१ प्रतिक्रिया

मुरारबाजीच्या पराक्रमाचा साक्षीदार


[ Thursday, August 23, 2007 09:06:32 pm]

– अजय कुलकर्णी

मराठ्यांच्या इतिहासातील अत्यंत कडव्या झुंजीचे साक्षीदार असलेल्या किल्ल्यांपैकी एक किल्ला आहे पुरंदर. इसवी सन १६६५ मध्ये औरंगेजाबाचा एक सेनानी दिलेरखान यांनी या किल्ल्याला वेढा घातला होता. औरंगजेबाने दिलेरखानला प्रचंड तोफ गोळा व सैन्यासह शिवाजी महाराजांवर हल्ला करण्यासाठी पाठवला होता. त्याला शिवरायांनी केलेल्या सुरतेच्या लुटीचा बदला घ्यायचा होता. या वेढ्याला शह देण्यासाठी शिवाजी महाराजांच्या मुरारबाजी या पराक्रमी सेनानीने निवडक ५०० मावळ्यांना घेऊन प्रचंड मोठ्या संख्येने असलेल्या मोगल सेनेवर हल्ला केला. मोगलांना बेसावध गाठून घनघोर युद्ध केले. मुराबबाजीने केलेला पराक्रम पाहून तर दिलेरखान आचंबित झाला आणि त्याने मुरारबाजीला आमिषं दाखवली. पण महाराजांच्या या एकनिष्ठ लढवय्याने त्याला भीक न घालता लढत-लढतच हौताम्य पत्करलं. या अचाट पराक्रमाची साक्ष देणारा सह्यादीतला हा किल्ला ट्रेकर्स आणि इतिहासप्रेमींना अभिमानास्पद वाटतो.

पुण्याजवळच्या सासवडजवळ हा किल्ला आहे. सासवडहून या किल्ल्यावर जाण्यासाठी खासगी वाहनं मिळू शकतात. अन्यथा पायथ्याशी असलेलया नारायणपूरपर्यंत एटी बसेस आहेत तिथून चालत हा किल्ला सर करता येईल. सध्या हा किल्ला एनसीसीच्या ताब्यात आहे. किल्ल्यावर जाताना पुरंदरेश्वराचे मंदिर आहेे. गडावर पोहोचल्यावर एक सुंदर तळ दिसतं. या किल्ल्यावर काही पराक्रमी योध्यांचा जन्म झाला. १६५७ साली संभाजी राजांचा, तर १७७४ साली सवाई माधवरावांनी इथं जन्म घेतला. गडाच्या बालेकिल्ल्यावर केदारेश्वराचं मंदिर आहे. गडावरून आजूबाजूचा दऱ्याखोऱ्याचा प्रदेश न्याहाळताना स्वत:ला विसरायला होतं.

याच भेटीत पायथ्याशी असलेलं नारायणेश्वराचं मंदीर आणि नारयणपूरमधील प्रसिद्ध दत्तमंदीराचं दर्शनही घेता येईल.

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

One comment on “मुरारबाजीच्या पराक्रमाचा साक्षीदार

  1. maharashtra times magzine is very important as well as powerful

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: