3 प्रतिक्रिया

कार्तिकी देवींचा विजय असो…..:-)


कार्तिकी ला विजयी ठरवण्याविषयी मतमतांतरे आहेत. तशी ती नेहमीच असतात.
मला स्वतःला सुद्धा आर्या आणि प्रथमेश असताना कार्तिकी जिंकेल अशी
अपेक्षाच नव्हती. पण ती जिंकावी अशी खूप इच्छा मात्र होती. किमानपक्षी
इतक्या दिग्गज ज्युरींच्या एकमताने तिला ज्युरींचं बक्षिस तरी मिळावं अशी
आशा होती. पण सगळ्या ज्युरींनी त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी चोख पाडली
आणि कार्तिकी जिंकली.
मी अगदी पहिल्या भागाच्या पहिल्या गाण्यापासून हा कार्यक्रम बघते आहे.
आर्या आणि प्रथमेश पहिल्यापासूनच व्यवस्थित गातात. मुग्धाला बाहुली म्हणून
लोकांनी डोक्यावर चढवले होते, पण शेवटी तिच्या वयाच्या मर्यादेने
गाण्यांची मुग्धागीते व्हायला लागली. रोहीत मला कधीच या स्पर्धेत फायनलला
पोचण्यापर्यंत सुरेल वाटला नाही. त्यामुळे खरी स्पर्धा आर्या, प्रथमेश आणि
कार्तिकी यांच्यात होती. यू टयूब वर या कार्यक्रमाचे पहिल्यापासूनचे सगळे
विडियोज उपलब्ध आहेत. स्वतः झी मराठीने या मुलांच्या एम्पी३ डाउनलोड
करण्याकरता उपलब्ध केल्या आहेत. मध्यतंरी मी कार्तिकी च्या काही काही
गाण्याची एम्पी३ डाऊनलोड करून ऐकल्या आणि काय सांगू डोळे अक्षरशः पाझरायला
लागले. सच्चा सूर , सच्चा सूर काय म्हणतात तो तिचा आहे की नाही मला माहीत
नाही. पण ती सगळी गाणी काळजापर्यंत भिडली. ती फार मोठी गायिका होईल की
नाही माहीत नाही पण श्रोत्यांच्या काळजाला हात घालण्याचं कसब तिच्याकडे
आहे. बरं तिने गायलेली बहुतेक गाणी अप्रकशित होती, सांप्रदायिक होती.
तरीही ही किमया तिने करून दाखविली. त्यामुळे तिचा विजय हा एक फ्लूक नव्हता.

मिसळपाव.कॉम वरची ही एक कॉमेंट

आर्या विजेती ठरली असती तरी तिला पुढच्या प्रवासासाठी फार काही मोठा फरक पडला असता असं नाही.
त्याउलट कार्तिकीला विजेती ठरल्याने मिळू शकणारा बूस्ट हा जास्त मोलाचा आणि कार्तिकी साठी उपयोगाचा आहे.

१०१% सहमत.

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

3 comments on “कार्तिकी देवींचा विजय असो…..:-)

 1. I very much like to listen all the songs and videos of Kartiki Gaekwad. All songs have their own importance still then the songs sung by her is very good. I congratulate her and wishes her for her future journey of singing

 2. रं तिने गायलेली बहुतेक गाणी अप्रकशित होती, सांप्रदायिक होती.
  तरीही ही किमया तिने करून दाखविली.
  सांप्रदायिक गाणी तिने पुर्ण ताकतिने सादर केलीत. ह्याचा दुसरा फायदा म्हणजे , ही गाणी पुर्वी कोणि प्रतिथयश गायकाने गायलेली नसल्यामुळे त्या गाण्याला कम्पॅरिझन साठी स्केल नव्हती- जी इतर गाण्यांना होती.
  पण वरच्या गोष्टीमुळे तिच्या विजयाचे महत्व कमी मात्र होत नाही.
  प्रतिकुल परिस्थिती मधला तिचा विजय हा निश्चितच उल्लेखनिय आहे.

 3. very true.

  Tase ‘Udyache awaz’ sagalech – pachahi jana ahetacha…pan jar apan lil ‘championship’ angle ne vichar kela tar vatate ki Kartikine ghetaleli udi/zep hi far lamb ani unch hoti. ticha ani itarancha starting point ha ekacha navata. baki sagalyanchi support system jasta changali ahe tichyapeksha, tyanna tar career milelach.. hichyakade gun ahet ani yogya velet regognition milale – chaanach zala.. mala tiche pratyek gane eikatana khoop kautuk watat hote- ki hi evadhishi lahan gavatun aleli mulagi thodakya velat kiti kahi shikali and dheet zali, Asha Khadilakar mhanalya tase tichya awajat ek tej ahe .

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: