिनीचे मालक श्री. संदिप काकडे यांनी विविध अनुदिन्यांवरचे लेख त्यांच्या अनुदिनीवर डकवायला सुरूवात केली आहे. परंतु असे करताना मात्र ते मूळ दुवा, मूळ लेखकाचे नाव द्यायचे सोयीस्करपणे विसरतात. वानगी दाखल तुम्ही, माझ्या अनुदिनीवरून घेतलेली आणि माफक बदल करून त्यांच्या अनुदिनीवर चिकटवलेली हे काही लेख पाहू शकता.

ब्लॉगवरचे – मूळ माझ्या ब्लॉगवरचे (https://majhimarathi.wordpress.com)
कात्रणे – कात्रणे (https://majhimarathi.wordpress.com/कात्रणे/)
या ब्लॉगबद्दल थोडेसे – या अनुदिनीबद्दल थोडेसे (https://majhimarathi.wordpress.com/या-अनुदिनीबद्दल-थोडेसे/)
फॉन्ट प्रोब्लेम ? – फॉन्ट प्रोब्लेम ?(https://majhimarathi.wordpress.com/font-problem/)

केवळ माझेच नाही तर इतर अनेकांचे लिखाण मी या पध्द्तीने इथे पाहीले आहे.

मी सुध्दा; विविध वॄत्तपत्रातली माहिती माझ्या अनुदिनीवर ‘कात्रणे’ या शिर्षकांतर्गत संकलीत करून देते. पण तसे करताना कधीही प्रकाशनचे आणि मूळ लेखकाचे नाव दडपण्याचा मी कधीही प्रयत्न केला नाही. या गोष्टीचे पुरावे तुम्हाला जागोजागी माझ्या अनुदिनीवर सापडतीलच. आजकाल बरेचजण, आर.एस.एस. फीड द्वारे इतर अनिदिन्यांवरचे लेखन आपल्या अनिदिनीवर वळवतात. पण यात मूळ अनिदिनीचा दुवा दिलेला असतो; क्वचित लेखकाचे नावही असते.. शिवाय या प्रकारात पूर्ण लेख छापला जात नाही. तर सुरूवातीच्या काही वाक्यांची यात त्रोटक नोंद असते.

तर ‘मनातला’ वरच्या ‘मी कोण ?’ या सदर लेखकाच्या (?) लेखावर मी प्रतिसादही दिला होता, पण त्यावर त्यांचे प्रत्युत्तर मिळाले नाही. दुसरा उपाय म्हणून वर्डप्रेसच्या टीम ला हे सगळे कळवले, त्यांची कारवाई होईल तेव्हा होईल. परंतु समस्त ‘नेट’ करांना ही वस्तुस्थिती माहीत व्हावी या उद्देशाने हा लेखप्रपंच.

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

One comment on “एक नविन अनुदिनी

  1. हे थांबायलाच हवे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: