यावर आपले मत नोंदवा

बालदोस्त


वर्षभर खूप अभ्यास (?) करून आता सुट्टीत खूप धमाल करायची असं सगळ्या बालदोस्तांनी ठरवलेलं असेलचं. माझ्या लहानपणी शेवटचा पेपर देऊन आले की पहिलं काम मी लायब्ररीत जाऊन सुट्टीच्या २ महिन्यांकरता लायब्ररी लावायचे करायचे. त्याकरता किती तरी आधीपासून फिल्डींग लावलेली असायची. वडीलांना विचारायची सोय नसायचीच म्हणून आईकडून मध्यस्ती केली जायची. त्यांनी घातलेल्या सगळ्या अटी मान्य कराव्या लागायच्या. त्यात प्रामुख्याने आईला मदत म्हणून आणि एरवी अभ्यासाच्या नावाखाली न केली जाणारी कामं करायची अट, झालंच तर जुन्या पुस्तकांची रद्दी काढणे, वह्यांच्या उरलेल्या को-या पानांची रफ वापराकरता वही बाइंड करणे, सगळे कप्पे आवरणे, नविन इयत्तेची मैत्रीणीकडून जुनी पुस्तके आणून त्या वर्षाचा अभ्यास सुरूवातीला उत्साहाने चालू करणे ही आणि अशी अनेक फुटकळ कामं करायची अट मान्य करावीचं लागे. पण वाचनाची इतकी आवड होती की त्या एका आवडीकरता तितकी बलिदानं द्यायची तयारीही होती. त्यामानाने आजची पिढी सुदैवीच म्हणायला हवी. त्यांनी काही मागायची खोटी की सगळं काही हातात मिळतंय..किंबहुना मागयचीही गरज लागत नाहीये. अर्थात न मागता मिळणारी आजची ऎदी पिढी सुदैवी की मागूनही ब-याचदा न मिळणारी आमची कींवा आमच्या आधीची पिढी सुदैवी हे काळच ठरवेल. हा तंटा मात्र पिढीजात चालूच राहील.

तर माझ्या वाचनाची आवड असणा-या काही बालदोस्तांकरता सकाळ बालमित्रची ही महाजालीय आवृत्ती इथे देत आहे.

शंका समाधान, विनोद, अक्षरांतून चित्रे

 

कोडी, चित्रे, हस्तकला, गोष्टी

 

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: