2 प्रतिक्रिया

चटपटीत बटाटे


[ Wednesday, July 04, 2007 01:02:17 am]

झटपट रेसिपीज
भाजीमध्ये बटाटं नसेल तर ती अपूर्णच वाटते. कधी इतर भाज्या नसतील तर नुसत्या बटाट्यांचीही भाजी करता येते. शिवाय त्यापासून इतर अनेक पदार्थंही बनवले जातात. चहाच्या वेळेस काही चटपटीत पदार्थ बनवायचा असेल तर ही रेसिपी ट्राय करा. २५-३० मिनिटांमध्ये हा पदार्थ बनतो.

चटपटीत बटाटे
साहित्य : एक किलो बटाटे (कमी पाण्यात उकडावेत. सालं काढून त्याचे मोठे चौकोनी तुकडे करावेत), एक ते दीड कप साधारणं आंबट दही, अर्धा कप भाजलेले तीळ, एक टीस्पून तेल आणि चवीनुसार मीठ.

कृती : भाजलेले तीळ आणि मिरच्यांचं वाटण करून घ्यावं. या वाटणात दही घालावं. हे मिश्रण एकजीव करून बाजूला ठेवावं. मध्यम आचेवर एक नॉन-स्टिक पॅन गरम करत ठेवावा. त्याला तेलाचा हात लावावा. त्यात हे वाटण घालावं. थोडावेळ परतल्यावर त्यात मीठ घालावं. आता त्यात बटाटे घालावेत. बटाट्यांना वाटण नीट लागेपर्यंत परतावं. आता आच वाढवावी. पाणी निघून जाईपर्यंत परतावं. स्टार्टर किंवा स्नॅक म्हणूनही हा पदार्थ खाता येईल.

– वीणा सोंढे, वरळी

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

2 comments on “चटपटीत बटाटे

  1. which type of mirchi ?

    Sukhya laal mirchya ? ki Green mirchi

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: