2 प्रतिक्रिया

द मॉन्क हू सोल्ड हिज फेरारी


भारतीय वंशाच्या ’रॉबीन शर्मा’ यांचे हे पुस्तक मध्ये बरेच गाजले होते. सध्या मी तेच वाचतेय.

एक प्रथितयश वकील…यश…पैसा…मानमरातब यांच्या धुंदीत. त्यातून वैवाहीक अपयश. पण कामापुढे कसलीही तमा न बाळगता अथक मेंदू शिणवत असतो. एक दिवस कोर्टात केस लढवत असतानाच कोसळतो. डॉक्टर त्याला पेशा किंवा तब्येत असा पर्याय देतात. तिरीमिरीत येऊन किंवा ही एक आयुष्य जगायची संधी मानून तो सगळी संपत्ती विकून भारतात येऊन हिमालयात जाऊन राहातो. तिथल्या वर्षानुवर्षे वास्तव्य केलेल्या भिक्षुंपासून तो बरेच काही ज्ञान मिळवतो. मुळातच तल्लख बुध्दीचा हा वकील जे काही आत्मसात करतो..ते त्या भिक्षूंना दिलेल्या वचनाप्रमाणे आपल्या देशात येऊन आपल्या सारख्याच आयुष्याला जुंपून घेतलेल्या लोकांना द्यायचं ठरवतो.

अशी ही थोडक्यात कथा. पण याआधी नुकतंच त्यांचं ’हू विल क्राय व्हेन यू डाय ?’ या शिर्षकाचं पुस्तक वाचून झालं होतं. त्यामुळे यात वाचताना काही फार वेगळेपण जाणवलं नाही. व्यक्तिमत्व विकासाची जशी अनेक पुस्तकं आपण वाचतो त्यापैकीच एक म्हणता येईल. अर्थात त्यात त्यांनी ज्या काही छोट्या पण परीणामकारक युक्त्या सांगितल्या आहेत त्या थोडयाफार सगळेचजण सांगतात. शिवाय मी आधी म्हटल्याप्रमाणे आधीचं त्यांचं जे पुस्तक वाचलं होतं त्यात ह्या सगळ्या क्लृप्त्या साधारणपणे १०१ प्रकरणांतून नमूद केलेल्या आहेतच. पण काही काही युक्त्या खरोखरच परीणामकारक ठरतील असे वाटते. उदा. त्यांनी म्हटलेय की ’ऑपोझिशन थिंकिंग’ चा पर्याय नकारात्मक विचारांवर उत्तम आहे. आपल्या मनात एका वेळी एकच विचार येऊ शकतो. तो जर नकारात्मक असेल तर आपण आपलं मन नियंत्रित करून त्यात सकारात्मक विचार आणायचे.

तुम्ही हे पुस्तक जर वाचलं नसेल तर जरूर वाचा. एकदाच नाही तर नैराश्यातं असताना वाचंलत तर सकारत्मक बदल घडवायला हे नक्कीच उपयोगी पडेल. पण तुमच्याकडे हे पुस्तक नसेल तरी काळजी करू नका. इथे पहा मिळतंय का ? आणि व्हा सकारात्मक !

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

2 comments on “द मॉन्क हू सोल्ड हिज फेरारी

  1. Today we Indians need to write or to read book-The monk who buy Ferarri.It means we have to create wealth with peace of mind.Our great Hindu religion told four PURSHARTHA-DHARM, ARTH,KAM,MOKSHA. I am very glad our new generation is creating wealth.But they have to do meditation for only 20 minutes.Meditation is the gateway to Richness.You can take experience,if you see the website-www.smilinghome.org

  2. कथासार वाचून आश्चर्य वाटले कारण थोड्याफार फरकाने हीच कथा हॅरिसन फोर्डच्या रिगार्डींग हेन्री या चित्रपटाची आहे. कुणी कुणाची प्रेरणा घेतली देव जाणे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: