10 प्रतिक्रिया

झी मराठी सारेगमप लिटिल चॅम्प्स‌ मध्ये नेमकं काय चाललयं ?


परवाचा झी मराठी सारएगमप लिटील चॅम्प्स चा ’कॉल बॅक’ चा भाग पाहीला. आणि कळेनाच की हे नेमकं काय चाललं आहे ! १२ पैकी आता फक्त ५ स्पर्धक राहिले, म्हणजे उरलेले ७ स्पर्धक कॉल बॉक ला असायला हवे होते. पण प्रत्यक्षात फक्त स्पर्धक शाल्मली, राधिका आणि कार्तिकी असे तीनच स्पर्धक हजर होते. उरलेल्या चार स्पर्धकांबद्दल म्हणजे केतकी, सागर, नेहा आणि शमिका यांच्या गैरहजेरीबद्दल वैयक्तिक कारणे असल्याचे सांगितले गेले. 

घरात आमची चर्चाही झाली की बाकीच्या स्पर्धकांनी बहुदा स्पर्धेवर बहिष्कार टाकला असावा. याची सयुक्तिक कारणे मला अशी देता येतील की १) लिटिल चॅम्प्स ची अगदी पहिली फेरी झाल्यावर, मुलांच्या वयाचा विचार करून कोणावरही अन्याय होऊ नये म्हणून त्याच वेळी एक कॉल बॅक फेरी घेण्यात आली होती. या स्पर्धेत हे प्रथमच घडले. प्रेकक्षकांनीही या गोष्टीला पाठींबा दिला कारण तोपर्यंत हे लिटील चॅम्प्स लोकांच्या गळ्यातले ताईत झाले होते. २) शमिका ही अगदी आदल्याच दिवशी बाद झाली होती. पुनरागमनाची सुसंधी मिळत असताना तिने ती का सोडली असेल ? ३) शाल्मली जेव्हा अनपेक्षितरीत्या बाद झाली तेव्हा माझ्यासकट बर्‍याच जणांना हा धक्का बसला असल्याचे लक्षात आले. केतकी बाद झाली तेव्हाही हा धक्का बसला होता. शेवटच्या ४-५ जणांमध्ये लढत द्यायची क्षमता असलेल्या या दोघी इतक्या चटकन बाद होतील असे कोणाला वाटले नसेल. केतकी आणि शाल्मली दोघींना मतं कमी मिळाली असे कारण सांगितले गेले. वास्तविक शाल्मली ज्यावेळी बाद झाली त्यावेळी परीक्षक आणि ऐसेमेस यांची टक्केवारी ५०:५० अशी होती. तिसर्‍या पर्वात ’देवकीताईं’नी परिक्षकांना एकदाच वापरता येणार असलेला खास अधिकार वापरून ’अनिरूद्ध जोशी’ ला जीवदान दिले होते. तो थेट अंतिम फेरीत दाखल होऊ शकला. इथेही असे अधिकार देता आले असते. पण तसे घडले नाही. ४) शाल्मली अशी अनपेक्षित रित्या बाद झालेली पाहून तिच्या शाळेने तिला पाठींबा द्यायचे ठरवले आहे असे वर्तमानपत्रात वाचले. शाळा नेमके काय करणार आहे याचा मात्र उल्लेख नव्हता. पण अचानक दुसर्‍या आठवड्यात आपल्या चुकीचं परिमार्जन करण्याकरता एक कॉल बॅक एपिसोड करणार असल्याचे जाहीर केले. कुठेतरी काही पाणी मुरतयं हे नक्की…मुग्धा वयाने सगळ्यात लहान असली, दिसायला बाहुली असली, रायगड भूषण ठरली असली, ताला सुराला पक्की असली, अगदी श्री. श्रीधर फडके यांनी कौतुक केले असले तरी इतर स्पर्धकांच्या मानाने ती सुमार ( भाव विरहीत ) गाते. तरीही तिला भरभरून ऐसेमेस येतात हे कसे शक्य आहे ? अवंतीबाबत बोलायचे तर नेहमी ३-४ घरं पुढे जाणारी अवंती हर्ष भोगले यांची भाची आहे हे कळल्यावर एकदम बरीच घरं पुढे गेली. हे ही संशयास्पद आहे. साप-शिडी चा पट तर यात असायलाच नको होता. गंमत म्हणून फार तर पट असून त्यावरच्या साप आणि शिडयांची यात गणना होऊ नये. परिक्षकांचे मार्क आणि ऐसेमेस इतके असताना….पुन्हा साप किंवा शिडयांचा लक फॅक्टर कशाला ? एखाद्याला कमी मार्क मिळूनही शिडीमुळे पुढे जाऊ शकेल याउलट एखादा चांगलं गाऊनही सापावरून घसरून खाली येऊ शकेल. त्यातूनही पल्लवीताई पुढे साप आहे की शिडी हे बघून प्यादी हलवतात त्याप्रमाणे मुलं हलवतात असा मला तरी संशय आहे. अन्यथा एकदम ऐसेमेसच्या घरांचा आकडा जाहीर करावा की ! काय असेल तो निकाल लागेल. थोडक्यात काय इथेही राजकारण चालू आहे पण तेही निरागस लहान मुलांच्या कार्यक्रमात , हे खटंकतं !

आता कॉल बॅक चा भाग झाला, त्यातून फक्त दोन जण पुढे जाणार होते. शाल्मली एक नक्की ठरली असावी. पण सात पैकी तीन जण स्पर्धेला आले. त्यातही तिघींनी म्हटलेली आपापली दोन्ही गाणी छानच झाली. त्यामुळे झी मराठी ची पंचाईत झाली. राधिकाच्या गाण्यात तर वैशालीताई म्हणाली तसा एक आश्चर्यकारक सुखद बदल पहायला मिळाला. शेवटी शाल्मलीवरच्या अन्यायाच्या पापक्षालनार्थ झी मराठी ने तिन्ही स्पर्धकांना पुढे पाठवण्याचा संभावित उदारपणा दाखवला. आणि शेवट गोड केला. पण जर सातही स्पर्धक आले असते तर ? तर काय घडू शकलं असतं ? पण बहुदा बाद झालेल्या उरलेल्या ४ स्पर्धकांनी हे वेळीच ओळखल्याने त्यांनी कॉल बॅक ला यायची तसदी घेतली नसावी.

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

Comment navigation

Newer Comments →

10 comments on “झी मराठी सारेगमप लिटिल चॅम्प्स‌ मध्ये नेमकं काय चाललयं ?

Comment navigation

Newer Comments →

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: