2 प्रतिक्रिया

नर्मदेSS हर हर – जगन्नाथ कुंटे


जगन्नाथ कुंटयांचे ’नर्मदेSS हर हर हे पुस्तक वाचनात आले. साधारण वर्षभरापूर्वी माझ्या एका मैत्रिणीने “हे पुस्तक तुझ्या वाचनालयात मिळेल का ?” असे विचारले होते. त्यावेळी वाचनालयात ते पुस्तक आलेलेच नव्हते. त्यानंतर तीन-चार महिन्यांनी ते आले. पण सातत्याने प्रयत्न करूनही मला काही ते पुस्तक मिळू शकले नाही. कायम डिमांड मध्ये आहे म्हणजे हे पुस्तक काही तरी खास वाचनीय दिसतेय असं वाटून गेलं. आणि जमेल तेव्हा वाचनालयात मी त्या पुस्तकाबद्दल विचारत राही. हे पुस्तक कशावर आहे हे ही मला ठाऊक नव्हते. पण नावात नर्मदा आहे म्हणजे नर्मदा नदी विषयी असेल असे वाटले…किंबहुना नर्मदा आंदोलना बद्दल असे वाटले होते. पण हे पुस्तक निघाले नर्मदा परिक्रमेवर.
जग्गन्नाथ कुंटे यांनी तीन वेळा नर्मदा परिक्रमा यशस्वी रित्या केली आहे. भक्कम आध्यात्मिक बैठक, साध्य असलेली विशिष्ट योगिक क्रिया आणि त्याद्वारे जिंवतपणे अनुभवायला मिळणारी समाधीवस्था याच्या जोरावर त्यांनी नर्मदा परिक्रमा केल्या. परिक्रमा करणार्‍यांना ही परिक्रमा चालत, चपला-बूट न घालता, वाहन न वापरता, विशिष्ट वस्त्रे परिधान करून करावी लागते. जंगलातून फिरताना लुटारू, श्वापदं यांचे भय, खाण्यापिण्याची चिंता या सगळ्यांवर मात करून त्यांनी एकदा नाही, दोनदा नाही तर तीनदा ही परिक्रमा केली. परिक्रमेत नर्मदामाई तिच्या बाळांना सांभाळून घेते, त्यांची काळजी घेते असे त्यांनी जे म्हटलेयं, ते त्यांच्या या पुस्तकातल्या अनुभवांवरून खरे आहे हे स्पष्ट होतेच. परिक्रमा करणार्‍याला या गोष्टींचा अनुभव येतोच असेही त्यांचे म्हणणे आहे. कोणाला अधिक येईल, कोणाला कमी येईल इतकेच. थोडक्यात ’जसा भाव तसा देव’. माझ्याकडे आध्यात्मिक बैठक, साधना नसल्याकारणाने ह्या पुस्तकातले अनुभव मी केवळ रोमांचकारी अनुभव म्हणून असल्याचे म्हणीन. पण तरीही एकदा प्रत्येकाने हे पुस्तक वाचायला हरकत नसावी. मला पटलेले, आवडलेले या पुस्तकातले विचार…..

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

2 comments on “नर्मदेSS हर हर – जगन्नाथ कुंटे

  1. Ekada hatat ghetalyar purna kelyashivay sodvat nahi he pustak.

  2. हो, खूप छान आणि वेगळे पुस्तक आहे हे!
    याची पुढची सिरीज वाचायची आहे अजून समाधिस्त इ.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: