१ प्रतिक्रिया

दोन फुल एक हाफ…


या सगळ्या घटना मागच्या आठवड्यातल्या…एक दोन दिवसांच्या फरकाने असतील.

देना बॅंकेत गेले होते…स्थानिक शाखेत….तिथे काही कर्मचारी गुजराती होते. गंमत म्हणजे आपले मराठी कर्मचारी महाराष्ट्रात मराठी सोडून त्या गुजराती कर्मचार्‍यांशी गुजरातीत संवाद साधत होते. आपलीच मराठी माणसं आपल्याच मुलखात इतर भाषिकांशी त्यांच्या भाषेत बोलताना पाहून खेद वाटत होता.

मुलाच्या इतिहास आणि भूगोल ह्या पुस्तकांच्या पार पत्रावळी झाल्या होत्या. स्वाईन फ्लू मुळे एक चाचणी परिक्षा झाली नव्हती. त्यामुळे झालेले नुकसान भरून काढण्याकरता येणारी चाचणी आणि त्यानंतरची वार्षिक परिक्षा उत्तम गुणांनी पास होणे महत्वाचे होते. नवीन पुस्तके आणण्याकरता आमच्याच इमारतीमधील अमराठी दुकानदाराकडे गेले. तिथे अर्थात्‌च मराठी पुस्तके उपलब्ध नव्हती. निकड असल्याने थोडया लांबवरच्या मराठी दुकानदाराकडे गेले. बर्‍याच प्रयत्नानंतर त्याला मराठी पुस्तके शोधण्यात यश आले. तत्पूर्वी “ताई, मराठी मिळत नाहीत, इंग्लिश घेऊन जा ना, इंग्लिश देऊ का ?” या प्रश्नावर आणि त्याच्या विद्वत्तेवर अवाक्‌ झाले. पण त्याक्षणी मराठी पेक्षा मुलाची पुस्तके महत्वाची असल्याने मी त्याला गुळमुळीत ” बघा, महाराष्ट्रातच, मराठी दुकानदाराच्याच, मराठी पुस्तकांच्याच दुकानात मराठी भाषेतलीच पुस्तके मिळताना मारामार. मग इतर भाषिकांना कशाला दोष द्या ” म्हणून लढायचा एक क्षीण प्रयत्न केला.

पण या दोन्ही गोष्टींचा वचपा मी पुढच्या दिवशी काढलाच🙂

आमच्याकडे हेल्पेज इंडिया मधून काही मदत मागायला माणसं आली होती. अर्थातच इंग्लिश मधून बोलत होती. मी त्यांना मराठीतून बोला म्हणून सांगितले. त्यांनी हसत हसत मराठी थोडी थोडी येत असल्याने सांगितले. मग माझा विरोध असूनही हिंदीतून संभाषण साधायला त्यांनी सुरूवात केली. त्यावर मी त्यांना डॉ.प्रकाश आमटे सारख्या निस्वार्थी समाजसेवकाच्या मराठी संस्थेला आणि महाराष्ट्रातल्या इतर संस्थानाच वेळोवेळी मदत करत असल्याचे सांगितले. ज्यांच्या महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांना मराठी देखील येत नाही त्यांना मी मदत करणार नाही असे मी ठणकावून सांगितले.

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

One comment on “दोन फुल एक हाफ…

  1. आपलेच दात आणि आपलेच ओठ.
    दोष तरी कुणाला देणार?
    व्यावहारिक पातळीवरूनच सगळे विचार करतात त्यामुळे आपली मातृभाषा आपण बोललीच पाहिजे असे काही नाही…..असले विचार आपल्याच लोकांकडून ऐकावे लागतात. 😦

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s

%d bloggers like this: