5 प्रतिक्रिया

मुंबई कोणाची ?


मुंबई कोणाची ? यावर सध्या इतका काही गदारोळ चालू आहे. मुंबईसह महाराष्ट्राच्या लढयाने १०५ हुतात्म्यांचा बळी देऊन मुंबई महाराष्टाला मिळालेली आहे, त्यावर इतर कोणीही भाषिकांनी हक्क सांगूच नये. मराठी जनता सहिष्णू आहे म्हणून इतर भाषिकांनी मराठी माणसाचा अंत पाहू नये. आलेल्या इतर भाषिकांना महाराष्ट्र नेहमीच सामावून घेत आलेला आहे असे असतानाही बाहेरून येऊन हातपाय पसरणार्‍यांनी आपण या मुंबईला बकाल करण्यापलिकडे काय केलं याचा विचार करावा. मुंबईत कामधंदा मिळतो म्हणून सहकुटुंब मुंबईत येणार्‍यांनी इथेच बस्तान ठोकायचे, झोपडया बांधून रहायचे, सरकारने त्या काही वर्षांनी अधिकृत करायच्या, कोणत्याही उद्योगाकरता १५ वर्षाचे महाराष्ट्रातले वास्तव्य प्रमाण मानायचे आणि परप्रातिंयांचे लोंढे मुंबईने पोसून इथल्या मूळ भूमिपूत्राला मात्र कामधंद्यापासून लांब ठेऊन किंवा घराच्या किंमती न परवडणार्‍या ठेऊन महाराष्ट्रातून हाकलायचा हा कॉंग्रेसचा कट आहेच मुळी.

काल डोंबिवलीला मनसे अध्यक्ष श्री. राज ठाकरे यांचे झालेले भाषण ज्यांनी ऐकले असेल त्यांना त्यांचे मुद्दे पटले असतीलच. त्याच वेळेला दुसरीकडे टाईम्स नाऊ च्या अर्णव गोस्वामी यांनी शिवसेना अध्यक्ष श्री.उद्धव ठाकरे यांना ’राहूल गांधीने “मुंबई भारताची आहे.” ह्या केलेले वक्तव्यात काय चूक आहे’ असे स्पष्टीकरण विचारले. उद्धव ठाकरे यांनी त्याला गुळमुळीत ’हे वेगळे सांगायची काय गरज आहे.’ असे उत्तर दिले खरे. पण त्यापेक्षाही माझ्या मते, राहूल गांधीला बिहार मध्ये जाऊन मुंबई बद्दल बोलायची गरज काय होती ? बिहारात आहेस तर त्याने १९५२ पासून कॉंग्रेसचे राज्य असून सुद्धा बिहारच्या न झालेल्या कींबहुना न केलेल्या विकासाबद्दल बोलावे. मुंबई आर्थिक राजधानी असली म्हणून काय परप्रांतियांना आंदण दिलेली नाही. कोणीही यावे आणि मुंबई आणि मराठी बद्दल बोलावे, त्याला प्रत्युत्तर म्हणून कोणत्याही ठाकर्‍यांनी केलेल्या वक्तव्याला इतरांनी बकबक म्हणून हिणवावे, प्रसार माध्यमांनी त्यावर डिवचणे असे खाजवून खरूज काढणे मुद्दाम चालू आहे. तिन्ही ठाकर्‍यांची वक्तव्ये ही राजकारणापुरती मानली तरी खरे तर मुंबई मराठी माणसाची आहे म्हणतानाही मराठी माणूस सगळ्यांना सामावून घेत आलेला आहे.  आज मुंबई ही प्रामुख्याने कॉस्मॉपॉलिटन म्हणून ओळखली जाते कारण अठरापगड जाति-धर्माचे लोक इथे गुण्यागोविंदाने रहात आहेत. पण मुंबई विकसित करण्याच्या नावाखाली अधिकाअधिक जागा परप्रांतीय विकसकांना/उद्योजकांना देऊन सद्य सरकारला मराठी जनतेकरता काहीही करण्याची इच्छाशक्तीच नाही. वाढणारी महागाई, जागांचे भाव याकरता कॉंग्रेसच जबाबदार नाही का ? निवडणूंकापूर्वी  ’सत्ता आली तर अन्नधान्याचे भाव स्थिर ठेऊ’ सांगायला यांना लाज वाटत नाही. आपल्याचकडे सत्ता असताना मुळात ते वाढलेच कसे याचा विचारही यांच्या मनाला शिवत नाही. प्रत्यक्ष निवडून आल्यावर मात्र ’महागाई अजून तीन महिने कमी होणार नाही’ हे सांगायला तर असलेली गेंड्याची कातडी कॉंग्रेसच कमावू शकते. वर जबाबदारी घेऊन खाती बदलून घेऊन काही विधायक कामे करायची तर मंत्र्याची तयारीच नाही.

जागांच्या कधीही कमी न होणार्‍या भावांमुळे तर हळूहळू मराठी टक्का मुंबईतून केव्हाच कमी व्हायला लागलेला आहे. परप्रांतीय धनदांडगे मात्र टॉवरच्या मस्तीत जगत आहेत. अश्या परिस्थितीत काही वर्षांनी मराठी माणूस मुंबईत औषधालाही सापडणार नाही आणि तेव्हा खरोखरच विचारायची वेळ येईल की मुंबई कोणाची ?

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

Comment navigation

Newer Comments →

5 comments on “मुंबई कोणाची ?

  1. आजच्या लोकसत्तेच्या संपादकीय मध्ये मी वर मांडलेले विचारच मांडले आहेत. http://goo.gl/BnVP

Comment navigation

Newer Comments →

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: