यावर आपले मत नोंदवा

कार डॉट कॉम


[ Tuesday, July 17, 2007 07:42:20 pm]

एकदा का गाडी घेण्याचा निर्णय पक्का झाला की मनात नानाविध प्रश्न डोकावू लागतात. एवढी मोठी खरेदी करायची म्हणजे नीट माहिती घेऊन, सगळया पर्यायांचा विचार करून व्यवस्थित निर्णय घ्यायला हवा. आपल्याला हवी
असलेली माहिती अगदी बसल्याजागी उपलब्ध करून देणारं प्रभावी माध्यमं म्हणजे ‘इंटरनेट’. सध्या हे माध्यम कार खरेदी-विक्रीच्या व्यवहारात महत्त्वाची भूमिका बजावतंय. त्याविषयी…

कार किंवा ऑटोमोबाईल विषयीचा सर्च दिला तर जगभरातल्या एक ना हजार वेबसाईट तुमच्या समोर हात जोडून उभ्या राहतील. ‘कारवाले डॉट कॉम’, ‘ऑटोकारइंडिया’, ‘इंडियाकार डॉट कॉम’ अशा एकाहून एक भन्नाट वेबसाइट सापडतील. इंटरनेटवर गाडीविषयक माहितीचा अफाट खजिनाच गवसेल तुम्हाला. गाडी खरेदीचा निर्णय घेताना या माहितीची नक्कीच मदत होईल. दोन एक वर्षांपूवीर् या वेबसाइटचा ट्रेंड सुरू झाला आणि आता या वेबसाईट प्रचंड लोकप्रिय झाल्या आहेत. कंपनीचं एखादं मॉडेल बाजारात आलं की लगेचच त्याची दखल या वेबसाइटकडून घेतली जाते. कधी कधी तर लाँच होण्यापूवीर्च या वेबसाइटनी तिची पारख केलेली असते. ज्या गाड्या भारतात मिळत नाहीत, पण आयात करता येऊ शकतात त्याही इथे दिसतील, असं कारवाले डॉट कॉमचे सीईओ मोहित दुबे म्हणाले. जसं प्रत्येक सिनेमाचं परीक्षण येतं तसंच प्रत्येक नवीन गाडीचं परीक्षण तुम्हाला या साईटवर वाचायला मिळेल. कारवेड्यांसाठी तर ही पर्वणीच असते. गाडी घ्यायची नसली तरी बाजारात काय काय नवीन येतंय याबद्दल कमालीची उत्सुकता असलेले कारवेडे या वेबसाईट्सना नियमित भेटी देऊन माहिती जमवतात. फक्त त्यांनाच नाही तर कारशी संबंधित प्रत्येकाला अपडेट ठेवण्याचं काम या वेबसाइट करतात.

ऑटोमोबाईल कंपन्यांचा इतिहासही या वेबसाईटवर वाचायला मिळतो. जी माहिती ग्राहकांना कंपन्यांच्या शोरुममध्ये मिळू शकत नाही ती सगळी माहिती या वेवसाईटवर मिळू शकते. आजवर अमूक एका कंपनीने बाजारात किती कार आणल्या, त्यातल्या किती हिट झाल्या, किती फ्लॉप गेल्या वगैरे माहितीही असतेच. आपल्याला नेमकं कोणतं मॉडेल घ्यायचं आहे, हे ठरलेलं असेल तर उत्तमच. नसेल तरी काही हरकत नाही. कारण वेबसाइटवर एकाच कंपनीच्या किंवा वेगवेगळया कंपन्यांच्या मॉडेलमध्ये तुलनाही करता येते. गाडीच्या लहानात लहान भागापासून ते तिच्यातल्या खास वैशिष्ट्यांपर्यंत या मॉडेलचा तुलनात्मक समाचार त्यात घेतलेला असतो. तिच्या अॅक्सेसरीज, मायलेज, इंधनक्षमता, गाडी कशीे वापरावी याबद्दल सगळं सगळं त्यात बारकाइनं लिहिलेलं असतं. ही माहिती सोप्या पद्धतीने लिहलेली असल्याने वाचणाऱ्याच्या लगेचच लक्षात येतं त्यामुळे ‘हिडन ट्रूथ’ वगैरे प्रकार इथे नसतो.

कार मॉडेलसंबंधी पुरेशी कल्पना आल्यावर मग बाकीचे सोपस्कार पार पाडायचे असतात. मूळात, आपल्याला आवडलेलं मॉडेल आपल्या खिशाला परवडेल की नाही हा महत्त्वाचा मुद्दा असतो. त्याचीही काळजी वेबसाइटच वाहते. आपल्या बजेटमध्ये बसेल अशी कार कोणती, कुठे कार खरेदी करणं फायद्याचं ठरेल, कारसाठी कोणत्या बँकेत किती लोन मिळेल, त्याचे हप्ते किती बसतील हेही आपल्याला वेबसाइटवरून कळू शकतं. कार इन्शुरन्स हा आणखी एक महत्त्वाचा विषय आहे. त्याबाबत अनभिज्ञ असाल तर या वेबसाइट मदतीला तयार आहेत. इन्शुरन्सच्या तांत्रिक माहितीपासूनच प्रत्येक गोष्ट या वेबसाईट पुरवतात. आपण फक्त इच्छा व्यक्ती करायची, मग वेबसाइटचा जीन नम्र हास्य करून आपल्यापुढे खजिना घेऊन अदबीनं उभा राहतो. क्लिक करून त्याला आज्ञा केली की तो आपल्या पोतडीतून हव्या त्या गोष्टी आणून देतो. रोज किती जण या जीनशी गप्पा मारतात, याच्या नोंदी वेबसाइटकडे असतात. कारवाले डॉट कॉमने दिलेल्या आकडेवारीनुसार रोज जवळजवळ २० हजार लोक ऑटोमोबाईलच्या साइट पाहतात. त्यापैकी दोन एक हजारांना खरोखर गाडी घ्यायची असते. त्यांनी दिलेल्या माहितीतून ते नेमके कशासाठी साइट पाहताहेत ते कळंतच. त्यातून पुढे मग माहितीची देवाणघेवाण सुरू होते. कार खरेदीत आवश्यक असलेल्या प्रत्येक बाबतीतले निर्णय घेण्यासाठी या वेबसाइट मदत करतात. सेकंड हँड कारची खरेदी-विक्री हा सुद्धा या वेबसाईटचा अविभाज्य भाग आहे. कार विकण्यास इच्छुक असलेल्यांना आणि कार घेऊ इच्छिणाऱ्यांना आवश्यक ती माहिती देऊन या वेबसाईट मध्यस्तीची भूमिका बजावतात.

कार खरेदीचा निर्णय घेताना लागणारी माहिती या वेबसाईट मार्फत सहज मिळवता येऊ लागल्याने वेबसाईट्सना भेटी देणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे आणि त्यातून कार खरेदी-विक्रीच्या व्यवहारांना हातभार लागतो आहे.

– गौरी देशपांडे

1234

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: