16 प्रतिक्रिया

मराठी ब्लॉगर्स स्नेह मेळावा, मुंबई


काल दादर सार्वजनिक वाचनालय येथे मराठी ब्लॉगर्सचा मुंबई मेळावा भरला होता. फारतर ३०-३५ जण येतील अशी अपेक्षा केलेल्या या मेळाव्याला १२० जणांनी नाव नोंदणी केली होती. ५ ते ८ अशी वेळ ठरलेली होती पण रविवार असल्याने पश्चिम आणि मध्य अश्या दोन्ही रेल्वे वाहिन्यांवर मेगाब्लॉक होता. सहाजिकच ठरलेल्या वेळेपर्यंत फार लोक पोहोचू न शकल्याने कार्यक्रम अर्धा तास उशीरा सुरू झाला.

जमलेल्या लोकांमध्ये महिलांची संख्या फारच थोडी होती, अगदी १५% म्हणा ना ! पण वयाचे आणि पेशाचे बंधन मात्र इथे नव्हते. अगदी १ वर्ष वयाच्या ब्लॉगर पासून ते जेष्ठ नागरिकांपर्यंत बरेचजण उत्साहाने हजर होते. बहुतेकांनी ’आम्ही काही ठराविक विषयांवर लिहित नाही’ असे जरी सांगितले तरी काही ब्लॉगर्स मात्र एकच एक विषय धरून वाचकांना समृद्ध करत आहेत.

 • आयोजकांपैकी रोहन चौधरी यांनी शिवाजी महाराजाच्या विषयी त्यांना असलेली माहिती त्यांच्या ब्लॉगवर पुरवलेली आहे.
 • प्रशासकीय अधिकारी लीनाताई मेहेंदळे यांचे एक सोडून तब्बल ३२ ब्लॉग्ज आहे.
 • मिलिंद वेर्लेकर यांचे राजाशिवाजी.कॉम हे संकेतस्थळ लवकरच येत आहे. महाराजांच्या पुर्वीचा ५० वर्षाचा काळ, महाराजांचा ५० वर्षाचा काळ आणि त्यांच्यानंतरचा औरंगजेबाच्या मृत्युपर्यंतचा २७ वर्षांचा काळ असा १२७ वर्षांचा भरगच्च इतिहास आपल्याला वाचायला मिळणार आहे.
 • सलील चौधरी आणि प्रथमेश यांनी मिळून नेटभेट हा ब्लॉग लिहिलेला आहे. ब्लॉगर्स ना भेडसावणार्‍या अनेक समस्या, ब्लॉगरवरच्या अनेक क्लृप्त्या ते आपल्याला सहज सोप्या करून सांगतात.
 • ज्येष्ठ नागरिक संघापैकी विलेपार्ल्याच्या एका संघाने त्यांच्या जेष्ठ सभासदांकरता असाच एक ब्लॉग चालू केलेला आहे. साप्ताहिक सभे चा अहवाल त्यावर मांडणे किंवा सभासदांच्या उपयोगाच्या गोष्टींचा त्यावर उल्लेख करणे अशी कामे त्या द्वारे होतात.
 • मागच्या वर्षी शासनाने बी.एम्‌.एम्‌. मराठीतून सुर केले खरे पण त्याकरता मराठीतून पुस्तके उपलब्ध नाहियेत. त्या शाखेच्या एका प्राध्यापकाने तो शिकवत असलेल्या विषयांच्या नोट्स ’मराठीबीएमएम.कॉम’ या नावने उपलब्ध करून देऊन एक वेगळाच पायंडा पाडला आहे.
 • शंतनू ओक यांनी मनोगत.कॉम यावरच्या शुद्ध चिकित्सकाची (स्पेलचेकर) प्रेरणा घेऊन फायर फॉक्स आणि ओपन ऑफिस या मुक्त स्त्रोत प्रणाल्यांकरता शुद्धचिकित्सक तयार केला आहे. याचा वापर करून इंग्रजीत टंकलेले जसे आपण स्पेलचेक करू शकतो तसेच मराठीतही शुद्धलेखन तपासू शकतो. ही फार महत्वाची सोय शुद्ध मराठीचा प्रसार व्हायला पूरक आहे.
 • आनंद घारे यांनी आपल्या परदेश प्रवासाचे रसाळ वर्णन आपल्या ब्लॉगवरून क्रमश: केलेले आहे. ते वाचत असताना आपण ते प्रत्यक्ष अनुभवतच आहोत की काय असा संभ्रम मनात पडतो.

यातले बरेच ब्लॉगर्स आपण नावाने ओळखत असलो तरी त्यांना प्रत्यक्ष भेटण्याची प्रत्येकालाच उत्सुकता होती. त्यामुळे रविवार, मेगाब्लॉक, उकाडा, २०-२० ची भारताचा सामना ह्या सगळ्या अडचणी मोडीत काढून ब्लॉगर्स या मेळाव्याला उपस्थित राहिले.

कांचन, महेंद्र कुलकर्णी, रोहन यांचे संयोजन तर झकासच होते. सोबतीला बटाटेवडा, कटलेट, चहा हे ही असल्याने ब्लॉगर्स तृप्त पोटाने एकमेकांना भेटले.

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

Comment navigation

Newer Comments →

16 comments on “मराठी ब्लॉगर्स स्नेह मेळावा, मुंबई

 1. श्रेयाताई, तुझा वृत्तांत आधीच वाचून झाला होता, आता प्रतिक्रिया देतेय. या मेळाव्यामधे बरीच महत्त्वाची माहिती आपल्या सर्वांना मिळाली, त्या माहितीचा वापर ब्लॉगर्स आपल्या ब्लॉगसाठी करतील, अशी अपेक्षा करूया.

 2. छान वॄत्तांत…अगदि पॉंइंट टु पॉंइंट….

 3. अपर्णा, महेंद्र, योगेश, विद्याधर,सचिन, भानस, विवेक, देवकाका,निनाद, हेरंब तुमच्या सगळ्यांच्या लेखाच्या प्रशंसेबद्दल धन्यवाद ! 🙂

  त्यात काही मुद्दे लिहायचे राहून गेले.
  १) ’स्टार माझा’ च्या प्रसन्न जोशी यांनी मांडलेला मुद्दा. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे केवळ ज्ञानेश्वर, रामदास,तुकाराम,वडापाव, मिसळ, कांदेपोहे, पु.ल., व.पु. असा मराठी बाणा जपत न बसता इतर भाषेतलं साहित्य आपल्या मराठीत यायला हवं.

  २) सुभाष इनामदारांनी ’ग्लोबल मराठी’ च्या माध्यमातून अनेक लेखाकांचे साहित्य ग्लोबल मराठी.ऑर्ग वर उपलब्ध करून देण्याचेही आवाहन केले. शक्य तेवढया लोकांना लिहितं करा…त्यांना ब्लॉगिंग जमत नसेल तर इतरांनी त्यांचं लिखाण त्यांच्या नावासह ग्लोबल मराठीवर द्या. असं त्यांनी सुचवलं.

Comment navigation

Newer Comments →

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: