3 प्रतिक्रिया

सारेगमप मराठी महाअंतिम सोहळा


झी मराठी चा सारेगमप लिटिल चॅम्प्स हा कार्यक्रम गेल्या आठवडयापासून अश्या टप्प्यावर पोहोचला होता की, यातून कोणताही स्पर्धक बाद झाला असता तरी प्रांतीयवादाने महाराष्ट्र पेटू शकला असता. प्रेक्षकांच्या मतांचा आदर राखल्याचं दाखवत, झी मराठीने उरलेल्या पाचही स्पर्धकांना महाअंतिम फेरीत दाखल केलं. अर्थात यात फायदा झी मराठीचाच आहे. कारण आता पुणेकर, अलिबागकर, लातूरकर, रत्नागिरी्कर असे सगळेच आपला स्पर्धक निवडून येण्याकरता जास्तीत जास्त मत ऐसेमेसेने देऊन आयडीया आणि झी मराठीचं उखळ पाढंरं करतील यात वाद नाही. पण सगळेच स्पर्धक खर्‍या अर्थाने विजेतेच आहेत. कोणातही डावं उजवं करता येणं निव्वळ अशक्य आहे. प्रत्येकाची वेगळी खासियत आहे. आर्या, प्रथमेश, मुग्धा सुरूवातीपासूनच व्यवस्थित गात आहेत तर  रोहीतने आणि कॉल बॅक नंतर कार्तिकीने तर  धमालच उडवून दिली आहे. तेव्हा झी मराठीने प्रेक्षकांचा आणि स्पर्धकांचा फार अंत न पहाता उरलेल्या पाचही जणांना विजेते घोषित करून आपल्या एसेमेसच्या माध्यमातून मिळालेल्या नफ्यातला काही हिस्सा या स्पर्धकांना वाटावा.

सापशिडीच्या खेळाने शाल्मलीला आणि एसेमेसच्या अभावाने केतकीला गुणवत्ता असून बाहेर जावे लागले होते. मुळात परीक्षक ५०% आणि एसेमेस ५०% असे प्रमाण असताना; साप आणि शिडयांचा लक फॅक्टर घ्यायचाचं कशाला ? मला तरी त्याचं प्रयोजन पटलेलं नाही. प्रेक्षकांच्या जीवाची घालमेल करत जास्तीत व्यावसायिक यश आणि टीआरपी पदरात पाडून घेत झी मराठीच्या सारेगमपचं हे सगळ्यात यशस्वी पर्व असावं.

असो, झी मराठीचं अर्थकारण त्यांच्यापाशीच राहो. महाअंतिम फेरीतल्या या पाच आणि शाल्मली,केतकी सारख्या महाअंतिम फेरीत पोचू न शकणा-या अश्या एकूण सप्तसूरांनी त्यांची गुणवत्ता सिद्ध करत गेले सहा महीने आम्हाला भरपूर आनंद दिला. त्यामुळे झी मराठी कोणालाही विजेते ठरवो पण माझ्यालेखी सगळेच विजयी झालेले आहेत.

शाल्मली, आर्या, मुग्धा, कार्तिकी, प्रथमेश आणि रोहीत यांच्या गाण्यांचा पुन:पुन्हा आस्वाद घ्या.

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

3 comments on “सारेगमप मराठी महाअंतिम सोहळा

  1. sapshidicha khel kunalahi avadlela nahi…..
    To khel pahayala sadha vatat asala tari tyamule mulanche far mothe nuksan zale ahe ani shalmali sarakhya guni spardhakache nuksan zale ahe..parikshak changle ahet pan thoda kartiki sobat pakshapatipana kartat ase vatate…
    ti talented asunahi tila tyapramane nyay milat navhata…

  2. Great!! I agree with your views. Incidentally the same issue i have covered in my blog also…
    Some body has said…” all great men think alike”
    LOLz..

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: