यावर आपले मत नोंदवा

गाणं घरच्या राजाचं


बाहेर आपण नसलो कोणी जरी, पाठीवरती असली गोणी जरी,

राजा असतो, राजा असतो, आपण आपल्या घरी !

 

चाळीतलं दीड खोलीचं राजाचं राज्य असतं, खोलीमधल्या नळाला बहुत करून पाणी नसतं !

पण जेव्हा राजा म्हणतो, काय म्हणतो ! “लाथ मारीन तिथे मी काधीन पाणी !”

भारावून बघू लागते राजाकडे त्याची राणी ! डोळ्यांमधून कौतुकाच्या झरू लागतात सरी !

राजा असतो, राजा असतो, आपण आपल्या घरी !

 

खरा योगी वेगळा कधी भासत नाही, आतून वेगळा असला तरी बाहेरून  दिसत नाही,

साधं सुधं वागणं असतं, पण आतून जगणं असतं,

आपली सुघ्दा अशीच असते योग्यासारखी अवस्था,

बहेरून दिसणा-या गोंधळढिगात, असते आपली आतून एक अवस्था,

कपड्यांचा ढीग असतो, पत्रांचा, पुस्तकांचा ढिग असतो,

आपल्याला आपलं सगळं कळत असतं, हवं ते हवं तेव्हा मिळतं असतं,

बेशिस्तीत आपली एक शिस्त असते, तिच्यावरचं आपली सगळी भिस्त असते,

पण घर व्यवस्थित लावण्याचा जेव्हा तिला मूड येतो, तेव्हा मात्र सैतानच आपल्यावर सूड घेतो,

रामदास आपण शोधावा तर फ्रॉयड चक्क बोलका होतो, गंजिफ्रॉकऎवजी आपल्या हाती पोलका येतो,

कपाळाला हात लावून बसलो तरी, राजा असतो, राजा असतो, आपण आपल्या घरी

 

राणी लाडात वागू लागते, राजाला सांगू लागते :”राजा, आज साडी घ्यायला आपणं जायचं !”

मला सांगा; तुमचं कायं – माझं काय, अशा वेळी वेगळं ते काय व्हायचं ?

मट्कन तेव्हा खुर्चीवरती आपण बसतो, आध्यात्मिक साक्षात्कार झाल्यासारखे दिसतो,

हे दुकान, ते दुकान, लहान दुकान, मोठं दुकान, जुनं दुकान, नवं दुकान,

तरीसुध्दा योग काही जुळतं नाही, मनासारखी एक साडी मिळतं नाही,

तीस दुकानं फिरल्यानंतर अखेर एका साडीची खरेदी पुर्ण होते,

तेव्हा आपल्या पायांमधली असली नसली सगळी ताकद चूर्ण होते,

हवा गेलेल्या फुग्यासारखे आपण दिसलो तरी, राजा असतो, राजा असतो, आपण आपल्या घरी

 

राणीच्या प्रेमाखातर पाणीसुध्दा भरतो राजा, चिंगीचं शाळेतलं होमवर्कसुध्दा करतो राजा,

ती जेव्हा ’राजा’ म्हणून हाक घालते, तिचे कपडे लॉड्रीत आपण नेतोच ना ?

“राजा, राजा, रेशन आण ती म्हणते, तेव्हा आपण पिशव्या हातात घेतोचं ना ?

पिशव्या घेऊन रांगेमध्ये उभे असलो तरी, राजा असतो, राजा असतो, आपण आपल्या घरी

-बोलगाणी

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: