१ प्रतिक्रिया

संदेसे आते है..


[ Friday, August 17, 2007 01:33:16 am]

मोबाइलवरून आज ‘इन्स्टंट’ संपर्क होत असल्याने पत्रलेखन हा प्रकारच कमी झाला आहे. ज्यांच्या घरी कम्प्युटर आणि इंटरनेट आहे त्यांच्यासाठी तर असा संपर्क करणे फारच सोपे होत आहे. याचे कारण ‘इन्स्टंट मेसेंजर’ नावाचा आधुनिक डाकिया आपल्या मदतीला आला आहे. तोही असा की एका वेळेस अगणित लोकांशी संपर्क साधून देऊ शकतो.

संदेसे आते है… असे म्हणत ‘डाकिया’ची वाट पाहायचे दिवस कधीच सरले. म्हणूनच या ‘डाकिया’च्या हातात सरकारला मोबाइल द्यावा लागला. मोबाइलवरून आज ‘इन्स्टंट’ संपर्क होत असल्याने पत्रलेखन हा प्रकारच कमी झाला आहे. ज्यांच्या घरी कम्प्युटर आणि इंटरनेट आहे त्यांच्यासाठी तर असा संपर्क करणे फारच सोपे होत आहे. याचे कारण ‘इन्स्टंट मेसेंजर’ नावाचा आधुनिक डाकिया आपल्या मदतीला आला आहे. तोही असा की एका वेळेस अगणित लोकांशी संपर्क साधून देऊ शकतो. त्यामुळे आपल्या मित्रमंडळींच्या यादीत जो जो आहे, त्याने मेसेंजर सुरू केला की त्याची खबर त्याच्या यादीतल्या सर्वांना मिळते. आज शिकण्यासाठी वा नोकरीसाठी परदेशी जाणाऱ्या मराठी मुलांच्या संख्येमध्येही चांगल्यापैकी वाढ झाली आहे. खरे म्हणजे त्यातले नावीन्य कधीच संपले आहे. त्यामुळे मुले लंडन, अमेरिकेत अथवा दुसऱ्या देशात आणि वयस्कर पालक भारतात असे चित्र नवीन राहिलेले नाही. म्हणूनच या मेसेंजरद्वारे संपर्क साधणे, हा या मुलांशी अथवा आपल्या मित्रमैत्रिणींशी संवाद साधण्याचा उत्तम उपाय आहे.

हे मेसेंजर वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत. याहू, एमएसएन, गूगल, रीडिफ या कंपन्यांनी आपापले मेसेंजर आणले आहेत. काही काळापर्यंत अशी परिस्थिती होती की याहू मेसेंजरवरून याहूच्याच मेसेंजरवर संपर्क करता येत असे, तसेच एमएसएनचे. तेच गूगलचे. पण आता हे बदलत आहे. ते जसे केवळ टेक्स्ट मेसेजेस पाठविण्यापुरते मर्यादित राहिले नाहीत, तसेच एका मेसेंजरवरून दुसऱ्या प्रकारच्या मेसेंजरवर संपर्क साधण्याची सोयही आता होत आहे. याहू आणि एमएसएन यांच्यावर परस्परांच्या मेसेंजरवर बोलता येते. ट्रिलियनसारख्या मेसेंजरमध्ये तर ही सोय अतिशय चांगल्या पद्धतीने उपलब्ध आहे. गूगलमध्ये मात्र दुसऱ्या मेसेंजरला सध्या तरी परवानगी नाही. पण गूगलमध्ये होत असलेले बदल पाहता ही सोय नजीकच्या काळात झाली तर आश्चर्य मानायला नको.

या मेसेंजरचे काम अर्थातच संदेशांची ‘लाइव्ह’ देवाणघेवाण करणे हे असले तरी हे त्याचे एकमेव काम नाही. दुसरा सर्वात महत्त्वाचा उपयोग म्हणजे ई-मेल अॅलर्ट. तुमच्या मेलच्या इनबॉक्समध्ये कोणाचाही मेल आला की तात्काळ त्याची सूचना तुम्हाला एका पॉपअप विंडोद्वारे मिळते. कम्प्युटरच्या उजव्या कोपऱ्यात खालील बाजूला एक मेसेज देणारा बॉक्स आपोआप वर येतो. तीच ही पॉपअप विंडो. याचा मुख्य फायदा असा की तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या ई-मेलच्या प्रतीक्षेत असाल तर तुम्हाला कायम इनबॉक्स ओपन करून ठेवावा लागत नाही. तुम्ही कम्प्युटरवर कोणतेही काम करत असलात तरी मेसेज आल्याबरोबर आपोआप विंडो वर येते आणि तुम्हाला मेल आल्याचे सांगते. तुम्ही गुगलचा मेसेंजर वापरत असाल (त्याचे नाव गूगल टॉक) तर या मेसेजमधले पहिले काही शब्दही विंडोमध्ये दिसतात. त्यावरून हा मेल किती अर्जंट आहे ते तुम्ही ठरवू शकाल व त्यावरून तो लगेच ओपन करायला हवा का, याची कल्पना येईल.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या मेसेंजरमधून तुम्हाला ‘बोलता’ येते. ज्यांच्याकडे व्हॉइसफोन आहे ते याचा लाभ घेऊ शकतात. ‘अबोल’पणे काम करायचे असेल, तरी बऱ्याच सुविधा उपलब्ध आहेत. पलीकडच्याला एखादा मोठ्या साइझचा फोटो पाठवायचा असेल तरी या मेसेंजरचा उपयोग होतो. याहू आणि एमएसएनमध्ये व्हीडिओही पाहता येतो. रिडिफमध्येही ही सोय उपलब्ध आहे. गूगलमध्ये ही सोय होण्यासाठी काही काळ थांबावे लागेल.

या मेसेंजरमधून मशीनमध्ये व्हायरस शिरू नये म्हणून सर्वांमध्येच सोय करण्यात आली आहे. याहूमध्ये स्पॅमगार्ड बसविण्यात आला आहे; तर एमएसएनमध्ये सिक्युरिटी आणि प्रायव्हसी याबद्दल वेगवेगळी सेटिंग्ज आहेत. गूगलमध्ये फक्त जीमेल आयडीचाच वापर करता येत असल्याने अन्य कोणी त्यावर लॉगऑन करूच शकत नाही. हेच एक प्रकारे संरक्षक कवच आहे. रिडिफमध्येही स्पॅम मेल आल्यास ताबडतोब तसा रिपोर्ट तुम्हाला मिळतो.

सगळे मेसेंजर एकदम डाऊनलोड करायला हवेत असे अजिबात नाही. सध्या याहूचा मेसेंजर सवोर्त्कृष्ट समजला जातो. तोे एकच डाऊनलोड केला तरी पुरे आहे. तुमचा ई-मेल आयडी कोणता आहे यावर ते अवलंबून आहे. जीमेल वापरत असाल तर गूगल टॉकच डाऊनलोड करावे लागेल.

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

One comment on “संदेसे आते है..

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: