१ प्रतिक्रिया

घोडेवाल्यांकडून फसवणूक


[ Thursday, August 23, 2007 09:05:23 pm]

– नंदकिशोर चव्हाण, मालाड

एका खासगी टूर कंपनीमार्फत आम्ही काश्मिर आणि वैष्णोदेवीला गेलो होतो. बाणगंगा या ठिकाणाहून वैष्णोदेवीला पोहचणं हा १४ किमीचा चढ आहे. आमच्यासोबत ओम आणि तन्वी ही दोन लहान मुलंही होती. त्यांच्यासाठी दोन घोडे भाड्याने घेतले होते. त्यांच्यासोबत दोन मोठी माणसंही पाठवण्याचं ठरलं. देवीच्या दर्शनानंतर पुढे भैरवनाथापर्यंत पायी जायचं ठरवल्यामुळे घोडे फक्त एकेरी मार्गानेच नेण्याचं ठरलं. त्याची योग्य ती पावतीही घेतली. परत येताना मुलांसाठी घोडे पुन्हा भाड्याने घेण्याचे ठरले. त्यांच्याबरोबर सामान देणं बसताना अडचणीचं ठरलं असतं म्हणून सर्व सामान आमच्याबरोबरच ठेवलं. पैसे घोडेवाल्यांना लगेचच देऊन टाकले.

घोडे घेऊन ते निघाले. एखादा किलोमीटर प्रवास झाला नसेल तोच, घोड्यांना एका जागेवर थांबवून घोडेवाले काहीही न सांगता निघून गेले. ते चौघेही वीसेक मिनिटं घोड्यावर एकाच जागेवर थांबून राहिले. अर्धातास उलटून गेल्यावरही ते आले नाहीत. आपण फसवले गेलो आहोत हा अंदाज त्यांना आला. ते खाली उतरले. खिशात पन्नास रुपयांची एकुलती एक नोट, बरोबर दोन लहान मुलं. सुदैवाने तिथं कांदिवलीचे फायर ब्रिगेडमध्ये काम करणारे पडवळ नावाचे गृहस्थ भेटले. त्यांच्या सूचनेवरुन देवस्थानच्या सूचना केंदात लाऊडस्पिकरवरून कळवलं गेलं, पण काहीही उपयोग झाला नाही. शेवटी पडवळ यांनीच ५००रुपये आणि कटराच्या हॉटेलचं कार्ड दिलं. मुलं आणि त्यांच्याबरोबरचे दोघेही चालत चालत आधी बाणगंगा आणि नंतर कटरा इथं सुखरुप पोहोचले. पडवळ वेळेवर पोहोचले नसते तर काय झालं असतं या विचाराने अस्वस्थ व्हायला होतं. वैष्णोदेवीला जाणाऱ्यांसाठी एक सूचना करावीशी वाटते. घोडा ठरवताना घोडेवाल्याचं ओळखपत्र जरुर तपासावं. त्याच्यासोबत फोटो काढून घ्यावा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या इच्छित ठिकाणी पोहोचेपर्यंत पैसे देऊ नयेत.

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

One comment on “घोडेवाल्यांकडून फसवणूक

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: