१ प्रतिक्रिया

तांदूळवाडीचा एकाकी किल्ला


[ Thursday, August 23, 2007 09:05:59 pm]

पावसाळ्यात फक्त ट्रेकर्सच नाही तर मित्रपरिवार, कुटुंबकबिला घेऊन आउटिंगचे बेत झडत असल्याने लोकप्रिय ठिकाणी कधीकधी फारच गदीर् होते. तेव्हा कमी प्रसिद्ध, पण कमी गदीर्च्या, निसर्गसौंदर्याने ओतप्रोत भरलेल्या ट्रेकचा शोध सुरूच असतो. पालघर जिल्ह्यातील तांदूळवाडीचा किल्लाही असाच छान आणि अस्पर्श आहे.

तांदूळगडाकडची वाट हिरव्या गर्द झाडीतून जाते. पावसाळ्यात रस्त्यात अनेक खेकड्यांचं दर्शन होतं. पावसात रस्ता जरासा निसरडा असतो. त्यामुळे जरा जपून. आपण किल्ल्यावर पोहोचू लागतो, तसा आसपासचा निसर्ग अधीकच सुंदर दिसू लागतो. बाजूने जाणारी वैतरणा नदी आणि आसपासचे हिरवेगार डोंगर मन वेधून घेतात. किल्ला तसा लहान आहे. एक-दोन टाक्यांशिवाय इथे फार काही नाही. परंतु किल्ल्याहून दिसणारा नजारा अप्रतिम आहे. त्यासाठी तरी इथे यावं असं वाटतं. म्हणूनच इथे पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात यावं.

गडावर किंवा त्याच्या आजूबाजूला खाण्यापिण्याची काही सोय नाही. त्यामुळे जाताना थोडंफार खायला घेऊन जायलं हवं. हा किल्ला मुंबईपासून अगदी जवळ असल्यानं एका दिवसात जाऊन परतता येईल.

……..

कसं जायचं? :

– विरारनंतरच्या सफाळे स्टेशनावर उतरून तांदूळवाडीला एसटीनं जाता येतं. अन्यथा अहमदाबाद हायवेने जाताना मनोरच्या आधी डाव्या बाजूस वराई फाटा येतो. इथून केळवे बीचलाही जाता येतं. या फाट्यापासून उजवीकडे वळण घेऊन तांदूळवाडी गावात जाता येतं. तिथूनच तांदुळवाडी किल्ल्याला जायचा रस्ता आहे. वरपर्यंत जाण्यासाठी दोन रस्ते आहेत. एक रस्ता जवळचा पण कठीण आहे. काहीतरी धाडस केल्याचा आनंद घ्यायचा असेल तर हा रस्ता पकडा. ट्रेकची सवय नसलेले, लहान मुलं बरोबर असतील दुसरा रस्ता बरा. तो जरा लांबून आहे. गावातील वाटाड्या सोबत घेतला तर उत्तम.

12345

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

One comment on “तांदूळवाडीचा एकाकी किल्ला

  1. I liked the place do nitify me infuture for suce one day trip and adventure treak.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: