7 प्रतिक्रिया

तुमचा पासवर्ड तुमच्या पाकिटात ?


दिवसभरात आपण संगणकावर किती काम करतो ? किती संकेतस्थळे रोजच्यारोज उघडतो ? त्यातल्या किती संकेतस्थळांवर रोज लॉग इन करतो ? त्यातल्या प्रत्येक संकेतस्थळाचे युजर नेम आणि पासवर्ड लक्षात कसे ठेवतो ? गुगल, याहू, एमेसेन सारखी संकेतस्थळे त्यांच्या स्वत:च्या विविध सेवा वापरण्याकरता एकाच पासवर्डवर काम भागवतात. पण इतर संकेतस्थळांचे काय ? आपण अनेक बॅंकांचे खातेदार असतो…आजकाल नेट बॅंकिंगचा वापर करून लीलया इकडचे पैसे तिकडे वळवतो. अनेकदा ऑनलाईन गुंतवणूक करतो. ह्या सगळ्या गोष्टीत पैसा गुंतलेला असल्याने आपला पासवर्ड सुरक्षित कसा ठेवणार आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे तो लक्षात कसा ठेवणार…..तर बहुतेकजण एकच पासवर्ड सगळीकडे वापरतात. युजरनेम आपण एकच वापरून चालू शकेलही पण पासवर्डही सगळीकडे एकच ठेवला आणि दुर्दैवाने तो चोरीला गेला तर काय ?यावर उपाय म्हणून मध्यंतरी महाजालावर एक युक्ती माझ्या वाचनात आली होती. खाली एक चित्र जोडले आहे. १४ x 6 आकाराचा एक आयत आहे. त्यात पहिल्या आडव्या ओळीत इंग्रजी A ते Z अशी एका रकान्यात प्रत्येकी दोन अक्षरे आहेत. पहिल्या उभ्या स्तंभात १ ते ५ असे अंक आहेत. दुसर्‍या ओळीपासून आणि स्तंभापासून त्यात काही संदर्भहीन अक्षरे आणि/किंवा अंक आहेत. आता याचा वापर करून आपण आपल्याला हव्या त्या संकेतस्थळाचा पासवर्ड कसा तयार करू शकतो बरं ?

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

7 comments on “तुमचा पासवर्ड तुमच्या पाकिटात ?

 1. तुम्ही सुरु केलेला ब्लॉग फार छान आहे.

 2. pagal samajata kaa..??
  http://Www.Labnol.org varun sabhar CHORALE ya chorane…

  • दर्शक, मी तुम्हाला पागल समजत नाही. तुम्ही लेख नीट वाचा. मी कुठेही असं म्हटलं नाहिये की ही मी शोधलेली युक्ती आहे म्हणून. मी लेखात असंही म्हटलं आहे की, ही युक्ति मला महाजालावर वाचनात आली होती. फक्त मूळ लेखाचा दुवा दिला नाही कारण
   १) नेमका तो लेख कुठे वाचला ते आठवत नव्हते. पण वाचल्या वाचल्या आवडला म्हणून ती इमेज माझ्याकडे साठवून ठेवली असती. कल्पना चोरायची असती तर मूळ चित्रात बदल करून ते माझ्या नावावर मला खपवता आले असते. पण मराठी वाचकांना ही युक्ति माहित व्हावी म्हणून हा लेख मराठीतून दिला इतकंच.
   २) तो लेख इंग्रजीत होता.

   • मराठीत माहिती देवून मराठी माणसाला हुशार करणे महत्वाचे आणि नतद्रष्ट लोकांना उत्तर द्यावयाची गरज नाही .माहिती पुर्ण लेखाबद्दल आभार .

    • गोविंद, माझ्या जालनिशीला भेट दिल्याबद्दल आणी मानलेल्या आभाराबद्दल धन्यवाद. कसं आहे गोविंद ,मी जर आधीच्या प्रतिसादाला उत्तर दिले नसते तर मला माझी बाजू मांडता आली नसती. थोडक्यात माझी जालावरची प्रतिमा मलिन होऊ न देण्याकरता हे स्पष्टीकरण देणे आवश्यक होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s