१ प्रतिक्रिया

मुंबईवरच्या भ्याड हल्ल्याचा निषेध….


     जवळपास ४० तास होत आहे आहेत. अजूनही अतिरेक्यांविरुद्धची धुमश्चक्री चालूच आहे. या हल्ल्याला कोण जबाबदार आहे हे तपासाअंती कळेलच. सर्व स्तरातून या हल्ल्याचा निषेध होत आहेच. पाकिस्तानसकट सगळे भारतीयांच्या बाजूने आहेत तर मग नक्की विरोधक आहेत तरी कोण ? दहशतवादाला धर्म नसतो हे वारंवार म्हटलं गेलं तरी अश्या प्रकारे स्थानिक जनतेला वेठीला धरलेले कायम मुस्लिमच का निघावेत ? (मालेगाव सारखा एखादा अपवाद असेलही…पण तो अपवादही गेले काही वर्ष सातत्याने भारताच्या विविध भागात धर्मांध मुस्लिमांनी केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून केला गेला. धर्मांध मुस्लिम आहेत तसे हिंदूही आहेत. त्यांनी मालेगावच्या हल्ल्याचे समर्थन केले. )
     या हल्ल्याने काही नविन प्रश्न उपस्थित झाले. इतका मोठया प्रमाणावर स्फोटकांचा साठा मुंबईत आला पण संबंधितांच्या लक्षात का नाही आला की जाणूनबुजून दु्र्लक्षिला गेला ? ताजमहाल आणि ओबेरॉय सारख्या पंचतारांकित हॉटल्समध्ये सुरक्षेची इतकी वानवा असावी की दोन अतिरेकी तिथे कर्मचारी म्हणून काम करत होते ?
     वृत्तवाहिन्यांना तर माकडाच्या हातात कोलित मिळाल्यासारखेच झालेय. कोणती बातमी आपल्या वाहिनीद्वारे आधी दिली जातेय या नादात सगळ्याच वार्ताहरांनी तारत्म्य सोड्लंयं. जणू हा काही भारत-पाकीस्तान क्रिकेट सामना चाललाय आणि शहिद झालेला प्रत्येक अधिकारी / जवान हा जणू पाकीस्तानी गोलंदाजांनी टिपलेला भारतीय फलंदाज आहे असे समजून त्यांचे प्रसारण होत आहे. तंत्रज्ञानाचा फायदा आहे तसा तोटाही आहेच की. त्यांनी दिलेल्या या तात्काळ प्रसारणाच्या आधारेच तर अतिरेक्यांना बाहेर काय चाललेय याची बित्तंबातमी मिळतेय आणि आपले अधिकारी टिपले जात आहेत. वास्तविक हा सगळा प्रकार मुख्यत्वे करून दक्षिण मुंबईत झाला;त्या ठीकाणी तात्काळ जमावबंदी जारी करण्यात आली. पण या वृत्तवाहिन्यांनी दिवसभर तेच तेच दाखवून सगळ्या मुंबईकरांना दहशतवादाचे फारच जवळून दर्शन घडवले. अनेक तरूण धाडसी पत्रकारांना तर ही भूतो न भविष्यति अशी संधी वाटत असेल. काल रात्री एका हिंदी वाहिनीवरून; नरीमन हाऊस इथली वीज कापल्यावरही, लाईट लावू नका अशी सूचना असतानाही जोखीम पत्करून फक्त प्रेक्षकांकरता ही बातमी देत असल्याचे सांगितले होते. पत्रकारीतेच्या या स्तंभाला आपली जबाबदारी कधी कळणार ?
     आज सकाळी एका हिंदी वाहीनीवरून श्री. राज ठाकरे यांचा फोटो दाखवून; बिहारी-मराठी वाद उकरून काढणारे राज आता कुठे गेले असा सवाल केला जात होता. त्या वाहिनीला मलाही हे विचारावेसे वाटते की याच वादाचे राजकारण करणारे लालू, मुलायम, संजय निरुपम आणि तत्सम भय्यै ही कुठेही दिसत नाहीयेत त्याचे काय ? उलट राज ठाकरे यांनी या प्रसंगी काही म्हणाले नाहीत हेच बरे नाही का ? जर ते काही म्हणाले असते तरी याच वृत्तवाहिन्यांनी ’ही फूट पाडायची वेळ आहे का ?’ असेही सवाल उपस्थित केले असते. राज ठाकरे सध्या कुठेही चर्चेत नसतानाही खाजवून खरूज काढायची वृत्त वाहिन्यांना सवयच झालेली आहे.
     प्रत्येकानेच मुंबईची आपापल्या परीने धिंड काढली आहे. मुंबईला भारताची आर्थिक राजधानी मानताना तिला कोणीही वाली नाही हेच प्रत्येकवेळी सिद्ध होते आहे. तोंडदेखला हल्ल्याचा निषेध करायचा, मतांचे राजकारण करायचे आणि मुंबईचे जमतील तसे लचके तोडत राहायचे हेच धोरण सगळे राजकारणी अवलंबत आहेत. या गोष्टीबद्दल प्रत्येक सच्च्या मुंबईकराने स्वत:ला बदलायची गरज आहे. चलता है हा दृष्टिकोन बदलायला हवा. चौकस बुद्धीने सतर्क राहून प्रत्येक घटनेचा वेध घ्यायाला हवा. सर्वसामान्यांनीच आता काहीतरी मार्ग काढून या दहशतवादाचा बुरखा फाडायला हवा…..दहशतवादाचे भारतातून उच्चाटन हीच खरी या ऑपरेशनमध्ये शहीद झालेल्या श्री. हेमंत करकरे, श्री. अशोक कामटे , श्री. विजय साळस्कर  आणि इतर जवानांना खरी श्रद्धांजली ठरेल.
    

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

One comment on “मुंबईवरच्या भ्याड हल्ल्याचा निषेध….

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: