5 प्रतिक्रिया

भारत पाकिस्तान फाळणी….


पुन्हा एकदा जिना पुन्हा एकदा जिना
मागच्या आठवडय़ात भाजपचे वरिष्ठ नेते जसवंतसिंग यांचे ‘जिना : इंडिया, पार्टिशन, इण्डिपेण्डन्स’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले होते. त्यामध्ये त्यांनी जिनांपेक्षा सरदार पटेल आणि पंडित नेहरूंना फाळणीसाठी जबाबदार ठरवून जिनांना सेक्युलर ठरविण्याचा प्रयत्न केला आहे. या मुद्दय़ावर चर्चा, वादविवाद होऊ लागले आहेत. २००५ साली लालकृष्ण अडवाणी हे कराचीला गेले असता त्यांनी तेथील जिनांच्या मजारला भेट दिली होती. तेथील नोंदवहीत जिनांना आदरांजली वाहताना अडवाणींनी जिनांना हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दूत म्हणून गौरविले होते. तेव्हाही अशाच चर्चा झाल्या होत्या.

फाळणी – खलनायक कोण ?फाळणी - खलनायक कोण ?फाळणीसारख्या मोठय़ा रक्तलांछित, कोटय़वधी लोकांचे संसार देशोधडीला लावलेल्या अध्यायाचे फेरमूल्यमापन वेळोवेळी होईल आणि ते तसे व्हावे यात गैर काहीच नाही. त्यामुळे कदाचित, स्वातंत्र्यानंतर या कालखंडासंबंधी शाळा-कॉलेजात जे आजवर शिकविले गेले ते बदलावेही लागेल; पण असे फेरमूल्यमापन करताना ते पूर्वग्रहदूषित असणार नाही, ते तटस्थ व अराजकीय असेल याची काळजी मात्र घ्यावी लागेल.जसवंत सिंह यांनी लिहिलेल्या जीनांच्या चरित्राने `Jinnah: India- Partition- Independence”, (Rupa, 2009) एकच खळबळ उडवून दिली आहे. इतकी, की लेखकाची राजकीय कारकीर्दच संपुष्टात आली आहे. आता पाकिस्तानातही जीनांची थोरवी गाणारे मोजकेच लोक सापडतील; पण भारतात मात्र त्यांचे पेवच फुटलेले दिसते.

फाळणीचा विपर्यास
फाळणीचा विपर्यासइतिहास हे सांगतो की, सुमारे पाचशे वर्षांच्या मुस्लिम सत्तेखाली भारत असताना कोणत्याही मुस्लिम सत्ताधाऱ्याने भारताची धर्माध पायावर फाळणी केली नव्हती. मीर बाकी या शिया मुस्लिम सत्ताधाऱ्याने अयोध्येला जी मशीद बांधली ती त्यानंतर सुन्नी मुस्लिमांनी वापरली. बाबराने त्याच्या बाबरनाम्यात गाई कापणे टाळून हिंदूंची मने जिंका, तसेच मंदिरे व मशिदीवर हल्ले करू नका. इस्लामची प्रगती उदार मनानेच होईल, दहशतवादाने नाही असे स्पष्ट केले होते. अकबराने ‘सुलेहकुल’ सर्वधर्मसहिष्णुता, समाजशांतता हाच नवा धर्म प्रसारित केला होता.
जसवंतसिंग यांना जीनापेक्षा सरदार पटेल आणि पं. नेहरू यांनाच भारताच्या फाळणीस जबाबदार धरून जीनांच्या सेक्युलेरिझमचा उदो उदो करणारे पुस्तक लिहिल्याबद्दल भाजपाने जे तडकाफडकी हकालपट्टी (जसवंत यांना कोणतीही स्वबचावाची संधी न देता) केली आहे. तिचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याची घोर पायमल्ली म्हणून अवश्य निषेध झालाच पाहिजे.

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

5 comments on “भारत पाकिस्तान फाळणी….

 1. aata vel aashi aali aahe ki donhi (Bharat pakistan )rashtrani aata eaktra yyave. maitri nahi tar bhavache nate julavave. pan he julawanyasathi pakistanane daha tthambavila pahije.

 2. जुन्या जखमा कुरवाळून, एकमेकाना देा ष देत,अापअापसात भाण्डून काय साधणार अाहाेत. इतीहास डेाक्यात ठेवून भवीष्यावर नजर ठेवणेच येाग्य. सशक्त भारत घडविण्यासाठी एकजूट व्हा.अापले केाण परके केाण हे अाेळक्षखा.वैयक्तीक स्वाथ बाजूला ठेवा. त्याच त्या चूका पुन्हा पुन्हा करीत बसू नका . अशा लेाकाना खडयासारखे बाजूला ठेवा.

 3. Not only M.Gandhiji,Nrhruji, & Jinah responsible for this partition. The most responsible was British Empires. Question is why they participated in this issue before quit India? Why Indian leader surrender in front of British Empire? And what was the reason that Indian leader accepted the British Policy (Break and Rule)

  • Break and rule was not British policy, it is Indian Philosophy. Hindus were and are divided in four class types like Barhamin, Kshatrie, Vaish, Shuddr. We are diveded and ruled by any third person (party)

   And it is India’s bad luck, Since last thousands years, Never any Indian had or has ruled in the country directly. Foreigner has ruled the India. Ruler may Barhmin or Russian or Moguls or Britishers.

 4. फाळणी ही त्या अश्वत्थाम्याच्या कपाळावरील जखमेसारखी न भरुन येणारी जखम आहे .. भारतीय लोक पुढचे काहीशे वर्षे हा अनुभव बदलु शकणार नाहीत. मुर्खांनी चुका केल्या आता आम जनता त्याचे भोग भोगणार..

  यात काही नवीन ते नाही.. फक्त दुःख वाटतं ते एवढ्याच गोष्टीचं की अशा मुर्खांना आपण आजुनही राष्ट्रपितावगैरे म्हणतो.. आणी त्या स्त्रीलंपटास (नेहेरु बद्दल् बोलतोय मी) अदर देतो..

  गोडसे, अहो कसे हो फेडणार आम्ही तुमचे ऊपकार .. !!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: