यावर आपले मत नोंदवा

सर्च नेमका हवा!


[ Friday, September 14, 2007 04:37:18 am]
कोणत्याही विषयाची माहिती शोधण्यासाठी अनेक सर्च इंजिन्सचा पर्याय उपलब्ध असतो. मात्र त्यातील नेमका कोणता वापरावयाचा, ते अनुभवातूनच ठरवता येते…

– अशोक पानवलकर

गेल्या वेळेस आपण सर्च इंजिनबद्दल माहिती घेतली. बऱ्याच वाचकांनी त्यांना आलेल्या सर्च इंजिनच्या अनुभवाबाबत माहितीही कळवली. पण नेहमीच्या गूगल सर्चपेक्षा आणखी असंख्य सर्चचे पर्याय आपल्याला उपलब्ध आहेत. काहींमध्ये तर तज्ज्ञांचे मार्गदर्शनही मिळते. उदाहरणार्थ, ‘चाचा डॉट कॉम’. तिथे एखादा प्रश्न विचारला की दोन पर्याय तुमच्यासमोर येतात. एक निव्वळ सर्चचा आणि दुसरा तज्ज्ञांकडून ‘लाइव्ह’ मार्गदर्शन मिळविण्याचा. मात्र त्यासाठी तुम्हाला या साइटवर नोंदणी करावी लागेल. लॉगीन नेम, ई-मेल आयडी आणि पासवर्ड वगैरे द्यावे लागतील. फुकटातली ही सेवा रजिस्टर्ड यूजर्सनाच उपलब्ध आहे. एखादा प्रश्न विचारला की साइटवरचा जाणकार माणूस त्याची उत्तरे देतो. असे लाइव्ह मार्गदर्शन फार कमी साइटवरून मिळते.

‘ डॉगपाइल डॉट कॉम’ ही आणखी एक शोधसेवा आहे. तिचे वैशिष्ट्य असे की गूगल, याहू, विंडोज लाइव्ह, आस्क डॉट कॉम या सर्वांवरचे सर्च ती एकदम करते आणि अगदी मोजकेच निष्कर्ष तुमच्यापुढे सादर करते. गेल्या वेळेप्रमाणेच मी ‘सचिन तेंडुलकर’ असा सर्च देऊन पाहिला, तेव्हा फक्त ६२ रिझल्ट्स आले. पण ते महत्त्वाचे होते. सर्च डॉट कॉमवर १,२३,२० आले; तर ऑलदवेब डॉट कॉमवर ९८,२०,००० आले. इतका फरक का पडतो असा प्रश्न आपल्यापुढे येतो. पण प्रत्येक गोष्ट शोधणे आणि नेमकी गोष्ट शोधणे यात महदंतर आहे. म्हणूनच नेमके कुठले सर्च इंजिन आपल्याला उपयोगी पडते आहे त्याचा स्वत:च अभ्यास करून तेच नेहमी वापरले तर फायदा होईल.

एका साइटद्वारे जगातल्या टॉप टेन सर्च इंजिनचा आढावा घेतला जातो. लोकांनी जास्तीतजास्त कुठे जाऊन सर्च केला, हे पाहिले जाते. यंदाच्या जुलै महिन्यातले क्रमवारीने टॉप टेन असे : गूगल, याहू, एमएसएन अथवा विंडोज लाइव्ह, एओएल, आस्क, मायवेबसर्च, बेलसाऊथ, कॉमकास्ट, डॉगपाइल, आणि मायवे डॉट कॉम. यानंतर इतर सर्च इंजिन्सचा वापर होतो. ही यादी अर्थातच दर महिन्याला बदलत असते. पण साधारणपणे पहिले चार क्रमांक कायम राहतात. तरीही या यादीत नसलेली पण चांगली अशी काही सर्च इंजिन्स आहेत. ‘टेक्नोरॅटी डॉट कॉम’ हे त्यातलेच एक. मुख्यत: ब्लॉगच्या सर्चसाठी ते वापरले जाते. ब्लॉगरविषयी सर्व माहिती इथे मिळते. कोणत्या प्रकारच्या ब्लॉगचा अधिक शोध घेण्यात आला आहे, त्याची यादी दिसते. म्हणजे तुम्हालाही त्यातलाच ब्लॉग शोधायचा असेल तर सरळ तुम्ही त्या लिंकवर जाऊ शकता. इथेे दोन प्रकारचे सर्च उपलब्ध आहेत. एक म्हणजे सर्वांत नवीन ब्लॉग कोणता आहे ते आधी दिसेल व जुना ब्लॉग शेवटी दिसेल. दुसऱ्या प्रकारात सर्वात जास्त वेळा जो ब्लॉग पाहिला गेला असेल, तो आधी पडद्यावर येतो. नंतर उलट्या क्रमाने ब्लॉग दिसतात. म्हणजे सर्वात लोकप्रिय ब्लॉग कोणते ते पटकन कळते. अर्थात तरीही अधिक सर्च केलेला चांगला; कारण लोकांची पसंती ही तुमचीही पसंती असेलच असे नाही. एखाद्या गंभीर विषयावरचा वा विशिष्ट विषयावरचा ब्लॉग हवा असेल, तर अधिक सर्च करावा लागेल.

‘ कॉसमिक्स डॉट कॉम’ ही आणखी एक सर्च साइट. ती काही प्रमाणात मोफत आणि काही प्रमाणात पेड साइट आहे. इथे विषयानुसार शोध घेता येतो. उदाहरणार्थ, आरोग्य, वाहने, अर्थव्यवहार, राजकारण वगेरे. फुकटातला सर्च चांगले रिझल्टस देत नाही; पण पैसे भरून केलेला सर्च अत्यंत उपयुक्त माहिती देतो. विषयवार सर्चचे पर्यायही उपलब्ध आहेत. गूगलवर पुस्तकांचा सर्च घेता येतो. काही वेळा त्या पुस्तकातली काही पानेही वाचता येतात. एखाद्या लायब्ररीत असावी अशी विषयवार रचना या साइटवर मिळते. पुस्तकाचे नाव माहीत असेल तर प्रश्र्नच नाही. ते टाइप करून थेट सर्च करू शकता. साहित्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त अशी ही साइट आहे.
……
शॉर्टकट :

तुम्ही एखादा प्रोग्रॅम नेहमी वापरत असाल तर त्याचा शॉर्टकट डेस्कटॉपवर करून ठेवणे केव्हाही इष्ट ठरते. म्हणजे प्रत्येकवेळा प्रोग्रॅम फोल्डर ओपन करून इच्छित स्थळी जाण्याचे काहीच कारण नाही. उदाहरणार्थ, फायरफॉक्स ब्राऊझर वापरायचा असेल, तर आधी स्टार्टवर क्लिक करायचे, मग ऑल प्रोग्रॅम्सवर क्लिक करायचे, फायरफॉक्स शोधत बसायचे व तो मिळाल्यावर त्यावर क्लिक करायचे… हे सर्व करण्यात वेळ जातो. त्यापेक्षा त्याचा शॉर्टकट तुम्ही डेस्कटॉपवर करून ठेवलात, तर अधिक सोपे जाईल. त्यासाठी मशीनच्या डाव्या बाजूला खाली ‘स्टार्ट’वर क्लिक करा, ऑल प्रोग्रॅमवर क्लिक करा, फायरफॉक्स मिळाल्यावर त्यावर राइट क्लिक करा. बरेच ऑप्शन्स दिसतील. त्यातील ‘सेंड टू’ ऑप्शन निवडा. त्यावर क्लिक केल्यास आणखी ऑप्शन्स दिसतील. त्यातील ‘डेस्कटॉप (क्रिएट शॉर्टकट)’ वर क्लिक करा. मग फायरफॉक्स तुम्हाला डेस्कटॉपवरच दिसेल. थेट त्यावर क्लिक करून तुम्ही काम करू शकता. अर्थात हेच अन्य कोणत्याही फाइलबद्दल करता येते. तुम्ही एखाद्या वर्ड फाइलमध्ये काही काम करत असाल, तर त्याचा शॉर्टकट डेस्कटॉपवर करून ठेवायचा. म्हणजे फाइल उघडायला सोपी जाते.

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: