2 प्रतिक्रिया

चार गोष्टी युक्तीच्या ४


* भाजीतल्या कॉलिफ्लॉवरचा रंग पांढराच राहावा यासाठी शिजवताना त्यात थोडं दूध घालावं.

* अॅल्युमिनिअमची भांडी ‘पांढरी’ दिसावीत यासाठी त्यात थोडी सफरचंदाची सालं उकळावीत. नंतर ते भांडं धुवून वाळवावं.

* अंडी उकडताना कवच फुटून आतला भाग बरेचदा बाहेर येतो. हे टाळण्यासाठी अंडी उकडताना त्यात एक टीस्पून व्हिनेगर घालावं.

* केकला बरेचदा अंड्याचा वास येतो. तो येऊ नये यासाठी केकच मिश्रण फेटत असताना त्यात एक टेबलस्पून मध घालावं.

* मशरूम सहजपणे पाणी शोषून घेतं. इतकंच काय ते हवेतलं आर्दही शोषून घेतं. म्हणून भाजीत ते वापरण्यापूवीर् धुण्याऐवजी स्वच्छ कपड्याने पुसावेत.

* बटाट्याला कोंब फुटू नयेत यासाठी त्यात एक सफरचंद ठेवावं.

* भेंडीची भाजी चिकट होऊ नये यासाठी ती शिजत असताना त्यात चमचाभर लिंबाचा रस किंवा दही घालावं.

* अंडं जमिनीवर पडून फुटलं तर ती जागा स्वच्छ करणं जिकिरीचं बनतं. अशावेळी फुटलेल्या अंड्यावर भरपूर मीठ घालावं. थोड्यावेळाने पेपर नॅपकिनने ते स्वच्छ करावं.

* हिरव्या भाज्या कधीही प्लास्टिकच्या पिशवीत साठवून नयेत. त्या लवकर कुजतात.

* कांदा शिजवताना त्यात थोडं मीठ घालावं. अशाने तो लवकर शिजतो.

– मैत्रीण

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

2 comments on “चार गोष्टी युक्तीच्या ४

  1. मला या युक्त्या खुपच आवडल्या मी सर्व युक्त्या करून पाहिन

  2. ह्या युक्त्या छान आहे. फक्तं एक गोष्टं खटकली. ती म्हणजे खाद्य पदार्थ पांढरे दिसण्याचा अट्टाहास. आहार शास्त्रज्ञांच्या मते नैसर्गिकपणे विविध रंगांनी नटलेले जेवण आरोग्याच्या दृष्टीन जास्तं चांगले असते.
    पांढर्‍या रंगाच्या आकर्षणापायी आपण बरीच जिवनसत्वे गमावुन बसतो. उदा. तांदुळ, साखर आणि मीठ यांना पांढरे करण्यासाठी आपण मुळ पदार्थातील उपयुक्तं गोष्टी फेकुन देतो.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: