यावर आपले मत नोंदवा

बदाम मॅजिक


 [ Monday, July 02, 2007 04:21:52 am]

पावसाळा सुरू झाला की हवेत गारवा येऊ लागतो. हा गारवा पुढे हिवाळ्यातही कायम असतो. अशा थंड हवेत पौष्टिक आहार घेणं अत्यंत आवश्यक असतं. याकामी नट्स बरीच मदत करू शकतात. नट्सच्या दुनियेतलं एक लोकप्रिय नाव म्हणजे बदाम. बदाम केवळ आपल्याकडेच नाही तर परदेशातही लोकप्रिय आहेत. जगभरात पिकणाऱ्या बदामांपैकी ८० टक्के उत्पादनाचं श्रेय कॅलिफोनिर्याला जातं. बदामाला सर्वाधिक मागणी असते चॉकलेट बनवणाऱ्या ब्रॅण्डसकडून. जगभरात पिकणाऱ्या बदामांपैकी ४० टक्के बदाम चॉकलेट्ससाठी वापरले जातात.

बदामांचे दोन प्रकार आहेत. ज्या झाडांना बरेचदा पांढरी फुलं येतात त्यांचे बदाम गोड असतात तर ज्या झाडांना गुलाबी फुलं येतात त्यांचे बदाम चवीला कडू असतात. विसाव्या शतकापर्यंत बदामाचं तेल औषध म्हणून वापरलं जाई. कडू बदाम हे गोड बदामांच्या तुलनेत रुंद आणि बुटके असतात. या बदामांमध्ये ५० टक्के तेल असतं. गोड बदामाचं तेल विशेषत: मालिशसाठी वापरलं जातं. या तेलामुळे कांती सतेज होते, असं म्हणतात.

बदाम ज्याप्रमाणे कच्चे किंवा रोस्ट करून खाल्ले जातात, तसेच ते अनेक पदार्थांमध्येही वापरले जातात. इतर नट्सबरोबर ते डेझर्ट्स, सण्डेज आणि इतर आइस्क्रीम बेस्ड पदार्थांमध्ये वापरले जातात. गोड बदामांमध्ये काबोर्हायड्रेट्स अजिबात नसतात. आपल्याकडे श्रीखंड, खीर आणि हलव्यांमध्ये बदाम आवर्जून वापरले जातात. ‘बदाम कतली’ ही खास बदामापासून बनवली जाणारी मिठाई अत्यंत लोकप्रिय आहे. बदामांमध्ये केवळ मुबलक ‘ई’ जीवनसत्वच नसतं तर त्यात भरपूर मोनोसॅच्युरेटेड फॅट्सही असतात. या ‘चांगल्या’ फॅट्समुळेच कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत होते.

बदाम कवचाशिवाय आणि कवचासहही विकत मिळतात. आपण शक्यतो कवचविरहित बदामच घेतो. तुम्ही कवचासह बदाम घेत असाल तर ते हलवून पाहा. आवाज बराच असेल तर ते बदाम जुनाट आणि उतरलेले असल्याची शक्यता असते. ताज्या बदामाचे मधोमध दोन तुकडे करा. आतला भाग दुधासारखा पांढराशुभ्र असल्यास तो बदाम ताजा आहे, याची खात्री बाळगा. मात्र हा भाग पिवळसर असल्यास त्याची चव उतरली आहे, हे समजून जा. बदाम सालीसकटच खाल्ले जातात. परंतु कधीकधी ही साल कडूही लागते. त्यामुळे बदाम कुठल्याही पदार्थात टाकण्याअगोदर त्याची चव घेणं अत्यंत आवश्यक आहे. बदाम थंड आणि अंधाऱ्या ठिकाणी साठवल्यास ते दोन वर्षं टिकू शकतात. पॅकबंद रोस्टेड बदामही दोन वर्षं टिकू शकतात. हे दोन्ही प्रकारचे बदाम फ्रीजमध्ये साठवल्यास दोन वर्षांपेक्षा अधिक काळ टिकतात. नट्स अधिक काळ टिकवून ठेवण्यासाठी त्याला ओल लागता कामा नये.

सफरचंद आणि बदामाचा हलवा

साहित्य : चार सफरचंदांचा कीस, एक कप बदाम, पाव कप साजूक तूप, पाऊण कप साखर, दोन दालचिनीच्या काड्या, दोन हिरव्या वेलच्या, एक कप मिल्क पावडर.

कृती : बदामाची पेस्ट बनवावी. एका जाड बुडाच्या एका पॅनमध्ये तूप गरम करावं. त्यात सफरचंद आणि साखर घालून ते परतावं. या मिश्रणाचा पोत बदलेपर्यंत ते परतावं. सफरचंदांबरोबर साखर घालणं अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा सफरचंदाच्या कीसचा गोळा होईल. आता त्यात दालचिनी आणि वेलची घालून परतावं. नंतर त्यात बदामाची पेस्ट घालून मोठ्या आचेवर दोन ते तीन मिनिटांसाठी परतावं. आता आच मंद करून त्यात मिल्क पावडर घालावी. मिल्क पावडरऐवजी खवाही घालता येईल. आता तो मंद आचेवर चांगला परतावा. गरम असतानाच खायला द्यावा.

संजीव कपूर

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: