१ प्रतिक्रिया

चार गोष्टी युक्तीच्या


[ Monday, August 20, 2007 12:44:14 am]

* हिरव्या मिरच्या दीर्घकाळ ताज्या राहण्यासाठी त्या धुवून त्यांची देठं काढावीत. या मिरच्या हवाबंद डब्यातच ठेवाव्यात. त्यापूवीर् डब्याच्या तळाशी एक कागद ठेवावा.

* कालवण/आमटीचा रंग बदलू नये, यासाठी त्यात ताक घालावं.

* मिठाचे खडे होऊ नये यासाठी त्यात थोडे तांदूळ घालावेत.

* बुटाची लेस वारंवार सुटू नये यासाठी ती थोडी ओली करावी.

* हातातली बांगडी चटकन निघण्यासाठी हातात एक पातळ प्लॅस्टिकची पिशवी घालावी. बांगड्या लगेच निघतील.

* बुंदीच्या लाडवांचा चुरा उरला असल्यास तो टाकून देऊ नका. हा चुरा दुधात घालून आयत्या वेळेस खीर बनवता येते.

* खिडकी, एक्झॉस्ट फॅनवर तेलाचे चिकट डाग हमखास पडतात. व्हिनेगरमध्ये कपडा भिजवून त्याने हे डाग काढावेत.

* पावसाळा असल्याने कपड्याला चिखलाचे डाग हे लागतातच. ते घालवण्यासाठी बटाटे उकडलेल्या पाण्यात कपडे बुडवून मग चोळावेत.

* कांदा शिजवताना त्यात थोडं दूध घालावं. अशाने कांद्याचा रंग कायम राहतो आणि तो जळतही नाही.

* लसूण दीर्घकाळ टिकवण्यासाठी तो जाळीच्या पिशवीत ठेवावा.

* सुरीला लागलेला फणसाचा चिक काढण्यास ती थोडावेळ गॅसवर धरावी. नंतर वर्तमानपत्राच्या कागदाने ती स्वच्छ करावी.

* काकडी आणि भोपळ्याच्या साली फेकून देऊ नका. त्या थोड्या पाण्यात उकडून, मिक्सरमध्ये वाटून नंतर नारळाच्या चटणीत घालाव्यात. अशाने चटणी अधिक स्वादिष्ट बनते.

* सिल्कची साडी चुरू नये यासाठी दोन-तीन टेबलस्पून ग्लिसरिन टाकलेल्या पाण्यात ती धुवावी.

* कपड्यांवर तेलाचे डाग पडले असल्यास त्यावर टाल्कम पावडर घालावी. काही तास तो कपडा तसाच ठेवावा. नंतर तेलाचे डाग आपोआप निघतात.

* पावसाळ्यात घरमाश्या डायनिंग टेबलपाशी घोंगावू नये यासाठी थोडी पुदिन्याची पानं टेबलावर ठेवावीत.

– मैत्रीण टीम

12345

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

One comment on “चार गोष्टी युक्तीच्या

  1. तुमच्या ब्लॉगवर छान माहिती आहे. एकदम उपयोगी. 🙂

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: