4 प्रतिक्रिया

ऑडीयो अंक


’प्रमोद देव’….जालावरची एक वयाने ज्येष्ठ आणि अनुभवाने श्रेष्ठ व्यक्ति. मनोगतावरचे आणि मिपावरचे लोक यांना अत्यानंद म्हणून ओळखतात तर गुगल बझ वर मात्र ते ’देका’ या देकाका च्या लघुरूपाने

प्रसिध्द आहेत. मराठी माणसाने मराठी माणसाशी मराठीत बोलले पाहिजे, अगदी संगणकावरही मराठी म्हणजे देवनागरीतच टंकल पाहिजे याविषयी ते खास आग्रही आणि ठाम असतात. त्यांचे स्वत:चे ’पुर्वानुभव’ आणि ’त्यांची कविता,माझे गाणे’ ह्या नावाचे दोन ब्लॉग्ज आहेतच. याखेरीज शब्दरंग या गटाचे ते अग्रेसर सदस्य आहेत. हा गट गेली दोन वर्ष……जून महिन्याच्या पहिल्या शनिवार-रविवारी स्काईप च्या माध्यमातून आपापल्या ब्लॉगवरच्या लेखनाचे अभिवाचन करत असतो. अर्थात हे अभिवाचन लाईव्ह प्रकारात मोडत असल्याने ते कुठेही साठवून ठेवण्याची सोय नाही. कदाचित त्यावरूनच देकांच्या सुपिक डोक्यात एक आयडीयाची कल्पना आली; आणि १४ ऑगस्ट २०१० या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला त्यांनी एक ऑडीयो अंक काढायचे निश्चित केले. तसे यापूर्वी त्यांनी २००९ च्या हिवाळी मोसमात ’शब्दगारवा’ हा हिवाळी अंक, २०१० च्या होळीनिमित्ते ’हास्यगारवा’ आणि सध्या पावसाळी वातावरणाच्या निमित्ताने ’ऋतू हिरवा’ असे ई अंक प्रकाशित केले आहेतच.

पण यावेळी मात्र ही काहीशी वेगळी कल्पना होती. आपल्या ब्लॉगवरचे…..आपलेच लिखाण…..आपणच आपल्या आवाजात ध्वनिमुद्रित करायचेही एक वेगळीच संकल्पना होती. आत्तापर्यंत प्रथितयश लेखाकांचे स्वत:च्या लिखाणाचे केलेले अभिवाचन आपण कथाकथनाच्या रूपात अनेकवेळा ऐकले आहे हो ! पण आपल्यासारख्या सामान्य माणसांच लेखन कोण वाचणार आणि कोण ऐकणार ? पण ’देकां’चा  एक नियमच आहे; तो म्हणजे, प्रसिद्धीकरता आलेलं कोणतही लिखाण छापायचंच……..फक्त ते आधी प्रसिद्ध केलेलं नसावं इतकीच माफक अपेक्षा. अर्थात या ऑडीयो अंकाकरता मात्र ही अट ठेवलेली नव्हती. त्याला आमच्या गुगल बझवरच्या मंडळीनी उदंड प्रतिसाद दिला. जाहिर केलेल्या तारखेनंतरही अभिवाचने येतच राहिली. पण अंकाच्या प्रकाशनाची तयारी पूर्ण झाल्याने वेळेच्या मर्यादेपर्यंत पोचलेली २१ वाचनेच फक्त या अंकात समाविष्ट केली गेली.

असो ! माझं पाल्हाळ वाचण्यापेक्षा तुम्ही प्रत्यक्षच जाऊन हा अंक ऐका बरं ! या अंकाचा दुवा इतरांना खुश्शाल द्या ! शिवाय अंक आवडला असल्यास तसं आणि आवडला नसल्यास त्याची कारणं द्यायला विसरू नका बरं का मंडळी !

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

4 comments on “ऑडीयो अंक

 1. काकांचा उपक्रम नि:स्वार्थी आहे. म्हणजे त्यात त्यांचा फायदा काहीही नाही. प्रसिध्दीची त्यांना हाव नाही. परंतु ह्या मुळे नवोदितांना मात्र प्रोत्साहन मिळते. ” तू हे कर / ते करून बघ” असे म्हणतात. नव्हे मागेच लागतात. मग नविन काहीतरी करण्यास धैर्य येते. त्यात हातचे न राखता मदत करतात. त्यात सुधारणा सुचवतात. आणि काही चांगले असेल तर तोंड भरून स्तुति करतात. अयोग्य असेल तर स्प्ष्टपणे कारणासहित सांगतात.
  इतकेच नाही तर आपण त्यांना दिलेल्या कुठल्याही सोचवणींवर ते विचार करतात. ब-याचदा अंमलातही आणतात.
  आणि त्यांचे मित्र/ मैत्रिणी तर पहा. अगदी कुठल्याही वयाचे / व्यवसायातले आहेत.
  मला देव काका अतिशय आदरणिय आहेत.

  • १००% सहमत मीनल. काकांच्या प्रोत्साहनामुळेच मी आज चारही अंकात लेखन,वाचन करू शकले. दोन अंकांची तर सजावट करू शकले आणि सर्वात मुख्य म्हणजे संगणकावर मराठीतून टंकणे त्यांच्याच मुळे शक्य करू शकले.

 2. अंक कालच वाचाल ऐकला..खूप चांगली व उपयुक्त संकल्पना आहे..त्यासाठी तुम्ही एक पोस्टच लिहिलीत हेही चांगले. अशीच उपयुक्त माहिती शेअर करत जा. धन्यवाद.

  • धन्यवाद ! ही माहिती शेअर करण्याचे उपयुक्त काम मी केले. पण नुसतीच स्तुती करण्यापेक्षा ,तुम्हीही ती माहिती तुमच्या मित्रमंडळीत शेअर केलीत तर पुढच्यावेळी यापेक्षा जास्त मोठा अंक त्यांच्या सहकार्याने शक्य होऊ शकतो.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: