१ प्रतिक्रिया

वर्डप्रेस आणि ब्लॉगर २


मागे मी म्हटल्याप्रमाणे माझा ब्लॉगर वरचा ब्लॉग मी केवळ वर्गीकरणाची सोय नाही म्हणून वर्डप्रेसवर हलवला. त्या वेळी ब्लॉगर खूपच बाल्यावस्थेत होतं. आणि त्या उलट वर्डप्रेस मात्र चांगलचं बहरात होतं. उदाहरणच द्यायंचं झालं तर वेगवेगळ्या थीम्स उपलब्ध होत्या. तुमच्या गरजेनुसार तुम्ही हवी ती थीम वापरून तुमचा ब्लॉग सजवू शकत होतात. इतकेच नाही तर वर्डप्रेस चे वर्डप्रेस.कॉम आणि वर्डप्रेस.ऑर्ग असे दोन भाग आहेत. तुम्हाला फारशा अपेक्षा न ठेवता जर रेडिमेड ब्लॉग हवा असेल तर वर्डप्रेस.कॉम वर तुम्ही या ब्लॉगसारखा ब्लॉग तयार करू शकता. अर्थातच त्यात तुम्हाला हव्या त्या गोष्टी मिळतीलच असे नाही. पण तुम्हाला जर कोडींगचे ज्ञान असेल तर वर्डप्रेस.ऑर्ग सारखा उत्तम पर्याय नाही. वर्डप्रेस.ऑर्ग वरचे उपलब्ध ऍप्लिकेशन तुम्ही उतरवून घेऊन तुम्हाला हव्या असलेल्या सर्व्हर वर चढवू शकता. त्यात हवे ते बदल करू शकता. नविन काही प्लग इन्स चढवू शकता. मला पहिल्यापासूनच पैसे खर्च करण्याचा प्रस्ताव मंजूर नव्हता.काही ठीकाणी मोफत जागाही उपलब्ध आहे,पण त्यात पुन्हा अनेक मर्यादा येतात.त्यापेक्षा मग वर्डप्रेस.कॉम च बरे.
आता वर्डप्रेस.कॉम वर ब्लॉग तयार झाला. खुशीत येऊन काही पोस्ट्स टाकल्यावर लक्षात आले की इथे दोन त्रुटी आहेत.एक म्हणजे दिसणा-या पोस्ट इतक्या लहान अक्षरात आहेत की ब-याचदा वाचताना त्रास होतो. दुसरं असं की ब्लॉगरवर जर तुम्ही एखादी दोन महिन्यापुर्वीची पोस्ट पहात असाल तर , शेजारच्या साइडबार मध्ये तुम्हाला त्याच्या आगच्या मागच्या पोस्ट्सची लिस्ट दिसण्याची सोय होती,तशी ती इथे वर्डप्रेस वर नाही. आता काय करावं ? हा दुसरा प्रश्न मामुली असला तरी मला खूप खटकत होता. पण त्यावर काही उपाय सापडला नाही. नाही म्हणायला एक पळवाट म्हणून त्या महिन्याच्या कॅलॅंडर वर माऊस फिरवला की तश्या त्या महिन्यातल्या पोस्ट्स दिसतात.विचार केला की,”चला;हे ही नसे थोडके !” पण फॉन्ट्सचा प्रश्न सुटला नाही. वर्डप्रेसच्या फोरम मध्ये ही समस्या मांडल्यावर कळले की, प्रत्येक थीम करता एक वेगळी css वापरली जाते, त्यात बदल करून ती मला वापरायची असेल तर त्याकरता मला पैसे भरून ती css विकत घ्यावी लागणार. मग काय, पुन्हा आलीया भोगासी…असावे सादर. जिकडे तिकडे अडवणूक.उगाच नाही म्हणतं ना की,”There is nothing like a free lunch”.
वर्डप्रेस ची लोकप्रियता पहाता आणि दिवसागणिक कुत्र्याच्या छत्र्यांप्रमाणे निघायला लागलेले ब्लॉग्ज पाहून हळूहळू ब्लॉगर ही बदलू लागले.त्यांनी त्यांचा पुर्वीचाच css(template) ब्लॉगधारकाला बदलू देण्याचा निर्णय कायम ठेवत अनेक लक्षणीय बदल केले. वर्डप्रेसने मात्र यात ब्लॉगला हॅकींग चा धोका पोचू शकतो असे सांगत पहीलाच पर्याय कायम ठेवला.
ब्लॉगर ने जे नवे बदल केले त्यातले मुख्य म्हणजे ब्लॉगच्या रीच टेक्स्ट एडीटर मध्येच देवनागरी टाईप करायची होय आणि ब्लॉगच्या साइडबारमध्ये सजावट करण्याकरता काही   एलिमेंट्स  काढाघालायची सोय. या पुर्वी देवनागरी टाईप करताना बरहा सारख्या सॉफ्टवेअरचा आधार घ्यायला लागायचा. पण ज्यांना ही सोय नकोय( उद.कार्यालयालयातून लिखाण करणा-यांना)  त्यांच्याकडून म्हणून ब्लॉगरच्या या कॄतीला उदंड प्रतिसाद मिळाला. अर्थात बरहा च्या सोयीपुढे ब्लॉगर ची सोय काहीच नाही, पण बुडत्याला काडीचा आधार..कारण वर्डप्रेस वर अशी काही सोय नाहीये. नाही म्हणायला वर्डप्रेस ने   आपल्या ’मराठी’भाषेला ब्लॉगिंगची एक भाषा म्हणून मान्यता मात्र दिली आहे.

दुसरा एलिमेंट्सचा उपयोग असा की, तुम्हाला फोटो, व्हिडीयो, काही वाचनखुणा(लिंक्स), मतदान, कसलीही यादी अश्या काही उपयॊगी गोष्टी साईडबारमध्ये द्यायची सोय झाली.या  एलिमेंट मध्ये सगळ्यात महत्वाचे एलिमेंट म्हणजे html.या एलिमेंट मुळे कोणतेही विड्गेट (widget) तुम्ही तुमच्या ब्लॉगच्या साईडबार मध्ये टाकू शकता.हे html कोड्स टाकणं शक्य झाल्याने तुम्ही नानाविध प्रकारे तुमचा ब्लॉग सजवू शकता. दुर्दैवाने वर्डप्रेस मध्ये ही सोय उपलब्ध नाही..वर्डप्रेसच्या टेक्स्ट विडगेट मध्ये मी अनेकदा html कोड टाकून पाहीले पण सगळे प्रयत्न निष्फळ झालेतं.

 

याखेरीजही काही चांगल्या सोयी ब्लॉगर देतं ….त्याविषयी पुन्हा कधी तरी.

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

One comment on “वर्डप्रेस आणि ब्लॉगर २

  1. मी आत्ता तरी वर्डप्रॆसवर बराहाच्या मदतीनं मराठीत टाईप करायची धडपड करतोय.

    पण हे खूप वेळखाऊ वाटतंय.

    ब्लॉगर की वर्डप्रॆस ही मला वाटतं न संपणारी तुलना आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: