१ प्रतिक्रिया

अभ्यासबोध


१४ जून पासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे. समर्थ रामदासांनी व्यवहारात कसे वागावे याकरता दासबोधाची निर्मिती केली. त्याचप्रमाणे माझ्या एका खाजगी क्लास ने काढलेला हा ’अभ्यासबोध’ माझ्या वाचनात आला. तो इथे देत आहे.ज्या पालकांची मुले अजून विद्यार्थीदशेत आहेत त्यांनी आणि त्यांच्या पाल्यांनी तो अवश्य अवलंबावा.

माध्यम असो इंग्रजी वा मराठी, अभ्यासबोध सगळ्यांसाठी !

अभ्यासाशी दोस्ती करण्यासाठी, यशवंत गुणवंत होण्यासाठी ॥ अविनाश जोशी.

अभ्यासबोध

तीच पुस्तके तीच शाळा
जास्त मार्क कां स्कॉलरना ?
अभ्यासाचे तंत्र जाणता
मिळतील तेही आपणाला ॥१॥

जन्मत:च ना ढ कोणी
जन्मत:च ना कोणी हुशार
नियमित करता अभ्यास
यश मिळते सर्वांस ॥२॥
परिक्षेचे नको टेन्शन
नको भीती अभ्यासाची
वाचन, मनन, चिंतन, लेखन
सूत्रे सोपी अभ्यासाची ॥३॥

एकाग्र करूनिया मन
आधी करावे वाचन
करीत राहावे मनन
वाचलेल्या भागांचे ॥४॥

वाचल्याने कळते सारे
आधी वाचलेचि पाहिजे
लिहिल्याने यश मिळते रे
आधी लिहिलेची पाहिजे ॥५॥

कळला जरी थोडा थोडा
शिकविण्याआधी वाचावा धडा
शिकवितांना लक्ष द्यावे
शिकविल्यानंतर पुन्हा वाचावे ॥६॥

हा करू का तो करू ?
आत्ता नको उद्या करू
संभ्रमात अशा वेळ जातो
अभ्यास करावयाचा तसाच राहतो ॥७॥

मिनिटे जाती तास जाती
दिवस सरती भरभरा
उद्या नको आजच करा
नंतर नको आत्ताच करा ॥८॥

करूनी नियोजन वेळेचे
वेळापत्रक करावे
वेळ ठराविक विषय ठराविक
नियमितपणे अभ्यासावे ॥९॥

सकाळची वा वेळ रात्रीची
बंधन असे काही नसे
आपणास जी आवडते ती
अभ्यासाची वेळ असे ॥१०॥

पुस्तक धरले डोळ्यांपुढे
लक्ष मात्र भलतीकडे
ना पालकांच्या समजुतीसाठी
अभ्यास आपल्या भल्यासाठी ॥११॥

मध्येच घ्यावा ब्रेक जरासा
टाइम पास करूनी यावे
फ्रेश होऊनी उत्साहाने
अभ्यासाला पुन्हा बसावे ॥१२॥

टीव्ही बघावा थोडा वेळ
खेळ खेळावा काही वेळ
अभ्यासामध्ये रंगून जावे
अभ्यास जणू आपला खेळ ॥१३॥
Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

One comment on “अभ्यासबोध

  1. अभ्यास बोध अतिशय छान लिहीला आहे मला खूप आवडला.
    शाळेतील मुलांना खरोखर उपयुक्त आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: