3 प्रतिक्रिया

तुमचे ट्विट्स चित्ररूपात दाखवा.


आपण दिवसभरात अनेक सुविचार वाचत असतो. एकमेकांनाही पाठवत असतो. पण एखादा सुविचार किंवा एखादं मजेशीर वाक्यं जर चित्ररूपाने पहायला / वाचायला मिळाले तर ? आज जालावर फिरताना एक संकेतस्थळ सापडले. ज्यात तुम्ही असे सु्विचार किंवा मजेशीर वाक्य, तुम्ही वाचत असलेले ट्विट्स अश्या गोष्टी तुम्ही चित्ररूपाने एकमेकांना पाठवू शकता.

तुम्हाला या संकेतस्थळावर जाऊन फक्त तुम्हाला हवे असलेले वाक्य दिलेल्या रकान्यात टंकायचे किंवा चिकटवायचे आहे. त्यातल्या मजकूराच्या संदर्भाने तुम्हाला काही चित्र आणि त्यावर लिहिलेला तुमचा संदेश समोर पडद्यावर दिसतील. त्यातला आवडेल ते चित्र तुम्ही ट्विटरद्वारे इतरांना पाठवू शकता. समजा तुम्ही ट्विटर वापरत नसाल…तरीही काही हरकत नाही. तुम्ही आवडलेल्या चित्रावर उजवी टिचकी देऊन ते चित्र तुमच्या संगणकावर उतरवून घेऊ शकता. याच पद्धतीचा अवलंब करून मी तयार केलेले हे काही सुविचार खाली चलतचित्रात देत आहे. दुर्दैवाने यात देवनागरीचा वापर करता येत नाहिये.

इतकचं नाही तर तुम्ही एखाद्या व्यक्तिचे ट्विट्सही या पद्धतीने मिळवू शकता. आहे की नाही गंमत ? ही सुविधा कशी वाटली ते कळवायला मात्र विसरू नका.

प्रेरणादायी वचने

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: