यावर आपले मत नोंदवा

भाऊबंदकी


            मागच्या आठवडयात लोकसभा निवडणूकांचा निकाल लागला. तो लागण्यापूर्वी वर्तमानपत्रातून नेहमी कोणाचे ना कोणाचे तरी भाकित वर्तवलेले असायचे. त्यात बहुतेकांनी आघाडी किंवा कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही , शिवाय डाव्यांचे पारडे जड असेल, त्यातही डाव्यांकडच्या मागासवर्गीय महिलेचे पारडे जड असेल ( मायावती) तर काहींनी दक्षिणेकडची महिला ( जयललिता) पंतप्रधान ठरवेल , जरी आघाडी चे सरकार आले तरी ते जानेवरी २०१० पर्यंतच सत्तेवर राहील, मनसे ला ४-५ जागा मिळतील अशी अनेक बिनबुडाची भाकिते वर्तवली होती. परंतु मतदारांनी राजकीय पक्षांसकट त्या ज्योतिषांनासुद्धा धोबीपछाड घालून बहुमताने आघाडीला पुन्हा सत्तेवर आणले. ते ही अश्या पद्धतीने की डाव्यांना आपली हुकूमत चालावायची संधीही न मिळता. 

         इथे महाराष्ट्रात तर १२ ठिकाणी मनसे ने युतीला असा काही धक्का दिला की त्यानंतर गेला आठवडाभर राज आणि उद्धव या चुलत बंधूंची भाऊबंदकी चव्हाटयावर आली. केवळ त्यांचेच नाही तर मराठी माणसाचेही हसू झाले आणि मुंबईत दोन ठिकाणी    परप्रांतीय उमेदवार निवडून आले. 

       यापुढे मराठी माणसाला वाली कोण ? हा प्रश्न तर मनात आहेच. पण सध्या तरी तरूण मराठी मतदार मनसे कडे मोठया अपेक्षेने पहात आहे हे सिद्ध झाले. या लेखाद्वारे मला विरोपाद्वारे आलेल्या काही फाईल्स जोडत आहे. त्या वाचकांनी अवश्य वाचाव्या. इतरांनाही पाठवाव्या

mns.pdf

1.pdf

2.pdf

3.pdf

4.pdf

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: