यावर आपले मत नोंदवा

शिक्षणाच्या xxx x


राज्य सरकारने शिक्षणाचा नुसता खेळखंडोबा करून ठेवला आहे. आधी इतके दिवस राज्याला पूर्णवेळ शिक्षणमंत्रीच नव्हते. त्याशिवाय दर वर्षी प्राथमिक , माध्यमिक शिक्षणाच्या  बाबतीत काहीतरी नवे नियम जारी केले जातात. तेही अश्या वेळी की विद्यार्थीच काय पालक, शिक्षक आणि मुख्याध्यापकही त्याबद्दल अनभिज्ञ असतात. उदाहरणार्थ विद्यार्थ्यांच्या आत्महत्या थांबाव्यात म्हणून आठवीपर्यंत परीक्षाच न घेणं, किंवा आठवीपर्यंतच्या कोणत्याही विद्यार्थ्याला नापास न करणं  असे परिणामांचा  विचार न करता शेंडा-बुडखा नसलेले निर्णय शिक्षण खात्याकडून घेतले जातात. त्याला  आक्षेप म्हणून  पालक  न्यायालयाची वाट चोखाळतात आणि बिचारे विद्यार्थी मात्र त्यात भरडले जातात. शालांत इयत्तेसारख्या बाबतीतला घोळ तर विचारायलाच नको. आधी पुस्तकं उपलब्ध नसतात म्हणून, मग उशीरा मिळाली तरी त्यात अनेक चुका असतात म्हणून, त्यानंतर प्रत्यक्ष परीक्षेच्या वेळी कॉपी सारख्या घटना घडतात म्हणून, पुढे निकालाच्या वेळी ’बेस्ट ऑफ फाईव्ह’ सारखे निर्णय आडवे येतात म्हणून आणि महाविद्यालयाच्या प्रवेशाकरता ऑनलाईन की ऑफलाईन हे धडपणे ठरत नसल्याने पालक आणि विद्यार्थी यांचे हाल कुत्रा खात नाही. हे कमी म्हणून की काय, राज्य सरकार शिक्षकांना निवडणुकांच्या आणि जनगणनेच्या कामालाही जुंपते. आधीच शिक्षणाचा दर्जा घसरत चालला आहे. आहेत त्या मराठी शाळा बंद पडत आहेत. नवीन मराठी शाळांना सरकार परवानगी नाकारतंय अशात जर शिक्षकांनीही असहकार पुकारला तर पालक आणि विद्यार्थ्यांनी कोणाकडे दाद मागायची ? इतकी सुशिक्षित तरुण मंडळी बेरोजगार असताना मुळात ज्यांच्याकडे ज्ञानदानाचं पवित्र आणि महत्त्वाचं कार्य सोपवलेल्या शिक्षकांना या कामाला जुंपण्यात काय हशील आहे ? त्यापायी होणार्‍या विद्यार्थ्यांच्या नुकसानाला कोण जबाबदार राहील ? परवाच्या दैनिक सकाळ मधील एक बातमी खाली दिली आहे. जनगणनेच्या कामामुळे जानेवारी ते १५ मार्च २०११ पर्यंत शाळांनी परीक्षा घेऊच नयेत असा एक आदेशच शिक्षण खात्याने काढून स्वतःची बौद्धिक दिवाळखोरी जाहिर केलीच आहे.पण शिक्षण खात्याला विद्यार्थ्यांकडून काय अपेक्षित आहे  ? परीक्षा नाहीत म्हणजे अभ्यासही करायला नको आणि आपल्याला किती येतं हे ही पहायला नको. स्वत: करोडोंचे घोटाळे करून राजरोसपणे हिंडणार्‍या राजकारण्यांचे आदर्श विद्यार्थ्यांनी डोळ्यासमोर ठेवावेत का ?

Advertisements

About श्रेया

I am Blogger, Blogger Designing, Creating E books, Content writing etc. are my hobbies.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: