१ प्रतिक्रिया

बर्न्ड अलाईव्ह


षोडशवर्षीय सौअद प्रेमात पडली.तिच्या पॅलेस्टाईनमधल्या पश्चिम भागातल्या एका गावातच नाही तर ; तिथल्या अनेक गावात ’मुलीचे विवाहपूर्व शारिरीक संबध’ हा संपूर्ण कुटुंबाला नामुष्कीचा विषय ठरतो. आणि त्याकरता थोडीथोडकी नाही तर देहांताचीच शिक्षा मिळते. तिथल्या स्त्रियांचं जगणं हे शेळ्या-मेंढ्यांपेक्षा ही खालच्या स्तरावरचं आहे. घरातल्या मुलाला अगदी राजेशाही वागणूक आणि मुलींना मात्रा हालाअपेष्टा. घरात ३-४ च्या वर जन्मलेल्या मुलींना प्रत्यक्ष जन्मदात्री आईच , जन्माला आल्यावर गळा दाबून मारायला कमी करत नाही. त्याबद्दल तिथे कोणाला खंतही वाटत नाही. प्रत्यक्ष सौअद ने हे स्वत:च्या डोळ्याने स्वत:च्या घरी अनेकदा बघितल्याचे लिहीले आहे, घरातल्या पुरूषाला / मुलाला घरातल्या कोणत्याही स्त्रिला , अगदी आई असली तरी, मारायचा अधिकार आहे. नुसतं नाही तर अग्दी जिवानिशी सुध्दा.

सौअदच्या हातून हा गुन्हा घडला. प्रत्यक्ष जन्मदात्या आई-वडीलांनी तिच्या मेहुण्याला तिला शिक्षा देण्याचं फर्मावण्यात आलं. एके सकाळी , सौअद सगळ्या कुटुंबाचे कपडे धुवायच्या कामगिरीवर असताना; त्याने तिच्यावर रॉकेल ओतून तिला पेटवले.

आश्चर्यकारकरीत्या ; सौअद त्यातून वाचली, तिच्या गावातल्याच इतर बायकांनी तिची सुटका केली. आग विझवून तिला दवाखान्यात नेलं. तशाच अवस्थेत ती तिच्या मुलाला जन्म देते. सत्तर टक्के भयंकररीत्या भाजलेली सौअद; एवढं होऊनही तिच्या कुटुंबियांकडून नाकारलीच गेली. एकदा मारण्यचा प्रयत्न करून वाचलेली सौअद मरावी म्हणून तिच्या आईने तिला हॉस्पितलमध्ये सुध्दा विष द्यायचा प्रयत्न केला. एका युरोपियन समाजसेविकेच्या मध्यस्तीमुळेच फक्त तिची देखभाल होऊ शकली.

ती दयाळू समाजसेविका सौअद्ला घेऊन स्वित्झर्लंड मध्ये आली. तिथे तिने सौअद आणि तिच्या मुलाचे पुनर्वसन केले. मुलाला एका कुटुंबात दत्तक देण्याची व्य्वस्था केली. लिखाण-वाचनाचा गंधही नसलेल्या सौअदला आज हे पुस्तक लिहू शकेल, आपल्या अन्यायाला वाचा फोडू शकेल इतपत शिक्षित केलं. पुन्हा एकदा सौअद प्रेमात पडली, सुदैवाने यावेळी तिचा प्रियकर आधीच्या सारखा पळून न जाता तिच्या मागे खंबीर पणे उभा राहीला. आधी ७ वर्ष लिव्ह एन रिलेशनसिप मध्ये राहिलेल्यावर शेवटी त्याने सौअदच्या प्रेमाचा स्वीकार केला आणि तिच्याबरोबर लग्न केले. तिचा सगळा भूतकाळ माहीत असून सुध्दा त्याची कधीही वाच्यता न करण्याचा मोठेपणा दाखवला.तिच्या जळलेल्या देहाचा कधीही तिरस्कार वाटू दिला नाही. तिच्या कुरूप चेह-याचा कधीही दुस्वास केला नाही. आज सौअद तिच्या नव-याबरोबर, दोन मुलींबरोबर आणि आधी जन्माला घातलेल्या मुलाबरोबर सुखाने – समाधानाने जगते आहे.

त्या दयाळू समाजसेविकेचे ऋण म्हणून ज्या संस्थेने तिला आज पुन्हा पायावर उभं राहायला मदत केली त्यांच्याकरता निधी गोळा करायचे काम करते आहे. तिची इच्छाआहे की जो प्रसंग आपल्यावर आला तसा कोणाही स्त्रीवर येऊ नये. देवाने जन्माला घातलेल्या प्रत्येकाला जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. कोणाही एकाने तो आपल्या हाती घेऊ नये. आपल्या मातॄभूमीला कायमची मुकलेल्या सौअदने तिच्या कहाणीमार्फत आजही चालणा-या या अमानुष प्रथेला वाचा फोडायचा प्रयत्न केलाय ’बर्न्ड अलाईव्ह’ या पुस्तकातून.

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

One comment on “बर्न्ड अलाईव्ह

  1. Wahayla haway pustak pan “not without my daughter” nantar he satya wachyachi takat punha gola karyaala mala wel laagel.

    Aparna

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: