3 प्रतिक्रिया

बचत खात्यात रोजच्या रकमेवर व्याज आकारणी ?


रिजर्व बॅंकेने रोज व्याज आकारण्याचा निर्णय घेतलाय खरा……पण सामान्य ग्राहकाच्या हिताचा हा निर्णय इतर खाजगी बॅंका कितपत / किती दिवस अमलात आणलीत यात शंकाच आहे. वानगीदाखल दोन उदाहरणं घ्या…

१) बर्‍य़ाच वर्षापूर्वी आपल्या खात्यातल्या नोंदी नोंदवून घ्यायला आपल्याला बॅंकेत रांगेत उभे राहून पासबुक भरून घ्यावे लागत असे. खाजगी बॅंका आल्यावर त्यांनी मोफत दर महिन्याला खात्याच्या नोंदी घरपोच पाठवायला सूरूवात केली. या नियमितपणाला भुलून अनेक नवे खातेदार त्यांना मिळाले. यानंतर मात्र हळूहळू या नोंदी त्रैमासिक मिळायला लागल्या. त्यानंतर त्या वार्षिक मिळायला लागल्या आणि आता तर ’गो ग्रीन’ च्या नावाखाली दर महिना खात्याच्या नोंदी विरोपाने मिळायला लागल्या आहेत आणि जर लेखी दस्ताएवज हवा असेल तर त्याच्याकरता वेगळे पैसे भरायची खातेदाराची तयारी हवी.

२) मागच्याच वर्षी रिजर्व बॅंकेने कोणत्याही बॅंकेचे एटिएम वापरून कोणत्याही बॅंकेतून पैसे काढता येतील असा फतवा काढला. समस्त ग्राहक वर्गाने याचे स्वागत केले, कारण तत्पूर्वी तसे करायला वेगळे पैसे ग्राहकाच्या खात्यातून कापले जात असत. पण जेमतेम सहा महिने होत नाहित तर सगळ्या बॅंकांनी याला विरोध करायला सुरूवात केली. आणि आता एका महिन्यात फक्त ५ वेळा अश्या प्रकारे पैसे काढता येत आहेत.

आपल्याच नोंदी जाणून घ्यायला किंवा आपल्याच खात्यातून आपलेच पैसे काढायला या बॅंकाना आपण पैसे का भरायचे ?

मागे एकदा डिमॅट खात्याच्या देखभालीकरता माझ्या बचत खात्यातून परस्पर पैसे त्या बॅंकेने वळते करून घेतले. बरं घेतले तर घेतले….ते घेताना माझी रक्कम आवश्यक त्रैमासिक कमीत कमी रकमेच्या खाली गेली. पण हे मला न कळवता बॅंक माझ्या खात्यातून त्याबद्दल दंड कापून घेत राहिली. ते खातं फारसं वापरात नसल्याने, आणि खात्यच्या नोंदी लेखी मिळणं बंद झाल्याने हे खूप उशीरा लक्षात आलं. एरवी हगल्यापादल्या, पतपुरवठा किंवा क्रेडीड कार्डाकरता फोन नाहितर एसेमेस करू शकणार्‍या या बॅंकेला हि माहिती खातेदाराला देणं का शक्य झाले नाही ? की इच्छाशक्ति नव्हती. We understand your need अश्यासारखी बोधवाक्य लिहिताना बॅंका प्रत्यक्षात मात्र तसं वागताना दिसत नाहित.

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

3 comments on “बचत खात्यात रोजच्या रकमेवर व्याज आकारणी ?

  1. me tumchya matashi purnapane sahmat aahe. halli sarvach scheme sathi sms , phone
    karnarya banka jeva asha mahatvachya gosthi n kalavta aaplya kadun dand kapun
    ghete jevha aapli kahi chook nasate.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: