१ प्रतिक्रिया

पाकिस्तानने भारतीयांवर केलेली चिखलफेक


आत्ताच मला ईमेल ने आलेल्या ह्या लिंक्स पाहिल्या….आणि धक्काच बसला. पाकिस्तानी वृत्तवाहिनीवर मुंबईतल्या अतिरेकी हल्ल्यावर्चा परामर्ष घेण्यात आला आहे. त्यात ज्या दोन व्यक्तिंच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत त्यापैकी एकाने सदर हल्ला भारतीय लष्करानेच केलेला आहे आणि पाकिस्तानवर उगाचच आरोप केला जात आहे असा जावईशोध लावला आहे.  दुसर्‍या व्यक्तिने तर हल्ला भारतात झाला आहे; भारतात स्वत:च्या इतक्या बंडखोर चळवळी चालू असताना पाकिस्तानवर आरोप करताना भारताने विचार करायला हवा. शिवाय त्यांच्याकडे तसे काही पुरावे असतीलच तर त्यांनी त्यांचा ( रॉ ) ऑफिसर इथे पाठवायला हवा पुरावे घेऊन. आमच्या माणसाने तिथे का जावे ? अशी मुक्ताफळे उधळली आहेत.शिवाय पहिल्या विडीयोत श्री. राम जेठमलानी सारख्या माणसाचे, ’ पाकिस्तान याला जबाबदार नसल्याचे’ वक्तव्यही आहे.
हे पाहून संतापाची एक तिडीक गेली. काय खरं आणि काय खोटं हा भाग वेगळा पण पाकिस्तान स्वत:ही दहशतवादाशी झुंज देत असताना अशी बेताल भाषा त्यांच्या सिक्युरीटी एक्सपर्ट जायद हमीद ने वापरावी ? ज्या उर्मट पद्धतीने तो आणि दुसर्‍या मुलाखतील्या बाईने वक्तव्य केली आहेत ते पाहून असेच म्हणावेसे वाटते की ’सौ चुहे खाके बिल्ली हज को चली’

विडियो १ 

विडियो २

विडियो ३

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

One comment on “पाकिस्तानने भारतीयांवर केलेली चिखलफेक

  1. हेच त्यांना हवं आहे – भारतीयांनी भडकावं आणि भावनेच्या भरात नको ते निर्णय घ्यावेत आणि हेच आपण टाळायचंय. हे व्हिडिओ मी दोन दिवसांपूर्वीच पाहिले होते, आता माझ्या कंप्युटर मध्ये पडून आहेत. मी ते परत परत पाहीलेत, मला आणखीही काही व्हिडीओज मिळालेत, सर्व पाहिले मी व त्यांच्या आणि आपल्या दोघांच्याही बाजूने पाहण्याचा प्रयत्न केला. सिक्युरीटी एक्सपर्ट जायद हमीद ने जी भाषा वापरली आहे, ती निश्चितच उद्धट आहे पण त्यामागचं सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी करायला हवा. अमेरिका आधीच त्यांच्या देशाची वाट लावते आहे, जरा कुठे खुट्ट झालं की सर्वांच्याच मनातले संशयाचे मिसाईल्स पाकिस्तानावर रोखले जातात, हे त्यांनाही माहीत आहे. जर त्या सिक्युरीटी एक्सपर्ट जायद हमीद ची बॉडी लँग्वेज पाहिलीत, तर लक्षात येईल की भारतावर आक्रमण करण्याची गोष्ट करत असताना त्याची फाटली होती. त्याच्यासोबत बसलेली ती, मार्वी मेमन, तिला काय बोलावं हे कळत नव्हतं कारण त्यांना माहीत आहे की सुरूवात त्यांनीच केलेली आहे आणि त्याची फळं ते भोगताहेत. भारत, जे अतिरेकी त्यांच्याकडे मागत आहे, ते त्यांच्याचकडे आहेत पण तेच अतिरेकी पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांना धमक्या देतायंत की त्यांनी अतिरेक्यांना भारताला सुपूर्द करण्याची नुसती नावगोष्ट जरी काढली, तर ते पाकिस्तानमध्येच हल्ले करून, नव्याने येऊ घातलेल्या लोकशाहीचा क्षणात -हास करतील. अशा परिस्थितीत, पाकिस्तान अनेक मांजरींच्या कचाट्यात सापडलेल्या उंदरासारखा झाला आहे, तो गुरकावणारच. आपल्या सैन्याने जो संयम दाखवून अनेक जणांची जिवंत सुटका केली त्याला तोड नाही. सरहद के उस पार, ए.सी. कॅबीन में बैठकर भारत की मजबूरी का मजाक उडाने वाले यह नाही समझ पाएंगे. ते व्हिडिओ पाहून मी रात्रभर झोपू शकले नाहीए पण शांत डोक्याने विचार केला, ही तर त्यांची जुनी पद्धत आहे. अफझलखान कसा आला होता वाईत?? ….. तेव्हा, सावधपणे हे नॄपवर तुच्छ करावे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: