यावर आपले मत नोंदवा

नविन दिनदर्शिका


अरेच्च्या ! नविन दिनदर्शिका (कॅलेंडर) खणातून बाहेर आली,

नविन इंग्रजी वर्षाचा नवा कोरा दिवस उजाडला सुद्धा,

आमचे आपले मागील पानावरून पुढे चालूच…. 😦

एक तर इमारत दुरूस्तीचे काम चालू आहे. ते करत असताना पाईपलाईन बदलायचे काम हाती घेतले आहे. आज दिवसभर पाणी नव्हतेच पण सिंटेक्स्ट टाकी भरलेली असल्या कारणाने तसा प्रश्न आला नाही. संध्याकाळी तीन चतुर्थांश पाणी संपल्यावर कळले की पाईप बदलून झाले आहेत, सगळ्यांकडे पाणी यायला लागले पण आमच्या तळमजल्याजवळ पाईप चोंदल्याने पाणी येऊ शकणार नाही. अरे देवा ! ती माणसे निघून गेलेली…३१ डिसेंबरची रात्र…वॉचमनने सकाळी प्लंबरला बोलावून काम करू असे आश्वासन दिले तरी उद्या सकाळच्याला कोण माईचा लाल स्वत:च्या पायाने चालत काम करायला येईल ? फारच क्षीण गतीने टाकी भरत आहे. उद्या महापालिकेने आठवड्यातून एक दिवस पाणी बंद केले तर काय होईल याची चुणूक अनुभवायला येतेय :-(. असंही ३१ डिसेंबर साजरा बिजरा करण्याचा मानस नव्हताच….त्यात आता हा घोर…वर्ष संपत आले तरी संकटं काही संपत नाहीत. आलीया भोगासी !

नवीन वर्षात ४ नवे कोरे मराठी चित्रपट एकाच जानेवारी महिन्यात एकेका शुक्रवारी प्रदर्शित होत आहेत. अनुक्रमे नटरंग, झेंडा,शिक्षणाच्या आईचा घो आणि हरिश्चंद्राची फॅक्टरी. सगळे बघायचे आहेत, बघुया कसे जमतेय ते.

टाकी भरायला लावून ३ ईडियट्स बघायला बसले….अर्थात संगणकावर उतरवून तो ३जीपी मध्ये बदलवून मोबाईलवर टाकला होता. बर्‍याच दिवसांनी एक बरा चित्रपट बघितल्याचे वाटले. करीनाच्या बहिणीच्या बाळंतपणाचा अतिशयोक्ती प्रसंग सोडल्यास, बरेचसे विनोद माहित असूनही प्रेझेंटेशन फ्रेश वाटले.

२ वाजता चित्रपट संपला….मग झोपायला गेले.

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: