यावर आपले मत नोंदवा

घाटरक्षक दुर्ग मृगगड


[ Thursday, August 23, 2007 09:07:56 pm]- अमित बोरोले

सह्यादीच्या घाटवाटांचं आणि किल्ल्यांचं मोठं जिवाभावाचं नातं. जिथं घाट तिथं किल्ला हवाच. घाटातून होणाऱ्या वाहतुकीच्या नियंत्रणासाठी आणि सशस्त्र आक्रमकांना अटकाव करण्यासाठी पूवीर्च्या काळी डोंगरी छावण्यांची निमिर्ती केली जात असे. या डोंगरी छावण्या म्हणजे दुसरे तिसरे काही नसून सह्यादीतील किल्लेच आहेत. त्यातलाच एक भेलीवचा मृगगड.

पावसाळ्यात घाटवाटांची सैर करण्याची मजा काही औरच. धब्यधब्याच्या वाटांनी अडखळत कधी ठेचकाळत कोकणात उतरतांना पूवीर्च्या काळी लोकांना या मार्गाने प्रवास करताना किती त्रास होत असेल याचा छोटासा अनुभव येतो. पुण्याहून कोकणात उतरण्यास अनेक घाटमार्ग होते. कोणत्याही वाटेने उतरताना सह्यादी आपले हातपाय पसरून बसलेलाच. यामध्ये प्रामुख्याने बोरघाट, कुखंडीघाट, सवघाट, वाघजाई घाट, सवघाट यांचा समावेश होतो. यापैकी सवघाट हा पवनेच्या खोऱ्यातून पश्चिमेला खाली येतो. याच्या तोंडावर तुंग आणि मिरगड हे दोन किल्ले आहेत. तर पायथ्याला मृगगड आहे. तुंगवाडी, जांभुळणे, नांदगाव, मलुष्टे, सवघाट, परळी, जांभुळपाडा असा हा मार्ग आहे. याच्या जवळच कुखंडा नावाचा घाट आहे. या घाटाच्या पायथ्याशी उबरे नावाचे गावसुद्धा आहे. इथेच इतिहासप्रसिद्ध अशी कारजलबखानाची लढाई झाली. या लढाई झाली. या लढाईचा एक प्रत्यक्ष साक्षीदार म्हणजे ‘मृगगड’. स्थानिक लोकांमध्ये हा भेलीेवच किल्ला म्हणून प्रसिद्ध आहे. लोणावळ्याहून आयएनएस शिवाजीकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक घाट लागतो त्या घाटाची दरी वाघदरी या नावाने ओळखली जाते. याच्या पायथ्याशी मोराडी नावाचा सुळका आहे. या दरीतून खाली पहिल्यावर दरीमध्ये तीन सुळक्यासारखे डोंगर दिसतात यापैकी मधला उंचवटा म्हणजे ‘मृगगड’. जर टायगर स्लीपमधून मृगगडावर जायचे असल्यास आयएनएस शिवाजीची परवानगी घेणं आवश्यकच आहे. यामार्गालाच सव घाटाची निसणी असंही म्हणतात. आपण मात्र कोकणातून किल्ल्यावर चढायचं आहे.

पाली खोपोली रस्त्यावर माणगाव या गावी पोहोचायचं. माण गावातून टमटमने कल्याण गाठायचं. कल्याणहून तीन किमी अंतरावर असणार भेलीव हे किल्ल्याच्या पायथ्याचं गावं. आषाढ श्रावणात या परिसरातील भटकंती करण्याचा आनंद वेगळाच. सर्वदूर नाना प्रकारची आकिर्डस आणि रानफुलं फुललेली असतात. ऐन श्रावणाच्या शेवटी ऊन पावसाचा लंपडाव सुरूच असतो.

भेलीवच्या अलीकडे अंबानदीच्या वरचा पूल लागतो. आजूबाजूच्या हिरवागार प्रदेश समोरच कातळभिंती सारखा उभा असणारा सह्यादी यामुळे आपलं मन एका वेगळ्याच विश्वात जाते. आयएनएस शिवाजीच्या तलावातून ओसंडून वाहणारे पाणी धबधब्याच्या रुपाने सह्यादीच्या २१०० फुटाच्या कड्यावरून आदळत आपटत मृगगडाचे पाय धुवून अंबानदीला मिळते.

भेलीव गावात मृगगडाची एक डोंगरसोंड बाजूच्या उंचवट्याना स्पर्श करून खाली उतरते. गाव मागे टाकून डोंगरसोंड चढणीला लागलं की पंधरा मिनिटातच वरच्या पठारावर पोहोचतो. सर्व पठारावर पिवळी पिवळी सोनकीची फुलं आलेली असतात. यामुळे वातावरणाला पिवळी झळाकी आल्यासारखी वाटते. पुढची वाट दाट झाडीतून वर जाते. उंचवटा आणि तिसरा उंचवटा यामधील घळीतून वाट गडावर चढते. पावसाळ्यात जरा निसरडं झाल्याने पावलं दमानेच टाकावी लागतात. वाटेत कातळात खोदलेल्या गुहा दिसतात. मृगगडाचा माथा छोटासा आहे. यात काही पाण्याची काही टाकी आहेत एका विहरीवजा टाक्यात उतरण्यासाठी पायऱ्यांची व्यवस्थाही आहे. समोरच गडाचा छोटासा उंचावलेला डोंगर दिसतो. पण दुरून डोंगर साजरे असे म्हणून लांबूनच सलाम ठोकायचा. कारण वर पाहण्यासारखे काहीच नाही. गडावरून घाटमाथा आणि कोकण यांना विभागणाऱ्या सह्यपर्वतांचं सुंदर दर्शन होतं. सह्यादीने या सर्व किल्ल्यांना कुशीत घेतल्याचा भास होतो. याच्यासमोर आपण सर्व म्हणजे आकाशाच्या छताखाली बागडणारी चिमुकली मुलं. अशातच एक गोष्ट अचानक लक्षात येते. संपूर्ण कातळभिंतीच्या वरच्या भागात धब्याधब्याचे पाणी आणि वारा यामुळे पांढरा पट्टाच निर्माण झालेला दिसतो. असा हा भेलिवचा किल्ला ऊर्फ मृगगड पावसाळी ट्रेकसाठी उत्तम ऑप्शन ठरू शकतो.

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: