10 प्रतिक्रिया

ग्लोबल वॉर्मिंग आणि आपण


गेले दशकभर जगात सगळीकडे ग्लोबल वॉर्मिंगच्या नावाने ओरड चालली आहे. विशेषत: मुंबईत २६ जुलै २००५ च्या न भूतो अशा प्रलयानंतर न भविष्यती करता काय करता येईल असा विचार व्यक्तिगत पातळीवर होऊ लागला, हा एक स्तुत्य बदल समाजात अनुभवायला येऊ लागला आहे.  पाणी वाचवा, वीज वाचवा, इंधन वाचवा, पर्यावरण वाचवा पर्यायाने वसुंधरेला वाचवा तरच आपण वाचू अश्या मागण्या सुशिक्षित समाजात जोर धरू लागल्या आहेत.
अनेक छोटे छोटे बदल आपल्या राहाणीमानात करायला आपण आपल्यापासून सुरूवात केली तर आपणच ओरबाडलेल्या या वसुंधरेला पुन्हा सुजलाम सुफलाम करता येईल. उदाहरणार्थ वीजेचा गिझर वापरण्याऐवजी गॅसवर चालू शकणारा गिझर आपण बसवला तर आपले वीजेचे बील कमी येईलच पण वाचलेली वीज दुसर्‍या एखाद्या गरूजू घराला मिळू शकेल. बल्ब किंवा टयूबलाईट्स वापरण्याच्या ऐवजी सीएफएल दिवे वापरले तरी उर्जाबचत आणि आपल्या मासिक वीजखर्चात कपात होऊ शकते.
प्लास्टिकच्या वापराबाबत मात्र दुमत आहे. काही जण प्लास्टिकचा अजिबात वापर करू नका म्हणतात पण बहुतेकांच्या मते प्लास्टिकला पर्याय नाही. आज प्लास्टिकने आपलं रोजचं जगणं व्यापून टाकलंय. त्यामुळे प्लास्टिक न वापरण्याला कमी वापरा किंवा पुन्हा पुन्हा वापरा असे पर्याय उपलब्ध आहेत. परदेशात प्लास्टिकच्या पुनर्वापरावर तिथल्या सरकारने ठोस पावले उचलली आहेत. पण आपले सरकार मात्र इतके निरीच्छ का ? दरवर्षी अभियांत्रिकी विद्यालयातून वेगवेगळ्या विषयावर इतकी तरूण मंडळी विविध प्रकल्प करत असतात. मागे एकदा ’रस्त्याच्या बांधकामात प्लास्टिकच्या पाळ पिशव्यांचा वापर केला तर टिकाऊ रस्ते तयार होतात हे एका प्रकल्पाद्वारे मांडण्यात आले होते. बंगलोर मध्ये म्हणे रस्ते बांधण्याकरता या मार्गाचा अवलंब केला गेला आहे’. महाराष्ट्र सरकारच अश्या गोष्टीत मागे का ?
अर्थात सगळ्या गोष्टी सरकारच्या माथी मारून उपयोगही नाही. आपल्याला आणि आपल्या पुढच्या पिढीला सुरक्षित जगता यावं याकरता तरी प्रत्येकाने आपल्या राहाणीमानात बदल घडवून आणायला हवेत.

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

Comment navigation

Newer Comments →

10 comments on “ग्लोबल वॉर्मिंग आणि आपण

Comment navigation

Newer Comments →

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: