21 प्रतिक्रिया

’स्टार माझ्या’च्या ब्लॉग माझा स्पर्धेतलं यश.


स्टार माझ्या ने आयोजित केलेल्या स्पर्धेचा निकाल लागून तीन दिवस उलटून गेले आहेत. बर्‍याचश्या विजेत्या / उत्तेजनार्थ बक्षिसपात्र ठरलेल्या स्पर्धकांनी (रोहन,तन्वी , रणजित, विशाल )आणि इतरही भाग न घेतलेल्या अनेकांनी (दिपक शिंदे, महेंद्र कुलकर्णी) आपापल्या ब्लॉगवर या स्पर्धेचा परामर्श घेतलेला आहेच. मूळ निकाल तुम्हाला स्टार माझ्या च्या संकेतस्थळावर इथे पहायला मिळेल. माझ्या मनातलेच मुद्दे बहुतेकांनी मांडले असल्याने परत परत तेच लिहिण्यात काही अर्थ नाही. करण्यासारखं राहिलं ते केवळ या निकालाचं पृथ्थ:करण; जे मी इथे केलयं 😉बक्षिसपात्र ठरलेल्या ब्लॉग्जपैकी ७०% ब्लॉग्ज ब्लॉगरवरचे आहेत. आणि फक्त २०% ब्लॉग्ज वर्डप्रेस.कॉम वरचे आहेत इतर १०% ब्लॉग्ज खाजगी जागा घेऊन केलेले आहेत. ८०% ब्लॉग्ज पुरूषांचे आहेत, केवळ २०% ब्लॉग्ज महिलांचे आहेत. मागच्या वर्षी १३ निवडलेल्या ब्लॉग्ज मधला फक्त एक ब्लॉग म्हणजे केवळ १०% ब्लॉग महिलांचे होते. यावर्षी हे प्रमाण १०% वाढले आहे. उत्तरोत्तर हे प्रमाण वाढतच जावो ही सदिच्छा !

ब्लॉगर आणि वर्डप्रेस.कॉम मधला मूळ फरकच मुळी css मध्ये बदल करता येण्यातला आहे. ब्लॉगर.कॉम ने ब्लॉगर्सकरता सगळी कवाडं खुली केलेली आहेत. अनंत हस्ते कमलावराने देता, घेता किती घेशील दो करांनी अशी अवस्था असल्याने; ब्लॉगरवरचा ब्लॉग किती देखणा करू आणि किती नको असं होऊन जातं. अर्थात हे ही येरागबाळ्याचं काम नाही. पण अनेक विजेट्सची कास धरुन किंवा ठायीठायी उपलब्ध असणारे मार्गदर्शन घेऊन हा गाडा चालवता येतो. वर्डप्रेस.कॉम मात्र जाम बधत नाही. आणि ब्लॉगर.कॉम सारखा ब्लॉग बनवायचा झालाच तर स्वत:चा खिसा मोकळा करून वर्डप्रेस.ऑर्ग ची वाट चालावी लागते. परिक्षकांनी या गोष्टी निकाल लावताना लक्षात घेतल्या असतीलच. परीक्षक लीना मेहेंदळे (प्रसिद्ध मराठी ब्लॉगर व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी), विनोद शिरसाठ (कार्यकारी संपादक, सा. ‘साधना’) आणि माधव शिरवळकर (आयटी तज्ज्ञ) यांचे त्याकरता खास आभार. एका स्पर्धेकरता ३ विजेते आणि १० उत्तेजनार्थ वरून ही संख्या ६ विजेते आणि ३० उत्तेजनार्थ अशी वाढवावी लागते यातच  स्पर्धकांचा  प्रतिसाद किती आला असेल ; परिक्षकांचा किती कस लागला असेल ; आणि स्टार माझा ने जास्तीत जास्त उत्तेजन देण्याकरता बक्षिसपात्र ब्लॉग्जची वाढवून दिलेली संख्या….. या स्पर्धेचं यश दाखवून देतात.

सर्वात शेवटी….. या ब्लॉगनेही या यादीत उत्तेजनार्थ म्हणून २१व्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे. अर्थातच वाचकांना आवडेल असा मजकूर त्यांना देण्याची जबाबदारी आता वाढली आहे हे निश्चित.

पुरुष पुरुष महिला महिला एकूण
विजेते उत्तेजनार्थ विजेते उत्तेजनार्थ
ब्लॉगर ०४ १६ ०० ०४ २४
वर्डप्रेस ०० ०५ ०१ ०२ ०८
इतर ०१ ०३ ०० ०० ०४
एकूण ०५ २४ ०१ ०६ ३६
Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

Comment navigation

Newer Comments →

21 comments on “’स्टार माझ्या’च्या ब्लॉग माझा स्पर्धेतलं यश.

  1. […] माझा ३ या स्पर्धेच्या निकालाबद्दल मी यापूर्वीच लिहिलं होतं. या स्पर्धेच्या बक्षिस […]

Comment navigation

Newer Comments →

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: