यावर आपले मत नोंदवा

वर्डप्रेसच्या कॅटॅगरीज आणि टॅग्ज


मध्यंतरी ’वर्डप्रेस’ ने टॅग्ज ची पध्दत सुरू केली. ब्लॉगरवर टॅग्जना लेबल म्हटलं जातं आणि त्याची लिस्ट शेजारी साइडबार मध्ये दिसते. वर्डप्रेस वर मात्र आता कॅटॅगरीज आणि टॅग्ज अशी दोन्ही गर्दी दिसतेय. ज्यावेळी वर्डप्रेसनं असा वाढीव बदल केल्याची सूचना केली त्यावेळी मला खूप आनंद झाला होता. कारण कॅटॅगरींच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत होती, ब-याचदा एखादी कॅटॅगरी एकदा वापरल्यानंतर पुन्हा वापरायची वेळच यायची नाही.  अश्या वेळी मारूतीच्या शेपटासारखे कॅट.लिस्ट वाढतच होती. त्यावेळी तर वर्डप्रेस ने अर्काईव्ह ची सोय कॅट. करता उपलब्ध केली नव्हती. माझ्या ब्लॉग चे मुखपृष्ठ अगदी विचित्र दिसायचे. मध्ये पोस्ट मात्र छोटीशी आणि उजवीकडे लांबलचक कॅट.ची यादी. सगळ्यात एकेक पोस्ट, वाचाणार तरी काय. मग काही दिवसांनी वर्डप्रेस ने कॅट. करता एक ड्रॉप डाऊन बॉक्स ची सोय केली. थोडाफार दिलासा मिळाला. ज्यांना विविध विषय चाळायचे आहेत ते हव्या त्या विषयावर क्लिक करून चाळू लागले. माझ्या ब्लॉगच्या पॄष्ठाची लांबी सुध्दा कमी झाली.

आता दुसरा मुद्दा त्रास देऊ लागला. एका नावाची एकच कॅट. करता येते असे लक्षात आले.  ते थोडे त्रासाचे वाटले.  कारण एक मुख्य विषय आणि त्यात दुसरा उपविषय केला पण त्यातला कोणताही विषय मला पुन्हा दुस-या विषयाकरता वापरता येईना. तेव्हा टॅग्ज ची कमतरता भासू लागली. म्हणून म्हटलं की वर्डप्रेसने जेव्हा टॅग्जविषयी चा वाढीव बदल केला तेव्हा मला फार आनंद झाला. पण ….

अर्थातच हा आनंद फार काळ टिकला नाही. कारण वर्डप्रेस ने देऊ केलेली ही सेवा, आधीच्या कॅट.च्या सेवेशी जोडलेली नाहीये. म्हणजे कॅट. त्यांच्या पातळीवर आणि टॅग्ज त्यांच्या पातळीवर काम करतात. वास्तविक दोन्ही गोष्टी जर एकमेकांना पूरक असत्या तर फार बरं झालं असतं.

तुमच्या लक्षात येतं नाहीये का मला काय सांगायचयं ते ? वानगीदाखल असं बघा…मला एक आशा आणि लता यांच्या गायलेल्या मराठी / हिंदी गाण्यांचा ब्लॉग करायचा  आहे. आता अशी मेख आहे की….मी जर मराठी आणि हिंदी अश्या दोन मुख्य कॅट. तयार केल्या तर लता आणि आशा मला दोन उपकॅट. तयार कराव्या लागतील. पण मराठी या कॅट मध्ये मी एकदा लता आणि आशा या उपकॅट. तयार केल्या की तश्याच त्या मला हिंदीत करता येणार नाहीत. मग एकतर त्यांना वेगळं काहीतरी नाव द्यायला लागेल; जे दिलं की त्याचा नावावरून च्या वर्गीकरणाचा मूळ हेतूच नाहीसा होतो. किंवा मग मराठी, हिंदी, लता, आशा अश्या कॅट आणि उपकॅट न करता सगळे विषय कॅट. म्हणूनच करावे लागतील. पण त्यानेही मूळ वर्गीकरणाचा उद्देश सफल होतं नाहीये. कारण असं करून मी जर लता या कॅट. वर क्लिक केल्यावर मला लताने गायलेली सगळी गाणी मिळतीलही पण त्यात मराठी बरोबरच हिंदीचाही समावेश असेल. बरं जर भाषेनुसार मराठी वर क्लिक केल्यास सगळी मराठी गाणी मिळतील पण त्यात लताबरोबर आशाचीही असतील. तरी बरं अजून गीतकार, संगीतकार यांचा विचारही मी यात केलेला नाही. नाही तर जितके गीतकार , संगीतकार तितके गुणिले ४ ( लता, आशा, मराठी, हिंदी) अश्या शक्यता.

अश्या वेळी जेव्हा वर्डप्रेस ने टॅग्जची घोषणा केली तेव्हा अतिशय आनंद झाला. वर विचार केलेल्या शक्यता प्रत्यक्षात आणायचे स्वप्नच मी पाहू लागले. पण हाय रे दैवा !  मगाशी म्हटल्याप्रमाणे कॅट. आणि टॅग्ज एकमेकांना पूरक कामं न करता दोघेही वेगवेगळ्या पातळीवर कामं करतात. म्हणजेच मराठी – लता या कॅट. मधल्या एका लेखा मध्ये जर मी सुधीर फडके या संगीतकाराच्या नावाचा टॅग केला; तरी सुधीर फडकेंवर क्लिक केल्यावर मला पुन्हा तश्याच मराठी, हिंदी, लता, आशा  या सगळ्यांची गाणी त्यात एकत्रित मिळतील. म्हणजे थोडक्यात मला जर  लतादिदींनी..बाबूजींची…गायलेली…मराठी गाणी हवी असतील तर मला कॅट. कोणतीही असो….लता-मराठी-बाबूजी-गीतकार.. अश्या नावाचा टॅग बनावावा लागेल. तसेच आशाताईंच्या बाबतीतही करावे लागेल. गीतकार, संगीतकार, गायक, गायिका कोणीही नविन वाढलं की नविन टॅग. म्हणूनच म्हटलं की सध्या नुसती कॅट. आणि टॅग्ज ची जत्रा माझ्या ब्लॉगवर भरलेयं. आहे यावर कोणाकडे काही उपाय ?

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: