१ प्रतिक्रिया

ग्राहक राजा ?


मराठी चॅनेल्स आणि बाजार

ज्या चॅनेलला पहिल्या क्रमांकावर जाण्याची महत्त्वाकांक्षा आहे त्यांना इतर चॅनेल्सच्या करमणूक क्षेत्रात उतरून त्यांच्यापेक्षा सरस ठरूनच त्यांना चीत करावे लागेल. लोकांची ज्या प्रकारचे कार्यक्रम पाहण्याची मानसिकता झालेली आहे त्याच्या संपूर्णपणे विरोधात जाऊन कितीही चांगले कार्यक्रम केले तरी लोकांना त्या कार्यक्रमांकडे ओढून आणायला खूप वेळ लागेल. सराफ बाजारात एका बाजूला एक असलेल्या सगळ्या दुकानांचा धंदा होतोच.. पण सरस ठरतो तो वेगळे दागिने करणारा, उत्तम सेवा देणारा सराफ. तिथे लोखंडाचे दुकान चालणारच नाही असं नाही. पण लोकांची वहिवाटीची सवय तोडणे हे खूपच कठीण आहे. ही चॅनेल्स आहेत आणि रिलायन्सच्या आगमनाची दवंडी पिटली जाते आहे. येईल तेव्हा येईल पण या सगळ्यात उत्तम कथा असणाऱ्या मालिका एखाद्या चॅनेलला पहिल्या क्रमांकावर घेऊन जातील. पण प्रेक्षकांना फायदाच फायदा आहे. ग्राहकांचे राज्य आहे. ते ठरवणार त्यांना काय पाहिजे. म्हणून ज्या मालिका किंवा कार्यक्रम आपल्याला आवडत नाहीत ते कृपया सवय आहे म्हणून पाहू नका. ज्यांच्या घरी टीआरपी मीटर्स आहेत त्यांनी तर हे नक्कीच लक्षात ठेवा. तरच खरोखर सर्वाना आवडणारे कार्यक्रम करण्याची स्फूर्ती या चॅनेल्सना मिळेल.

आजच्या लोकसत्ता च्या व्हिवा पुरवणीतल्या एका लेखातला हा परिच्छेद. पण परिस्थिती खरंच तशी आहे का ? ग्राहक राजा आहे का ? की सगळ्या वाहिन्यांना केवळ आपल्याच तुंबडया भरायच्या आहेत ? रियालिटी शो च्या माध्यमातून भरपूर नफा कमावणारी झी मराठी एक पे चॅनल आहे. सुरूवातीला काही वर्ष मोफत सेवा देणारी ई टिव्ही वाहिनीही आता पे चॅनेल आहे. जाहिरातदारांकडून पैसा घ्यायचा, प्रेकक्षांकडून दरमहा वर्गणी घ्यायची, रियालिटी शो मधूनही कमवायचे हा एकच उद्योग चालू आहे. इथे तुम्हाआम्हाला काय आवडतं याच्याशी कोणत्याही वाहिनीला काहीही देणं घेणं नाही. याचा ढळढळीत पुरावा म्हणजे, नुकत्याच पार पडलेल्या ’झी मराठीच्या सारेगमप लिटिल चॅम्प्स’ च्या स्पर्धेत सातत्याने वेगवेगळ्या स्तरातून पाचही अंतिम स्पर्धकांना विजेते घोषित करायची मागणी येऊनही एकच अंतिम विजेती निवडली गेली. अगदीच बाकीच्यांवर अन्याय झाला असे दिसू नये म्हणून ; झी मराठीने या शो च्या माध्यमातून कमावलेल्या रग्गड नफ्यापैकी प्रत्येकी २ लाख म्हणजे एकूण १० लाख गाण्याच्या शिक्षणाकरता स्कॉलरशिप दिल्याची मखलाशी केली आणि पेक्षकांना गप्प केलं. असो,

आमच्याकडे केबलचालकाच्या मनमानीला कंटाळून ४ वर्षांपूर्वीच डिश टिव्ही घेतल्याने तर आम्ही जास्तच या खोड्यात अडकलो आहोत.

  1. एक तर जेवढे रदमहा केबलवाल्याला देत होतो तेवढेच पैसे दरमहा डीश टिव्ही करताही द्यायला लागतात. शिवाय आज बाजारात डीश, टाटास्काय, बिग, इ. अनेक पर्याय उपलब्ध असले तरी सगळ्याच वाहिन्या हे सगळे जण दाखवत नाहीत. डिश टिव्हवर स्टार माझा, स्टार प्रवाह या नव्या(?) वाहिन्या अजूनही दिसत नाही. आयबीएन लोकमत हल्ली दिसायला लागले आहे.म्हणजे केबलवाल्याला देत होतो तितकेच पैसे भरूनही सगळ्या वाहिन्या नाहीतच, शिवाय  सेट टॉप बॉक्स चा अतिरिक्त खर्च. थोडक्यात, महाराष्ट्रातच मराठी प्रेक्षकांची गळचेपी. न मागता सगळ्या दाक्षिणात्य वाहिन्या मात्र सेवेला हजर असतात.
  2. पावसाळ्यात डीश टिव्ही चे प्रक्षेपण पहाण्याकरता वरूण राजाला साकडंच घालावं लागतं. जरा पाऊस भुरभुरायला(?) लागला की डीश टिव्ही ची बोलती बंद होते.

मध्यंतरी वृत्तपत्रांतून सेट टॉप बॉक्स द्वारे प्रेक्षकांना ’५ रूपयात एक चॅनेल’ अशी भलावण केली गेली.  होती. पण त्यात काहीही तथ्य नाही. कारण ज्या कंपनीचा सेटटॉप बॉक्स बसवला जातो; त्यांची दरमहा अमूक वाहिन्यांचा गुच्छ अमूक रूपायात अश्या योजना असतात. त्यामुळे नेमकी हव्या तेवढयाच वाहीन्या घेण्याचा पर्याय प्रेक्षकांना खुला नाहीच मुळी. उदाहरणार्थ, घरातल्या चार माणसांनी त्यांच्या आवडीच्या प्रत्येकी ५ वाहिन्या घेण्याचे ठरवले आणि प्रत्येक वाहिनी ५ रू महिना उपलब्ध असेल तर महिना १०० रूपायात हा खर्च भागेल. शिवाय निवडीचे स्वातंत्र्यही असेल. पण नेमके तेच नसल्याने जे दाखवले जाते तेच बघण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे टिआरपी मीटर या प्रकारात वाहिन्यांचीही फसगत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ज्या दिवशी सेट टॉप बॉक्स द्वारे सेवा पुरवणार्‍या सेवा कंपन्या एकत्र येतील आणि एकाच प्रकारचा सेट टॉप बॉक्स लावून जेवढया वाहिन्या हव्या तेवढयाच निवडीचे स्वातंत्र्य देतील, शिवाय या वाहिन्या दरमहा प्रत्येकी ५ रूपायाप्रमाणे आकारल्या जातील….तो या दूरदर्शन माध्यमातील क्रांतिकारक दिवस असेल.

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

One comment on “ग्राहक राजा ?

  1. “दूरदर्शन माध्यमातील क्रांतिकारक दिवस” – if the government forces the private channel providers to not to provide “वाहिन्यांचा गुच्छ “, then only the krantikarak day will come

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: