5 प्रतिक्रिया

लोकसत्ताचे नविन संकेतस्थळ


लोकसत्ताचे नविन संकेतस्थळ

लोकसत्ताचे नविन संकेतस्थळ

वर्तमानपत्रात नव्या संकेतस्थळाची आणि त्यातील सोयींची बातमी वाचून मोठ्या उत्साहाने नव्या संकेतस्थळावर गेले. पण ’प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट’ असे म्हणायची वेळ आली. यापूर्वीचे संकेतस्थळच चांगले होते असे मी म्हणीन. मोठा फॉन्ट, मनोहारी रंगसंगती या नवीन संकेतस्थळावर असली तरी खालील सोयींचा मात्र अभाव आहे.

१) मी दोन-तीन लेख ईमेलद्वारे पाठवायचा प्रयत्न केला, पण ते होऊ शकले नाही….कारण ’email could not be sent’ एवढेच देण्यात आले.

२) इतर संकेतस्थाळांसारखी या संकेतस्थळाला, त्यातल्या प्रत्येक सदराला RSS Feeds ची जोड देण्यात आली तर आमच्यासारख्या नेटकरांचे भाग्यच. लोकसत्तेची सगळी सदरं आणि बहुतेक लेख वाचनीय आणि संग्रहणीय असतात. RSS Feeds मुळे ही सोय होऊ शकते.

३) पुर्वीचे अंक तारीखवार पहाता यायचे ती सोय या नवीन संकेतस्थळात दिसतं नाही. उदा. http://www.loksatta.com/daily/20090105/main.htm या पत्त्यावरून ५ जानेवारी २००९ चा लोकसत्ता मला वाचता येत असे. मधली तारीख बदलली की काम होत असे. तेच विविध सदरांचंही होत होतं. तारीख बदलून पुढचा पत्ता बदलला की काम होत होते. पण आता तसा पत्ता address bar मध्ये दिसत नाही. सध्या तो असा दिसतोय. http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=156&Itemid=169 त्यामुळे मागचे अंक कसे काय वाचता येतील ?
कदाचित नवीन संकेतस्थळाचा आजचा पहिलाच दिवस असल्याने ही सोय अजून कार्यान्वयित होऊ शकली नसेल असे मी समजते.

४) वरचाच मुद्दा लवून धरून एक सूचना..उदा..जेव्हा मी हास्यरंगचे पान उघडीन तेव्हा डावीकडे हास्यरंगमधल्या सगळय़ा सदरांची एक यादी दिसते. पण त्यात फक्त चालू आठवड्याच्या एकच लेख दिसतो. त्यात next आणि back / old अशी सोय करता आली तर एखादे सदर बसल्या बैठकीला वाचून काढता येईल.

मी गुगल क्रोम हा न्याहाळक (ब्राऊजर) वापरते. अर्थात संकेतस्थळ दिसायला काहीच अडचण आली नाही त्याअर्थी मी वर उल्लेखलेल्या सोयी मुळातच नसाव्यात ही शंका. वर उल्लेखलेल्या विशेषत: २,३,४ या सूचना जर अमलात आणल्या गेल्या तर लोकसत्ता वाचकांची मोठी सोय होईल.

लोकसत्ता प्रेमी वाचक,

हीच प्रतिक्रिया लोकसत्तेला ही पाठवली आहे. पाहूया काही सुधारणा होते का 🙂

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

5 comments on “लोकसत्ताचे नविन संकेतस्थळ

  1. ha praytna cjangla ahe patantu orkut sarkhi My Mrathitun lihiaychi soye karavi hi vinanti.
    kalave lobh asava. abhar/

  2. E-manas is really ver well decorated.

  3. How to send our reaction to Loksatta? Do they have ani e-mail id?

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: