2 प्रतिक्रिया

वंशाचा दिवा….अनैतिकता आणि भाडयाचं मातृत्व


सध्या झी मराठीवरच्या दोन प्रमुख मालिकांमध्ये वंशाच्या दिव्याकरता घरातल्या स्त्रियांची घालमेल दाखवली जात आहे. तशी ती काही प्रेक्षकांना नवीन नाही. असं म्हणतात की ज्या गोष्टी आपल्या आजुबाजूलाच घडत असतात त्याचंच प्रतिबिंब आपल्याला मालिका, चित्रपटात पहायला मिळतं पण सध्या हे कथानक ज्या मार्गाने चाललं आहे ते पहाता समाजात अस काही घडतं असेल तर ते समाजस्वास्थाच्या दृष्टीने घातक आहे असेच म्हणावे लागेल.
पहिली मालिका कुलवधू – राजेशिर्के घराण्यात ती कुलदिपक….तिघांचीही लग्ने झालेली….मोठ्याचे लग्न होऊन बरीच वर्षे झाली आहेत तर धाकट्याचे नुकतेच झाले आहे. पण मधल्या आणि या तिसर्‍या धाकट्या मुलाने आपल्या तोलामोलाच्या मुलीशी विवाह न केल्याने, प्रेमविवाह करून घरातून निघून गेलेले. यापैकी मोठ्या मुलात दोष असल्याने तो बाप होऊ शकणार नाहीये पण अजून मधल्या मुलालाही मूलबाळ नाहीये. त्यामुळे राजेशिर्के घराण्याला वारस होण हा प्रश्न दिवसरात्र राजमात ’साईमा’ यांना छळतोय. वारस न मिळू शकण्याचं सगळं खापर मोठ्या सूनेच्या माथी मारलं जातयं. मोठ्या मुलाचे त्याच्या कंपनीच्या सीईओशी अनैतिक संबंध आहेतच. ती खरं तर याआधी झालेल्या अपमानाचा बदला घेण्याच्या हेतूने हे सूत जुळवतेय पण तो निर्बुद्ध रणवीर राजेशिर्के आपल्यात दोष नाही असे मानून आणि तितक्याच निर्बुद्ध साईमा मात्र राजेशिर्के घराण्याला वारस मिळणार म्हणून खूष झालेले आहेत.
एरवी अश्या संबंधातून जन्माला आलेल्या बाळाची परवड बघता हा येणारा वारस निश्चितच भाग्यवान म्हणायला हवा. आणि ती मुलगी असली तर ? साईमा आणि रणवीर तिला जिवंत ठेवतील ? की मुलगा नाही म्हणून पुन्हा ये रे माझ्या मागल्या ?

दुसरी मालिका प्रधान कुटुंबाच्या ’अनुबंध’ ची. यात आलेला विषय खूपच नाजूक आणि यापूर्वी निदान मराठी मालिकांमधून चर्चिला न गेलेला असा आहे. नमिता प्रधान मातृत्वाला आसुसलेली एक स्त्री पण मूल होऊ न शकणारी. तिला तिच्या नवर्‍याचा अंश असलेलं आणि उत्तम गुण घेऊन जन्माला येणारं बाळ हवं आहे. ती श्रीमंत असल्याने सहाजिकच तिच्या या वेडाकरता वाट्टेल तेवढे पैसे मोजायला ती तयार आहे. त्याकरता ती अश्विनी देवधर नावाच्या एका सोज्वळ कुमारिकेला सरोगेट मदर व्हायला भाग पाडते. मूळात नमिता वृत्तिने चांगली असल्याने सुरूवातीला ती कशाचीही अपेक्षा न ठेवता अश्विनीला तिच्या अडचणीत मदत करते, पण स्वत:चे बाळ हवे असल्याचा तिचा हट्टाचा पगडा हळूहळू तिच्यावर स्वत:च्याच मनावर इतका बसतो की मूळच्या भिडस्त असलेल्या आणि आता आर्थिक अडचणीत सापडलेल्या अश्विनी देवधरला ती सरोगेट मदर होण्याकरता भाग पाडते. (या मालिकेतील नमिता, अश्विनी या दोघींनीही आपापली कामे अगदी उत्तम केलेली आहेत. अर्थात तो या लेखाचा मुद्दा नाही.)
एखाद्या परिस्थितीने नाडलेल्या कुमारिकेला अश्या पद्धतीने कात्रीत पकडून तिच्याकरून हे काम करवून घेण्यापेक्षा एखादं मूल दत्तक घेणं या कुटुंबाला सहज शक्य आहे. तसे ते का नाही घेत ? बरं आपल्याच नवर्‍याचा अंश असलेलं मूल हवं तर एखाद्या गरजू विवाहित बाईकडून हे का नाही करवून घेतलं जात ?
आश्चर्य म्हणजे ह्या दोन्ही मालिकेत ह्या ज्या दोन चुकीच्या गोष्टी घडत आहेत त्याला घरातल्याच मुख्य बाईचा पाठिंबा आहे !
या दोन्ही कुटुंबांनी आपल्याला एकेक मूल दत्तक घेतलं असं दाखवलं असतं तर झी मराठी ने वेगळा पायंडा पाडला असं म्हणता आलं असतं पण झी मराठी अजूनही कर्मकांडं, पुनर्जन्म, देवदेवस्की यांतच स्वत: रमण्यात आनि प्रेक्षकांना रमवण्यात धन्यता मानतेय.
फार पूर्वी मी एक कांदबरी वाचली होती. त्यातल्या कुटुंबाला मूल नसल्याने ते दत्तक घ्यायचे असते. त्यांची अट असते की दत्तक घेतलं जाणारं मूलही त्यांच्याप्रमाणे ब्राह्मण कुटुंबातलं हवं कारण ब्राह्मण समाज उच्च संस्कारीत असतो. अनाथाश्रम या गोष्टीला विरोध करतं. त्यांच्या मते एक तर येणारी मूले रस्त्यात सापडलेली , दरवाज्याबाहेर ठेऊन गेलेली, पोलिसांनी आणून दिलेली अशी असतात. ते कोणत्या कुळातलं आहे याचा ठावठिकाणा कसा सांगणार ? दुसरं म्हणजे ब्राह्मणाचं मूल असं अनाथालयात आलं म्हणजे त्याच्या ब्राह्मण आई-वडीलांनी त्याची जबाबदारी झटकून दिली. जो आपल्या भल्या बुर्‍या कर्माची जबाबदारी स्वत: घेऊ शकत नाही मग ब्राह्मण समाज उच्च संस्कारीत असल्याचा दावा कसा खरा मानायचा ? आणि प्रत्येकालाच जर ब्राह्मण मूल दत्तक हवं तर ब्राह्मण समाजच सगळ्यात बाहेरख्याली आहे असा याचा अर्थ नाही का होत ? आहे कुणाकडे याचे उत्तर ?

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

2 comments on “वंशाचा दिवा….अनैतिकता आणि भाडयाचं मातृत्व

  1. pratekanech aplyala mul havay ase mhananyapeksha mul dattak gheun thodefar tari samaj karya karave. tasech dattak ghetana te kunache ani kontya jatiche he pahoo naye. saroget mother peksha he kadhihi changle. aai-bapani kelelya papala janmala yenare mul kase kay doshi asnar? tyatach jar mulapeksha mulila dattak gheun apan adarsh nirman karava.
    dhanyavaad.

  2. barobar aahe he Tv channel wale kahi dakhavtat………….

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: